भुमिपुत्र - न्याय हक्क व सन्मान

"राष्ट्रांतर्गत राष्ट्र... महाराष्ट्र!" अशी परिपूर्ण संघराज्यीय तत्त्वप्रणाली राबवून भारतातील सर्व राज्यांना जास्तीतजास्त स्वायत्तता देण्यात यावी, तसेच प्रत्येक राज्याच्या भाषिक संस्कृतिचं जतन व संरक्षण करुन प्रत्येक राज्यात मातृभाषेला उत्तेजन व मातृभाषेतूनच न्याय, शिक्षण व सरकारी कामकाजाचा आग्रह.

जात-धर्म-निरपेक्ष

धर्म-जातीपाती-आरक्षणसारखी ‘रण’ पेटती ठेवून सकळ राजकीय व्यवस्थेनं शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा इ. जनकल्याणकारी क्षेत्रातील आपली जबाबदारी झटकून टाकून, आपल्या स्वार्थासाठी खाजगी क्षेत्राला चरायला मोकळ रान दिलेलं आहे. त्याविरुध्द ‘धर्मराज्य पक्षा’चा लढा हा एकमेव जात-धर्म-निरपेक्ष ‘एल्गार’ आहे.

निसर्ग-पर्यावरणस्नेही

निवडणुका लढवणं, निवडणुका जिंकणं हे फक्त साधन आहे. साध्य नव्हे. अवघ्या जनतेच्या सन्मानानं आणि समाधानाने जगण्याच्या आकांक्षांची पुर्तता करणं, निसर्गाकडून घेऊ तेवढं परत देऊ हे आणि हेच केवळ आमचं विश्वकल्याणकारी अंतिम ध्येय राहिलं. अगदी आम्हा प्रत्येकाच्या अखेरच्या श्वासापर्यंत...

कंत्राटी कामगार/कर्मचारी

संघटित-असंघटित कामगारक्षेत्रात, विशेषत: कंत्राटी कामगार प्रथेविरूध्द. या प्रथेला धर्मराज्य पक्ष सेवा व उद्योगक्षेत्रातली ‘नव-अस्पृश्यता’ व ‘गुलामगिरी’ मानतो. आजवर आम्ही दलित-बहुजनांचे टोकाचे लढे लढत आलेलो आहोत. कंत्राटदारीतल्या ‘नव-अस्पृश्यते’ विरुध्द प्रखर लढयासाठी देखील धर्मराज्य पक्ष कृतसंकल्प आहे.

भ्रष्टाचार, शोषण व अन्याय

राजकारणाची मैली-गंगा, अध्यात्माची ‘मात्रा’ देऊन शुध्द करण्याचा आमचा भगीरथ प्रयत्न राहील. आम्ही कुठलाही धर्म ही ‘अफूची गोळी’ न मानता, उलटपक्षी अन्यायी-संवेदनाशून्य, भ्रष्ट व विषम व्यवस्थेविरुध्द 'बंदूकीची गोळी' मानतो! देशात प्रथमच धर्मश्रध्दांचा प्रभावी वापर आम्ही राजकारण शुद्धीसाठी करत आहोत.

शिक्षण व आरोग्य

शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेली ‘चातुर्वर्ण्य’ व्यवस्था व आरोग्य व्यवस्थेत निर्माण झालेली ‘पंचतारांकित’ व्यवस्था मोडीत काढणे हे ‘धर्मराज्य पक्षा'चे ध्येय आहे. आजच्या महागडया खाजगी शिक्षण व आरोग्य व्यवस्थेऐवजी, स्वस्त व तेवढयाच उच्चदर्जाच्या सार्वजनिक भ्रष्टाचारमुक्त व कार्यक्षम शिक्षण व आरोग्य सुविधेला चालना.

ताज्या बातम्या

 • May 16, 2016 136 Comments
  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

  कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर आणि प्रामाणिक अधिकारी अशी ओळख निर्माण झालेल्या डॉ. अश्विनी जोशी यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदावरून तडकाफडकी बदली केल्याच्या निषेधार्थ

  Read More
 • May 16, 2016 157 Comments
  ‘धर्मराज्य पक्षा’चा झंझावात

  ठाणे आणि मुंबईच्या राजकीय सिमा ओलांडून थेट विदर्भातील चंद्रपूर जिह्यात पोहोचल्यानंतर ‘धर्मराज्य पक्षा’चा मराठवाड्यातील नांदेड जिह्यात झंझावात सुरू झाला असून, पक्षाचे उपाध्यक्ष राजू सावंत आणि नांदेड

