‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न

‘‘धर्मराज्य पक्ष’’‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे रक्तदान शिबीरसंपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सिव्हील रूग्णालयाचे डॉ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे (टेक्निशिएन), रूपाली कदम (टेक्निकल सुपरवायझर), पल्लवी कैतकर (पी.आर.ओ.), दया सुतार (स्टुडन्ट नर्स), कोमल हुंडारे (स्टुडन्ट नर्स), वत्सला राठोड (अटेन्डन्ट), राधा मखवाना (अटेन्डन्ट), उमेश वाघचौरे (ब्लड ऑन कॉल बॉय) यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानपूर्वी तपासण्या व रक्तदान घेण्यात आले. यावेळी ऐच्छिक 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना ‘सिव्हील रूग्णालया’तर्फे रक्तदान कार्ड व प्रमाणपत्र देण्यात आले. सदर ‘रक्तदान शिबीर रविवार, दि. 8 फेब्रुवारी-2015 रोजी, सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 यावेळेत संपन्न झाले.

या शिबीराचे आयोजन धर्मराज्य पक्षाचे ठाण्यातील खोपट प्रभागातर्फे प्रभाग अध्यक्ष राजू शिंदे व उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष सुनिल घाणेकर यांनी केले होते. यावेळी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, महासचिव राजू फणसे, उपाध्यक्ष नितीन देशपांडे, धर्मराज्य महिला संघटना अध्यक्षा जयश्री पंडित, ठाणे जिल्हा समन्वयक राजेश गडकर, ठाणे जिल्हा सचिव नरेंद्र पंडित, ठाणे शहर अध्यक्ष सचिन शेट्टी, ठाणे शहर सचिव समीर चव्हाण, सहसचिव विजय भोसले, धर्मराज्य कामगारकर्मचारी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, सचिव रूपेश पवार  आदी मान्यवर उपस्थित होते.

उल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीराचे आयोजन

‘‘धर्मराज्य पक्ष’’‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), डॉक्टरी सल्ल्यानुसार ECG (हृद्यास्पंदनालेख) तपासणी आदी तपासण्या व डॉक्टरांचा सल्ला मोफत देण्यात येणार आहे. सदर शिबीर रविवार, दि. 7 डिसेंबर&2014 रोजी, सकाळी 10.30 ते दुपारी 3.00 यावेळेत, साईनाथ मित्र मंडळ, एमआयडीसी वॉटर टँक रोड, बिर्ला मंदिर, शिवनेरी नगर, उल्हासनगर&1 या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक लोकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘‘धर्मराज्य पक्षा’’चे उल्हासनगर (शहर) विधानसभा अध्यक्ष गौतम बस्ते (मो.नं. 9987064746) यांनी केले आहे.

इडिकॉन, मुंबई कामगारांना मिळणार रूपये 14,440/- रूपयांची भरघोस वाढ.

दि. 24 – मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात, त्रैवार्षिक पगारवाढीचा विक्रमी करार संपन्न झाला. या करारामुळे, ‘‘इडिकॉन’’ कामगारांना रूपये 14,440/- रूपयांची भरघोस वाढ मिळणार आहे.

मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात 1 जानेवारी-2014 ते 31 डिसेंबर-2016 या त्रैवार्षिक पगार वाढीचा करार संपन्न झाला. यानुसार किमान रूपये 10,000/- तर, टंतपंइसम क्ण्।;टक्।द्ध रू. 4,440/- इतकी वाढ करण्यात आलेली आहे. सदर पगारवाढीपैकी 70 टक्के रक्कम ;च्थ्.ठेंमद्ध व उर्वरीत 30 टक्के रक्कम इतर भत्यात समाविष्ट करण्यात खास कामगार हिताचा फॉर्म्युला अमलांत आलेला असून पूर्ण वाढीव रक्कम ही 50:25:25 या पध्दतीने तीन वर्षात देण्यात येईल. या करारानुसार 5 ते 10 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 15 दिवसाची ग्रॅच्युईटी, तर 10 ते 15 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 20 दिवसाची ग्रच्युईटी, तसेच 15 ते 20 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 25 दिवासांची ग्रच्युईटी देण्यात आली, हे या कराराचे खास वैशिष्ट्या आहे. त्याचप्रमाणे निवृत्तीची वयोमर्यादा 58 वर्षावरून 60 वर्ष अशी 2 वर्षांने वाढविण्यात आली आहे. तसेच 22 कंत्राटी कामगारांपैकी 9 कामगारांना परमनंट केले असून उर्वरीत 14 कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देऊन, त्या कामगारांना सेवाकाळाप्रमाणे 20 लाख 50 हजार रूपयांची भरपाई देण्यात आली.

इडिकॉन कंपनीच्या वतीने करार करतांना, कंपनीचे मालक श्री. ऑब्री, व्यवस्थापक श्री. पद्माकर आठवले, श्री. मेलवीन फर्नांडीस हजर होते, तर ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या वतीने अध्यक्ष राजन राजे, महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव रूपेश पवार, खजिनदार अण्णा साळुंखे इत्यादी पदाधिकारी तसेच, कंपनी युनिटचे कमिटी सदस्य उपस्थित होते.

कराराप्रसंगी बोलतांना, महासंघाचे अध्यक्ष राजन राजे म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलमुळे, प्रती महिना रूपये 5,000/- ते 6,000/- चे वेतन देऊन, कामगारांची लुट करून, कंत्राटदारी-मजूरीसारख्या गुलामगिरीला व नव-अस्पृश्यतेला कामगारांना तोंड द्यावे लागणार आहे. अशावेळी महाराष्ट्रातल्या मराठी कामगारांमध्ये, राजकीय जागृतीचे भान, या करारामुळे येईल आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तीच, महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मुळावर आलेले चित्र बदलेल आणि या करारामुळे नवीन गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. सामान्य जनतेच्या दृष्टीने अत्यंत घातकी असलेल्या, खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण (खाउजा) या आर्थिक सुधारणांच्या तडाख्याने चैतन्यहीन झालेल्या कामगार चळवळीत केशव सुतांच्या तुतारीप्रमाणे ‘‘प्राण फुंकणारा’’ असा हा ‘इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि.’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’मधील क्रांतीकारी-करार असल्याचे कामगार क्षेत्रांत बोलले जात आहे. या करारानंतर, इडिकॉन, मुंबई येथील कंपनीतील कामगारांनी एकमेकांना मिठाई भरवून भरघोस पगारवाढीची दिवाळी साजरी केली.

कंत्राटी पध्दतीचे समूळ उच्चाटन आणि पर्यावरणाचे संपूर्ण संरक्षण हेच आमचे ध्येय – राजन राजे

कंत्राटी पध्दतीचे समूळ उच्चाटन आणि पर्यावरणाचे संपूर्ण संरक्षण हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी सेंट्रल मैदानातील विराट जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले. जाहीर सभेत ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डेसीबल यंत्रणा पक्षाच्यावतीने उभारण्यात आली होती. असे करणारा ‘धर्मराज्य पक्ष’ हा भारतातील पहिलाच पक्ष आहे.

भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ठाण्याच्या सेंट्रल मैदानात नुकतीच प्रचंड जाहीर सभा संपन्न झाली. याप्रसंगी राजन राजे बोलत होते. यावेळी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे नेते डाॅ. विष्वंभर चैधरी, न्या. बी. जी. कोळसे-पाटील, गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर, जेष्ठ राजकीय विचारवंत प्रा. गोपाळ दुखंडे, जेष्ठ विधिज्ज्ञ प्रा. चित्रा साळुंखे, जयश्री खाडीलकर, नामवंत समाजसेवक नितीन देषपांडे, धर्मराज्य पक्षाचे महासचिव राजू फणसे आदि मान्यवर उपस्थित होते.

धर्मराज्य पक्षाची सत्ता आली तर सर्वप्रथम कंत्राटी पध्दतीचे समूळ उच्चाटन, पर्यावरणाचे संरक्षण, मानवी शोषणाला तीव्र विरोध, भष्टाचाराला 100 टक्के विरोध हेच आमचे प्रमुख ध्येय असणार आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, षिवसेना, मनसे या साÚया पक्षांचा झेंडा वेगळा आहे, पण अजेंडा मात्र भांडवलदारांच्याच हिताचा आहे, असेही यावेळी बोलताना राजन राजे म्हणाले.

याप्रसंगी पर्यावरण संरक्षणाच्या विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्याथ्र्यांना 725 सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच डाॅ. विष्वंभर चैधरी, दत्ता इस्वलकर, यांना धर्मराज्य गुणवंत समाजसेवक पुरस्कार देऊन तर पत्रकार संदिप षिंदे, गिरीष गायकवाड यांना धर्मराज्य गुणवंत पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्वतःच्याच सभेतील ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी स्वतःहून धर्मराज्य पक्षाने डेसीबल यंत्रणा उभारली होती. यानुसार आवाजाची मर्यादा प्रमाणात पाळण्यात आली. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डेसीबल यंत्रणा उभारणारा ‘धर्मराज्य पक्ष’ हा भारतातील पहिलाच पक्ष ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे फटाक्यांची आतषबाजी टाळूनही पर्यावरणाचे रक्षण करण्यात आले, याद्वारे भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष हे बिरूद पक्षाने सार्थ ठरविले.

आदर्श अहवाल स्विकारून तत्काळ अंमलबजावणी करा – धर्मराज्य पक्षाची जाहीर मागणी

दि. 21 – आदर्श घोटाळयाचा चौकशी अहवाल स्विकारून त्याची तत्काळ अंमलबजावणी करा आणि कलंकित मंत्री तसेच वशिलेबाज अधिकारी या भ्रष्टाचारयांना कडक शिक्षा करा अषी संतप्त मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केलीय.

आदर्श घोटाळयाचा चौकशी अहवाल स्विकारून त्याची तत्काळ अंमलबजावणी करा आणि कलंकित मंत्री तसेच वशिलेबाज अधिकारी या भ्रष्टाचाऱ्यांना कडक शिक्षा करा अशी संतप्त मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केलीय.

आदर्श इमारतीतील घोटाळयाला जबाबदार कलंकित मंत्र्यांना आणि वशिलेबाज अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आदर्श घोटाळयातील चौकशी अहवाल फेटाळून लावला आहे. तर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घोटाळयातील प्रमुख आरोपी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अटकेसाठी सीबीआयला परवानगी नाकारली आहे. आदर्श घोटाळयातील भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याचा प्रकार संतापजनक आहे. जनतेच्या मताला आपण काडीची किंमत देत नाही; हे कॉंग्रेस आघाडीच्या सरकारने याद्वारे दाखवून दिले आहे. यामुळे ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात ठाणे जिल्हाधिकारी कचेरीवर संतप्त निदर्शने करण्यात आल्याचं राजन राजे यांनी म्हटलं.

‘ठाणे महानगरपालिके’च्या भ्रष्ट कारभाराबाबतचा ‘‘नंदलाल समिती’’चा अहवाल पूर्ण दडपून टाकणाऱ्या ठाण्यातील भ्रष्ट आमदारांनीच ‘‘आदर्श-अहवाला’’संदर्भात नागपूरला विधिमंडळासमोर निदर्शने करून, ढोंगीपणाचे जे लाजिरवाणे दर्शन घडवले आहे; ते ही, यानिमित्ताने  निदर्शनास आले आहे! यामुळे आदर्श घोटाळयाचा चौकशी अहवाल स्विकारून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी आणि कलंकित मंत्री तसेच, वशिलेबाज अधिकारी या भ्रष्टाचाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ‘धर्मराज्य पक्षा’ने केली आहे.

धर्मराज्यची निबंध स्पर्धा – ७२५सायकलींचे बक्षीसरूपाने वाटप होणार

भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या धर्मराज्य पक्षाच्या वतीने पर्यावरण विषयाला चालना देण्यासाठी मी सायकल चालविण्याचा निर्धार केलाय कारण… या विषयावर न्यू इंग्लिश स्कूल ठाणे येथे गुरूवारी सकाळी १० : ००  वाजता भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना ७२५सायकलींचे बक्षीसरूपाने वाटप होणार आहे.

आरोग्य व पर्यावरण संरक्षणाचे प्रभावी साधन, वाहतूक कोंडीवरील सुलभ उपाय, हृदयरोग, मधुमेह, अस्थमा आदी रोगांवरील परिणामकारक उपाय, उत्तम शारिरीक व्यायाम, प्रदूषणावर परिणामकारक उपायासंदर्भात महत्त्वाचा असलेल्या मी सायकल चालविण्याचा निर्धार केलाय कारण… या विषयांतर्गत धर्मराज्य पक्षाने ‘भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० असे दोन शालेय गट आणि महाविद्यालयीन गट अशा तीनही गटांतील विजेत्या स्पर्धक मुलींना ३६५ आणि मुलांना ३६० असे रू. ४,५००/- किंमतीचे एकूण ७२५ सायकलींचे बक्षीसरूपाने वाटप कले जाणार आहे. तसेच निबंध स्पर्धेतील सहभागी होणाऱ्या सर्वच मुला-मुलींना ‘दिवाळीची विशेष भेट’ आणि ‘प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे.

गुरूवार, दि. १४ नोव्हेंबर २०१३ रोजी, सकाळी १० वाजता न्यू इंग्लिश स्कूल, राममारूती रोड, ठाणे (प.) येथे ही निबंध स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धेतील सहभागासाठी जयेंद्र जोग (98209 13925), रूपेश पवार (98703 90001), निवास साळुंखे (98694 13997), राजेश गडकर (93246 81224) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन धर्मराज्य पक्षाचे महासचिव राजू फणसे यांनी केले आहे.

धर्मराज्यची शुक्रवारी जाहीर सभा

भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या धर्मराज्य पक्षाची शुक्रवारी जाहीर सभा  सायंकाळी ठाण्याच्या सेंट्रल मैदानात होत आहे. यावेळी भ्रश्टाचार विरोधी जनआंदोलनाचे नेते डाॅ. विश्वंभर चौधरी, प्रसिध्द सामाजिक विचारवंत न्या. कोळसेपाटील, नामवंत पर्यावरण तज्ज्ञ अॅड गिरीष राऊत, गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द कामगार नेते राजन राजे असतील.

भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ष्धर्मराज्य पक्षाष्च्या द्वितीय वर्धापनाच्या पूर्वसंध्येला आयोजित जाहीर सभा षुक्रवारए दिण् 15 नोव्हेंबर 2013 रोजीए सायंकाळी 6.00 वाजता ठाण्यातील सेंट्रल मैदानात पार पडणार आहे. यावेळी प्रसिध्द पर्यावरण तज्ज्ञ आणि विचारवंत डाॅ विश्वंभर चौधरी सामाजिक लढयातील अग्रणी न्याण् बीण् जेण् कोळसे.पाटीलए नामवंत पर्यावरण तज्ज्ञ अॅडण् गिरीष राऊतए गिरणी कामगार संघर्श समितीचे अध्यक्ष दत्ता इस्वलकर राजकीय विचारवंत गोपाळ दुखंडे जेश्ठ विधिज्ज्ञ  चित्रा साळुंखे आदी मान्यवर सभेला संबोधित करणार आहेतण् सभेच्या अध्यक्षस्थानी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रसिध्द कामगार नेते राजन राजे असतील अशी माहिती पक्षाचे महासचिव राजू फणसे यांनी दिली.

यावेळी मी सायकल चालविण्याचा निर्धार केलाय कारण या विशयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील स्पर्धकांना 725 सायकलींचे बक्षीसरूपाने वाटप केले जाईल. तसेच समाजसेवा, पत्रकारिता क्षेत्रातील नामवंतांचा गुणवंत पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, तरी या जाहीर सभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजू फणसे यांनी केले आहे.

सध्या बोकाळलेल्या बाल-लैंगिक गुन्हेगारीबाबत धर्मराज्य पक्षाची कडक भूमिका!

राष्ट्रीय गुन्हे-नोंदणी यंत्रणेनं (National Crime Records Bureau) जाहीर केलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, आपल्या देशात दररोज 19 हून अधिक बालिकांवर लैंगिक-अत्याचार होत असल्याचं उघड झालयं.

या माणुसकीला काळीमा फासणाया लैंगिक गुन्हेगारीत, मध्यप्रदेष, उत्तर प्रदेशच्या बरोबरीने महाराष्ट्र आघाडीवर असावा; यासारखं दुर्दैव कुठलही नाही! या व अशा तऱ्हेच्या लैंगिक-गुन्हेगारीत परप्रांतीयांच्या सहभागाच्या प्रमाणाबाबत जरूर संषोधन व्हायला हवेचं पण, त्याचबरोबर चंगळवादामुळे ढासळत्या मूल्यव्यवस्थेची व समाजात वाढीस लागलेल्या संवेदनषून्यतेची देखील खोलवर चर्चा होऊन, आधुनिक जीवनपध्दतीबाबत फेरविचार होण्याची नितांत गरज देखील आहे!

वरील साÚया गोष्टी घडून येतील तेव्हा; पण तातडीची उपाययोजना म्हणून भारतीय दंडसंहितेत मोठा बदल घडवून, लैंगिक-गुन्हेगारीचे खटले त्वरित निकालात काढले जाण्याच्या बरोबरच, अशा तऱ्हेच्या गुन्हेगारीचं प्रथम शल्यचिकित्सेद्वारे ”लैंगिकदृष्ट्या खच्चीकरण“ (Castration) केले जावे व मगच त्या गुन्हेगारांना पुढील षिक्षा भोगण्यासाठी पाठवलं जावं….. अशी ठाम मागणी ”धर्मराज्य पक्ष“ करीत आहे!!!

आण्विक अपघात पहिला स्मृतीदिन

गेल्या वर्षी ११ मार्च-२०११ रोजी जपानमध्ये झालेल्या फुकुशिमा-दायची या अणूऊर्जा प्रकल्पातील त्सुनामी पश्चात झालेल्या विनाशकारी आण्विक-अपघाताच्या प्रथम-स्मृतिदिनानिमित्त देशात व जगभरात ११ मार्च-रविवार रोजी अणूऊर्जेविरोधात मोठ्याप्रमाणावर निदर्शने करण्यात आली. कोकणातील प्रस्तावित १०,००० मेगावँट जैतापूर-आण्विकप्रकल्पाला या फुकुशिमा-स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर तीव्र विरोध दर्शविण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ने ठाणे शहरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी निदर्शनं केली.

” जपानला ठेच ….भारत शहाणा; होणार की, नाही??? ” हे या निदर्शनांचं मुख्य सूत्र होतं!  ठाणे-पूर्व(आनंद चित्रपटगृह), कोरम-मॉल, शासकिय विश्रामगृह, वर्तकनगर नाका, लोकमान्य नगर बसडेपो अशा एकूण पाच ठिकाणी धर्मराज्य पक्षाचे शेकडो कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे, अणूऊर्जा निषेधाची घोषणापत्रके व अणूऊर्जे संदर्भात जनजागृती करणारा १०० फूटी लांबलचक बँनर घेऊन सकाळ-संध्याकाळ ऊन्हातान्हात उभे होते. थ्री-माईल आयलंड(अमेरिका), चेर्नोबिल(रशिया) आणि फुकुशिमा-दायची(जपान) या जागतिक आण्विक-दुर्घटनांसोबत भारतातील किरणोत्सारी युरेनियम खनिज उत्खनन(जादूगोडा-झारखंड) ते अणूविद्युत-निर्मितीचे सर्व टप्पे व त्यांचे संपूर्ण सजीवसृष्टिवर व मानवी पिढ्यापिढ्यांवर होणारे व होत असलेले घातक परिणाम अत्यंत प्रभावीरित्या चितारलेले होते. जागोजागी ठाणेकर घोळक्याघोळक्यानं फारच औत्सुक्यानं बँनर पहात होते व ‘अणूविद्युत हे निसर्गाशी द्यूत’ असून अणूविद्युत ही ‘वरदान’ नसून अणूविद्युत ही ‘मृत्युदूत’ आहे…मानवजातीसह अवघ्या सजीवसृष्टीला ‘शाप’ आहे, हे नीट समजावून घेत होते. कालच्या निदर्शनांना मिळालेला उदंड प्रतिसाद व त्यातून होणारी जनजागृती पाहून अशाचतऱ्‍हेनं महाराष्ट्रात ठिकठिकाणी अणूऊर्जेविरोधात निदर्शने करण्याचा ‘धर्मराज्य पक्षा’ने निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद!

आण्विक अपघात पहिला स्मृतीदिन फोटो गॅलेरी