  Read More
 • May 16, 2016 120 Comments
  'धर्मराज्य पक्षा'ची तीव्र निदर्शने

  गडकरी रंगायतनंतर ठाण्याच्या कलाक्षेत्रात नावारूपाला येत असलेले डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आता ठाणे महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पुरते बदनाम झाले असून, त्याची सर्वस्वी

  Read More

आगामी उपक्रम

 • धर्मराज्य-चषक कॅरम-स्पर्धा१३ ऑगस्ट २०१६
  धर्मराज्य पक्ष वर्धापन दिन १६ नोव्हेंबर २०११
  प्रजासत्ताक दिन समारोह २६ जानेवारी २०१७

धर्मराज्य पक्ष परियोजना

आणखी पहा

इतिहासातील पाने

 • १६ नोव्हेंबर २०११

  धर्मराज्य पक्ष संस्थापना

  बुधवार दि.१६ नोव्हेंबर-२०११ रोजी 'धर्मराज्य' या नवीन राजकीय पक्षाची स्थापना व उदघाटन सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात पार पडला.

 • ११ मार्च २०१२

  अणूऊर्जा विरोध निदर्शने

  कोकणातील प्रस्तावित जैतापूर-आण्विकप्रकल्पाला या फुकुशिमा-स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर तीव्र विरोध दर्शविण्यासाठी 'धर्मराज्य पक्षा'ने ठाणे शहरात अनेक निदर्शनं केली.

 • २४ मार्च २०१३

  दुष्काळग्रस्त मदत फेरी

  दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धर्मराज्य पक्षाने ठाण्यात धान्याच्या स्वरुपात मदत फेरीचे आयोजन करून, पंधरा दिवसात घरोघरी फिरून २० टन धान्य जमा केले.

 • १० डिसेंबर २०१३

  'जनलोकपाल उपोषण'

  'जनलोकपाल विधेयक' संसदेतून मंजूर करवून घेण्यासाठी अन्ना हजारेच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ 'धर्मराज्य पक्ष' तर्फे ठाणे, नवी मुंबई, मुंबई येथे लाक्षणिक उपोषण केले गेले.

 • २६ जानेवारी २०१४

  सायकल महारॅली ठाणे

  'कार्बन-उत्सर्जन' किमान पातळीवर राखणाऱ्या 'पर्यावरणस्नेही' सायकल वापराला चालना मिळण्यासाठी "धर्मराज्य पक्षा"ची सायकल-महारॅली आयोजित करण्यात आली.

 • १० फेब्रुवारी २०१४

  'अर्थक्रांती' व्याख्यान

  'आर्थिक विषमता' दूर करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने 'अर्थक्रांती'चे जनक मा. अनिल बोकील यांचे विशेष जाहीर व्याख्यान ठाणे येथे आयोजित करण्यात आले.

 • ०६ जून २०१४

  पर्यावरण जनजागृती

  प्रसिद्ध पर्यावरणवादी लेखक व विचारवंत अतुल कहाते यांनी सांगितले की, भारताने भूतान आणि अमेरिका यांच्यातील मध्येबिंदू स्विकारून जगायला शिकायला हवे'

 • २६ जानेवारी २०१५

  काजिडा शेतकरी परिषद

  शासनाने ताब्यात घेतलेल्या जमिनी परत कराव्यात, जामदा लघु पाटबंधारे प्रकल्प उभारावा अशी संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकमताने मागणी करण्यात आली.

 • १६ नोव्हेंबर २०१५

  'कृष्णार्पणमस्तु' प्रकाशन

  निर्भिड विचार प्रकटीकरणासाठी धर्मराज्य पक्षाच्या चवथ्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे मुखपत्र 'कृष्णार्पणमस्तु' मासिकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

धर्मराज्य ब्लॉग

img
02Jun 109
राजकारण, सामाजिक, निवडणुका, प्रशासन

‘राक्षसी’ पोलीसी चाचणी!

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते..... ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!! आमचे पाच ग्रामीण मराठी तरुण बळी गेले आणि काल `सहावा’ बळी गेला, ‘राक्षसी’ पोलीसी चाचणीत!..... एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा ...

विस्ताराने वाचा
Share:
img
02Jun 109
राजकारण, सामाजिक, निवडणुका, प्रशासन

मफतलाल कंपनी ‘रेल.रोको’

कळवा येथील मफतलाल कंपनीच्या जागेवरील अनधिकृत व बेकायदेशीर झोपड्यांवरील, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होऊ घातलेली ‘ठामपा’ प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी, ज्या घृणास्पद पध्दतीने समस्त निरपराध रेल्वे प्रवाशांना ऐन काम...

विस्ताराने वाचा
Share: