इयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।

’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ – “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रास्त जाणीव मनात बाळगूनही मराठी संस्कृति-विकृति, मराठी अस्मिता-दुहीता, मराठी शौर्य-क्रौर्य, मराठी ज्ञान-अज्ञान, मराठी धीर-तर कुठे मागं फिर, अशा गुणा-दुर्गुणांनी भरलेला आणि भारलेला मराठमोळा माणूस आणि त्याची मायबोली मराठी – हे माझं पहिलं प्रेम! छोटया स्तरावर सामाजिक कार्य करताना का होईना, पण आपल्या क्षमतेची प्रत्यंचा पूर्ण ताणत, त्या मराठमोळया माणसासाठी आणि ’अमृतातेही पैजा जिंके’ अशा मराठी भाषेसाठी, त्यातल्या ’जवापाडे’ असणा-या दुर्गुणांना दाबून ’पर्वताएवढे’ असणा-या सद्गुणांना उठाव देत काहीतरी करीत राहणं, हा माझा ध्यास!! आणि म्हणूनच हा पत्र प्रपंच अन् हे तुमच्यासाठी प्रेमानं ’पेन’रूपी भेटवस्तू वाटप.

इयत्ता दहावीतल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, (माझी मुलं तुमच्या वयाची आहेत आणि आपल्या संस्कृतित षोडशवर्षीय मुलं ही आईबाबाची मित्रमैत्रिणी होतात) ’काल’ मी तुमच्या वयाचा होतो आणि ’उद्या’ तुम्ही माझ्या वयाचे असाल – पण या दरम्यानचा हा जो 30-35 वर्षांचा प्रवास असतो ना, तो मित्रांनो फार फार खडतर असतो आणि सद्यस्थितीत तर तो दिवसागणिक निश्चितपणे अधिकाधिक खडतर होत जाणारायं. त्याला तोंड देण्यासाठी आपण स्वत:ला सक्षम बनवायला हवं.

कोण कुठला आपल्याला सहानुभूति दाखवेल – कुठेतरी वशिल्यानं चिकटवेल, या खोटया आशेवर जगू नका. कारण पदरात ’सहानुभूति’ ऐवजी पोळून काढणा-या वास्तवाची ’अनुभूति’ निखा-याच्या स्वरूपात पडण्याची शक्यता अधिक. ’मराठी माध्यमाचे’ म्हणून कोणी आपल्याला ’सवलतीची’ आरक्षित पंगत वाढणार नाहीय, तर या स्पर्धेच्या जगात कर्तृत्व थिटं पडलं तर तोंडाला पानं पुसली जातील किंवा कुठल्याही बेसावध क्षणी भरल्या ताटावरून उठवलं जाईल. माझ्या अल्पस्वल्प सार्वजनिक जीवनातील हे विदारक अनुभव आहेत मित्रांनो, म्हणून उठा! जागे व्हा!! आसन, प्राणायाम-व्यायामानं मन-शरीर बळकट करा आणि भरपूर अभ्यास करा!!! व्हर्नॅक्युलर मिडियमची (देशी भाषेचे माध्यम) मुले म्हणजे ’गाळ’ आहे, या उच्चभ्रू लोकांत सार्वत्रिक पसरलेल्या गैरसमजाला मूठमाती देण्यासाठी स्वत:ला परिश्रमानं सिध्द् करा – सक्षम व्हा आणि आम्ही ’गाळ’ नसून ’गाळाची सुपीक माती’ आहोत, हे जगाला दाखवून द्या!

मित्रांनो, दिवसेंदिवस जगणं किती कठीण होत चाललयं, हे आपण थोडं समजून घेऊया. पूर्वीच्या काळी ’उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी’ म्हटली जायची. पूर्वापार ’धंदा’ म्हटलं म्हंजे मराठी माणसाचा मोठा ’वांधा’! कारण एकतर धंघ्यासाठी लागणा-या कठोर परिश्रमांची पुरेशी तयारी नाही (अलिकडे हे चित्र सुदैवानं हळूहळू का हाईना, पण निश्चितपणे बदलू लागलयं) आणि दुसरीकडे ’धदा’ म्हटलं म्हंजे चलाखी-मखलाशी आणि थोडी बहुत बदमाशी आलीच, पण त्याचाच सचोटीनं जगणा-या मराठी माणसाकडे ’वांधा’, त्यामुळे ढोबळमानानं कुठल्याही धंद्याच्या क्षेत्रात ’मराठी पाऊल’ दुर्दैवानं चार हात मागेच.

मग उरली सुरली ती ’शेती’ (त्यातही आता ’कान्ट्रॅक्ट-फार्मिंग’ येतयं) आणि शिल्लक राहील्या त्या ’नोक-या’! प्रामुख्यानं मराठी माणूस जिथे वळतो, त्या नोकरीच्या संधिंना एकीकडे अतिरेकी यांत्रिकता व सर्वव्यापी संगणकीकरणामुळे ’क्षयाची बाधा’ झालेली, तर दुसरीकडे आर्थिक शोषणाच्या चरकातून पिळून काढणा-या ’कंत्राटी मजुरी’ (Contract Labour) या ऑक्टोपसी-संकल्पनेमुळे परप्रांतियांच्या आक्रमणाची त्यात भर पडलेली! त्याची व्यापकता एवढी भीषण की, तुमच्या गुरूजनांच्या शिक्षकी पेशातदेखील ही ’अवदसा’ दशदिशांनी घुसलीयं. त्यामुळे काळाच्या ओघात आचार्यांचे (जसे द्रोणाचार्य) गुरूजी झाले (जसे सानेगुरूजी), गुरूजींचे ’सर’ झाले (जसे मेहंदळेसर) आणि आता तर कंत्राटी पध्दतीने सरांच ’सरपण’च होतयं की काय, अशी उव्दिग्न अवस्था झालीय. हातात बंदुका-तलवारी न घेता का होईना पण, मराठी लोकांवर झालेले हे ’परप्रांतीय-आक्रमण’च नव्हे तर काय? मित्रांनो, हे काळाचं मोठं कठीण ’संक्रमण’ आहे – रात्र वै-याची आहे, म्हणून जागे राहून ’सक्षम’ बना!

’सक्षम’ व्हायचं म्हंजे नेमकं काय करायचं? सर्वप्रथम जीवनातल्या प्रत्येक बाबतीत (सुरूवात दिनचर्येपासून) स्वावलंबी व्हा! वानगीदाखल एक गोष्ट सांगतो. गाजलेले अमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष अब्राहम लिंकन यांना त्यांच्या स्वत:चा बूटाला पॉलिश करताना पाहून आश्चर्यचकित झालेला त्यांचा सहकारी म्हणाला, “तुमच्या बूटांना तुम्हीच पॉलीश करता, प्रेसिडेट महाशय?” लिंकन उत्तरले, “मग तुम्ही कोणाच्या बूटांना पॉलीश करता?” ’स्वावलंबित्व’ ही व्यक्तिविकासाची पहिली पायरी – पुढे कळसाला हात घालण्यासाठी ब-याच पाय-या ओलांडायच्यायत.

मित्रांनो, जे काही करायचं त्यात स्वत:ला झोकून देऊन त्यात जास्तीत जास्त प्राविण्य संपादन करा, प्रसंगी कुठलही काम करण्यात बिलकुल लाज बाळगू नका, यशापयशाची पर्वा न करता विचापूर्वक प्रयत्नांची कास धरा, मनात सदैव कुणालाही सहकार्य करण्याची भावना बाळगा – व्यक्तिगत किंवा सार्वजनिक जीवनात कुणालाही नडणा-या – छळणा-या नकारात्मक भावनेला य:किंचितही थारा देऊ नका – कुणाला मदत करणं जमलं नाही तरी एकवेळ चालेल, पण नाहक कुणालाही अडचणीत आणू नका! ’शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!’ या बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीनुसार विपरीत व अन्यायी परिस्थितीशी जरूर प्रबळ ’संघर्ष’ करायचा, पण ह्रदयातला ’प्रेमाचा स्पर्श’ मात्र नाही हरवू द्यायचा!

टी.व्ही., जाहिराती आणि सिनेमे यातून दिसणारा भुलभुलैय्या, हा वरून कितीही गोंडस दिसला तरी तो अंति निखालस फसवा आणि विनाशाप्रत नेणारा आहे. अशा त-हेचं चंगीभंगी आयुष्य आपल्या वाटयाला येईल, या दिवास्वप्नात रहाल तर भयानक तोंडघशी पडाल आणि कुणी आधाराचा हात द्यायलाही नसेल – वेळ तर आपल्याला केव्हाच मागे टाकून पुढे निघून गेलेली असेल!

माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की, कृपाकरून याला माझी ’सिनेस्टाईल लेक्चरबाजी’ समजण्याची घोडचूक करू नका! माझं मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर निरतिशय प्रेम आहे, कारण भविष्यात आपली सोन्यासारखी मराठी भाषा आणि संस्कृति तेच जिवंत ठेवणार आहेत! तुमच्यावाचून म-हाटमोळया संस्कृतिच्या निरांजनातलं ’तेल’ संपायला वेळ लागणार नाही. ’पार्कर पेनाच्या भेटवस्तू वाटपाच्या निमित्तानं अक्षरश: जीव तोडून तुमच्या ह्रदयाला मी साद घालतोय, ती तुम्हाला निद्रेतून गदगदा हलवून जागं करण्यासाठी! एवढी एक गोष्ट जरी तुम्ही समजून घेतलीत, तरी मी स्वत:ला धन्य समजेंन.

एस्. एस्. सी. परीक्षा हे मित्रांनो, घराच्या उंबरठयाबाहेर टाकलेलं पहिलंवहिलं पाऊल असतं. पुढे अनेक पाऊलांची ’पायवाट’ लांबवर पसरलीय. म्हणून हे तुमचं ’शुभारंभाचं पाऊल’ यशाच्या दिशेकडे वळावं, हीच माझ्या बालमित्रमैत्रिणींसाठी माझी ईशचरणी प्रार्थना!

।। धन्यवाद ।।

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!!

आमचा पाचवा ग्रामीण मराठी तरुण बळी गेला, ‘राक्षसी’ पोलीसी चाचणीत….. एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला.

…….हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ?

लहानपणी आम्ही सर्कशीत ”मौत का कुवाँ“ हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो …. मात्र, असली ”मौत की दौड“ प्रथमच अनुभवतोयं…..

भरदुपारी रणरणत्या उन्हात आणि अतिरेकी दमट हवामानात, आमच्या मराठी तरुणांना, ही जीवघेणी 5 किलोमीटरची दौड, नेमकी पोलीसदलातल्या कुठल्या विकृत राक्षसांनी करायला लावली ? हप्त्याच्या पैशातून रात्री इंपोर्टेड प्यायलेल्या बिगरमराठी IPS पोलीस अधिकाऱ्यांची काय सकाळी उशीरापर्यंत झोप उडाली नव्हती; म्हणून आमच्या गरीब घरच्या मराठी तरुणांना दमट हवामानात व आग ओकणाऱ्या उन्हात धावायला लावलं त्यांनी ? 21-22 जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस; म्हणजे, आभाळात ढगांचं आच्छादन नसेलं तर, संपूर्ण जून महिना म्हणजे रणरणतं वाळवंट व त्यात भरीसभर म्हणून ‘जागतिक तापमानवाढीचे चटके’ ! जेव्हा, नुसतं रस्त्यानं चालणंसुद्धा म्हणजे, घामानं आंघोळ करणं आहे; तिथे, ही असली नोकरीसाठी ‘मरणा’ची धाव ???… त्या मराठी तरुणांना, ”भाग मिल्खा भाग“ म्हणत दौडत लावायला, ते काय ऑलिंपिक-मॅरॅथॉनचे धावपटू होते… जे, वर्षानुवर्षे लांब अंतराच्या धावण्याचा सराव करत असतात(या व्यावसायिक धावपटूंसाठीही अँब्युलन्स, ग्लुकोजचं पाणी, फर्स्ट-एड, डॉक्टर्स सारं काही असतं)…..??? पायात पेटके येत असताना…. छाती फुटायची वेळ आली तरी ते पुढे धावत राहीले; कारण, त्यांच्याच महाराष्ट्रात त्यांच्यासाठी मागे काही भविष्य शिल्लक राह्यलेलं नव्हतं म्हणून ! ”उच्चशिक्षित व कर्तृत्त्ववान माणूस झाला की, तो हमखास निर्दय, निष्ठूर व माणूसकीशून्य बनतो !“… त्याच पठडीतल्या या सर्व संबंधित माजोऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करणंसुद्धा सौम्य ठरेल; त्यांच्यावर ‘खुना’चाच गुन्हा दाखल केला गेला पाहीजे…..आणि, पोलीस-चाचणीचा हा असा अमानुष निर्णय घेण्यात, जर ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’…. म्हणून कुणी ‘मराठी’ पोलीस अधिकारी जबाबदार असतील तर, त्यांची प्रथम गाढवावरुन धिंड काढून मगच, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहीजे. प्रश्न दौड 5 कि.मी.ची ठेवायची की, नाही…. एवढ्यापुरता मर्यादित नाही. ती कशी ठेवायची, कधि ठेवायची हा ही महत्त्वाचा मुद्दा आहे…. शिवाय, यासंदर्भात इतर प्रांतीयांच्या तुलनेत, गरीबीमुळे उपनगरांच्या कोंडवाड्यात राहणाऱ्या, सामान्य मराठी तरुणतरुणींची ढासळत चाललेली शरीरयष्टी, हा ही चिंतेचा मुद्दा आहे, हे मुळीच विसरुन चालणार नाही(अनेक सर्वेक्षणांनी हा मुद्दा अधोरेखित केलेला आहे).

बरं, हे सर्व कशासाठी तर, एकूण रु.20000/- (हातात, जेमतेम रु.12000/-) रुपड्यांसाठी….. मुंबईतल्या 2,500 जागा भरण्यासाठी आमची 1 लाखाहून अधिक आणि, महाराष्ट्रातील एकूण 12,000 जागांसाठी तब्बल 4 लाखाहून अधिक, मराठी तरणीबांड पोरं स्पर्धक म्हणून भरउन्हात धावत सुटली…. जीवाची पर्वा न करता, ऊर फाटेस्तोवर धाव धाव धावली. 5 जण बळी गेले, याचा अर्थ, पाच-पन्नास हजाराहून अधिकांचे प्राण, ती तळपत्या उन्हातील जीवघेणी धाव पर्ू्ण करताना, कंठाशी आले असणार… नशिब बलवत्तर म्हणून ते वाचले म्हणायचे ! शेक्सपियरच्या कथेतला माणूस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धावता धावता मेला तो, खंडोगणती जमीन मिळवण्याच्या हव्यासापोटी आणि आमची मराठी पोरं धावताना मेली ती मात्र, फडतूस पोलीसी नोकऱ्यांसाठी…. ही प्रत्येक मराठी अंत:करणातली तडफड
आहे !

याचा अर्थ एक आणि एकच, …..‘मराठी-मरण’ महाराष्ट्रातच खूप स्वस्त झालयं…..

जगातील युद्धांचा इतिहास तपासून पाहीला तर, शत्रूपक्षाच्या हाती सापडलेल्या एखाद्या नागरिकाचा प्राण वाचविण्यासाठीसुद्धा राष्ट्राराष्ट्रांमध्ये युद्धं पेटलेली दिसतीलं… ‘कुन्न्याच्या मौतीनं मरण’, असं जे काही म्हटलं जातं…. ते अशाप्रकारच्या स्वस्त ‘मराठी-मरणा’पेक्षा वेगळं काही असू शकत नाही. लाखो शेतकऱ्यांच्या ग्रामीण आत्महत्या असोत वा शहरांमध्ये, आर्थिक-कोंडीतून सुटकेचा मार्ग सापडत नसल्यानं, सहकुटुंब होणाऱ्या घाऊक स्वरुपाच्या मराठी-आत्महत्या असोत, …. साऱ्या, या एकाच सदरात मोडतात.

गेल्या 40-45 वर्षांपासून, आमचा ‘मराठी-पाय’ मराठी राजकारण्यांच्या नौटंकी भाषणांच्या भुलभुलैय्यानं व त्यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सण-उत्सवांच्या ‘अफूच्या मात्रे’नं महाराष्ट्राच्याच लालकाळ्या मातीच्या दलदलीत खोल खोल फसत चाललायं….. पण, त्याला हे उमगेल, तर शपथ ! ‘अँटेलिया’सारखे डोळे फाडणारे ‘परप्रांतीय-धनवैभव’ मुंबई-महाराष्ट्राच्या नाक्यानाक्यावर-कोपऱ्याकोपऱ्यावर सामान्य मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून उभं राहत असतानाचं हे, मन भयंकर अस्वस्थ करणारं दाहक वास्तव आहे ! ….स्वतरूच्या आणि आपल्या कंपूच्या ‘राजकिय व आर्थिक’ फायद्यासाठी मराठी माणसाची पद्धतशीर ‘आर्थिक-कोंडी’ होऊ देण्याचं ‘पाप’, या महाराष्ट्रात मराठी माणसांच्या नांवाने 1969 सालापासून गळे काढणाऱ्या(पण, प्रत्यक्षात गळे कापणाऱ्या) व महाराष्ट्राची सत्ता भ्रष्ट ‘सहकारा’च्या माध्यमातून इतकी वर्ष वेडीवाकडी भोगणाऱ्या ढोंगी व दलाल ‘मराठी-राजकारण्यां’चं आहे ! गुजराथ्यांशी ‘बिझनेस-पार्टनरशिप’ करणाऱ्या मराठी राजकारण्यांच्या नादानं, ‘मराठी माणूस’ गुजराथ्यांच्या हातात ‘धनसत्ता’ तर केव्हाचीच देऊन बसलायं…. पण आता, ‘धनसत्ते’च्या बरोबरीनं ‘राजसत्ता’सुद्धा गुजराथ्यांच्या हातात देण्याचं ‘महापातक’ मराठी तरुणतरुणींनो, तुमच्या…. हो, तुमच्याच हातून घडतयं… घडलयं, ‘मोदी-सरकार’ला विजयी करुन आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात ‘धर्मराज्य पक्षा’सारख्या, केवळ तुमच्याआमच्या मराठी पिढ्यापिढ्यांच्या हितासाठी, ‘सतीचं वाणं’ हाती घेऊन राजकारणात पाय रोवू पाहणाऱ्या पक्षाला साफ लाथाडून……. ज्याला, इंग्रजी परिभाषेत ”सेल्फ-डिस्ट्रक्टीव्ह् मोड“ (Self&Destructive Mode) म्हणतात; म्हणजे, स्वत:च स्वत:चा सर्वनाश करायला निघण्याची प्रक्रिया…. ज्यासाठी, इतर बाहेरच्या शत्रूंनी काहीही करायची गरज नाही !

यापुढे, सर्वसामान्य मराठी तरुणांच्या जगण्याची किंमत यापेक्षा कधिही अधिक नसेलं….. ‘कंत्राटी पद्धतीतली गुलामगिरी’ नको(महाराष्ट्रातच नव्हे तर, संपूर्ण देशात; विशेषत:, नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये अन्याय-शोषणाचं थैमान घालणारी) …. त्यातलं ‘पोट मारणारं’ शोषण नकोय म्हणून, महाराष्ट्रातला सामान्य घरातला अर्धशिक्षित मराठी-तरुण जीवघेण्या चाचणी-परीक्षेचही दिव्य पार पाडायला ‘जीवावर उदार होऊन’ तयार झालाय हे महाराष्ट्रातील लांछनास्पद असं भीषण वास्तव, तुमच्या सगळ्या बदमाष राजकारण्यांकडून ‘लपवलं’ जातयं…. ती त्यांची राजकिय व आर्थिक सोय आहे ! जशी चोरट्या ‘बोक्या’ची नजर कायम ‘शिंक्या’वर असते; तशी, राजकारण्यांची ‘भ्रष्टाचारातून म्हणजेच लुटालुटीतून मिळणा-या पैशाकडे आणि निवडणुकीतल्या मतांकडे’ असते. त्यामुळे, ‘धंदेवाईक’ राजकारण्यांचे ‘हाकारे’ या संतापजनक घटनेनंतर, आपल्या पक्षाच्या शिडात हवा भरुन घेण्याइतपतच स्वाभाविकरित्या मर्यादित राहताना दिसतायतं ! महाराष्ट्रातच सामान्य मराठी-तरुणांची जी, ‘जगण्याचीच कोंडी’ झालीयं…. त्याला संपूर्ण नागवून, ज्या पद्धतीनं पूर्णत: हतबल व असहाय्य केलं गेलेयं…. त्याची साफ ‘कोंडी’ करुन त्याचं खच्चीकरण केलं गेलयं…. त्यांचं मूळचं स्वत:च एकमेव भांडवल असलेली ‘मराठी-नीतिमत्ता’, ……पद्धतशीररित्या या राजकारण्यांकडून त्याला कर्जबाजारी, व्यसनाधीनता व फुकटेपणाची सवय दीर्घकाळ जडवली जाऊन, साफ खलास केली गेलीयं…. हे भयानक वास्तव दडपण्यासाठी सध्या मराठी राजकारण्यांची आपापसात ‘नौटंकी चिखलफेक’ चाललीयं. यापैकी कोणालाही य:किंचितही महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांची फिकीर असेल; तर तो, मराठी तरुणांचं मूळ दुखणं असलेल्या, ‘नव-गुलामगिरी व नव-अस्पृश्यते’ समान असणाऱ्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’ विरुद्ध एल्गार पुकारेल व तिला नष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेलं…. झालायं आतापर्यंत असा काही प्रयत्न, या सर्वपक्षीय नौटंकी-राजकारण्यांकडून ? असं कधितरी होईल का, या राजकारण्यांच्या हातून, जे ‘कंत्राटी-कामगारपद्धती’तलं मराठी तरुणांच्या टाळूवरचच लोणी खातायतं ???

आता, सामान्य मराठी तरुणांनी, …….राजकारण्यांनी आणि गुजराथी धनाढ्या दुकानदार-व्यापाऱ्यांनी काळ्या पैशांतून लावलेल्या रोख रकमेच्या हव्यासापोटी, ठाणे-मुंबईसारख्या शहरांतून धोकादायक ”दहीहंडी“साठी किंवा फडतूस पोलीसी नोकरीसाठी जीवावर उदार होऊन प्राण पणाला लावायचे, बस्स् ! …… आणि, या सगळ्या भ्रष्ट-अमानुष ‘सिस्टीम’मधल्यांनी ‘कोंबड्यांची झुंज’ मजेत पहावी, तशी मराठी तरुणांच्या व्यर्थ लागलेल्या प्राणांच्या बाजीची मजा बघत ‘एंजॉय’ करायचं.

महाराष्ट्रात हे हरामखोर-पाजी अमराठी आएएस् आणि आयपीएस अधिकारी दिसणं, तेव्हाच बंद होईलय जेव्हा, महाराष्ट्राची संपूर्ण व्यवहाराची भाषा फक्त आणि फक्त मराठीच होईल…. मराठी तरुणांचे जीवन उध्वस्त करणाऱ्या अमराठी सरकारी अधिकाऱ्यांना आणि मातलेल्या शेठजींना, भैय्यांना आणि इतर सगळ्याच अमराठी भाषिकांना, एकतर ‘मराठी’ ही, जगण्याची-कुटुंबकबिल्याची भाषा बनवून, मराठी-संस्कृतित खऱ्या अर्थानं दुधातल्या साखरेसारखं प्रथमच पूर्णपणे विरघळावं लागेल(आजपर्यंत बोललं गेलं, तसं नकली-नौटंकी नव्हे !) …अन्यथा, महाराष्ट्रातून चालतं व्हावं लागेलं; अशी परिस्थिती आपणच निर्माण करायला हवी ! ज्या भारतीय राज्यघटनेचा आधार घेऊन हे परप्रांतीय षडयंत्र कित्येक दशकं महाराष्ट्रात फसफसत राह्यलयं, ती राज्यघटना आरपार बदलावी लागेल… त्या राज्यघटनेनचं घात झालायं मराठी माणसांचा !!! घटनेच्या कलमांचा जप करत, कोणीही आला आणि मराठी-संस्कृतिला ‘वाकुल्या’ दाखवत, महाराष्ट्राच्या छाताडावर आपलं घातकी अस्तित्व निर्माण करुन ठिय्या देऊन बसला !

ज्या 370 कलमामुळे काश्मीरची ‘काश्मीरियत’ आजवर वाचलीयं(मूळ काश्मीरी पंडितांना विस्थापित करणारा मुस्लीम आतंकवाद अत्यंत कठोरपणे मोडून काढला पाहीजे… यात वाद असूच शकत नाही; पण, तो स्वतंत्र वेगळा विषय आहे) तो ”काश्मीर-पॅटर्न“ किंवा तामीळ भाषाच व्यवहाराची भाषा करु पहाणारा ”तामीळनाडू-पॅटर्न“ आपल्याला घटनेत मोठा बदल करुन फार उशीर होण्याअगोदर आणावाच लागेल… काहींना यातून अराजक माजण्याची भिती वाटू शकेल; पण, या समुद्रमंथनातून जे काही घडेल, त्यातून महाराष्ट्रात फिरुन ‘महन्मंगल मराठी-संस्कृतिचा मंगलकलश’ कायमस्वरुपी नक्कीच महाराष्ट्राच्या हाती येईल ! …त्यातूनच केवळ देशाचं ऐक्य टिकू शकेल व एक ऐतिहासिक घुसळणं होऊन मराठी संस्कृतिच्या हिताच ‘नवनीत’ बाहेर पडू शकेल…जे काही घडेल ते, आजच्या तुमच्याआमच्या जगण्याच्या कोंडमाऱ्यापेक्षा नक्कीच चांगलं असेलं….. नाहीतरी, समर्थ रामदास म्हणालेच आहेत, ‘देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा !’… महाराष्ट्रातल्या ‘जेजुरी’चा खंडेराया मस्तकी धरुया आणि महाराष्ट्रभर अवघा हलकल्लोळ करुया…. जबाबदारी, मराठी-संवेदना अजून जागी असलेल्या प्रत्येक मराठी तरुणतरुणीची आहे ! एकदा भाषिक प्रांतरचना अनिवार्य झाली म्हटल्यावर, प्रत्येक राज्याच्या जन्मासोबतच त्याची पारंपारिक मातृभाषा(उदा. महाराष्ट्राची फक्त मराठी, तामीळनाडूची तामीळ, गुजरातची गुजराथी) हीच, संपूर्ण राज्यातल्या एकूणएक व्यवहारांची भाषा व्हायलाच हवी होती. स्वातंन्न्यप्राप्तीनंतरची ती घोडचूक, आपण ‘धर्मराज्य पक्षा’च्या माध्यमातून सुधारुया… दृष्ट लागलेल्या मूळ सोन्यासारख्या मायमराठी-संस्कृतिचा महाराष्ट्रभर गजर करुया आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक, जेजुरीचा खंडोबा, तुळजाभवानी, शिर्डीचे साईबाबा या महाराष्ट्रातल्या आराध्य दैवतांना हा ‘महाप्रसाद‘ अर्पण करुन खऱ्या अर्थानं त्या दैवतांना प्रसन्न करुया !!!

…. मुंबईसह महाराष्ट्र, मराठी माणसांचा आहे…. महाराष्ट्र म्हणजे, भय्ये, गुजराथी, मारवाड्यांची जहागिरी नव्हे !

आणि, समजा हे घडलं नाही…. मराठी माणूस गेली 40-45 वर्ष ज्या नौटंकी घराणेबाज राजकारण्यांच्या नादी लागत आपलं भविष्य, त्यांच्या हाती वेंधळ्यासारखं सोपवत आलायं, तसाचं तो याहीपुढे नादावत राह्यला; तर, महाराष्ट्राच्या छाताडावर आज चाललायं त्यापेक्षाही अधिक, अमराठींचा नंगानाच चालेलं….. उद्योग, व्यापार, धंदे…. गुजराथी-मारवाडी-सिंध्यांचे आणि शारीरिक श्रमाच्या नोकऱ्या कुठल्याही पगारात राबणाऱ्या ‘अस्तित्ववादी’ उत्तरभारतीयांच्या ! मराठी तरुणांना आपली संस्कृति सोडाच, पण आपलं साधं ‘अस्तित्व’ टिकवण्यापुरता तरी ‘कोपरा’ महाराष्ट्रात शिल्लक राहील का, हा यक्षप्रश्न आहे !

त्यांना त्याच्या महाराष्ट्रातच लपण्याच्या जागा शोधाव्या लागतील, एवढी वाईट अवस्था मराठी तरुणांसाठी नजिकच्या भविष्यात येऊ घातलीयं. तो, आज मुंबई-ठाण्याचा मध्यवर्ति भाग सोडून दूरदूर धापा टाकत पळतोयं… ती साधी बाब होती, असं उद्या म्हणावं लागेलं… कारण, उद्या हे पळणं, ‘महाराष्ट्रव्यापी’ होणार आहे…. कारण, केवळ नोकरी-धंदेच नव्हेत; तर, आता मराठी माणसांच्या ‘जमिनीचे सातबारे’सुद्धा फार मोठ्याप्रमाणावर झपाट्यानं ‘शेठजीं’च्या घशात चाललेतं… ते, तुमच्या धंदेवाईक, स्वार्थी व फसव्या राजकारण्यांमुळे !…… पोलीसी निवड चाचणीत धावताना दोन-पाच मराठी मोत्ये ‘गळाले’; पण, या ”महाराष्ट्रव्यापी पळपळीच्या शर्यतीत“ अख्ख्या महाराष्ट्राची आजची तरुण मराठी पिढी आणि भविष्यातल्या पिढ्या ‘गारद’ होणार आहेत, ही माझी भयसूचक पण, दुर्दैवानं फोल ठरु ‘न’ शकणारी भविष्यवाणी आहे…. !!!

पोलीसदलात शिरणाऱ्या… शिरु पाहणाऱ्या निदान मराठी तरुणांनी तरी, या अमानुष व भयानक घटनेनंतर मनाशी निर्धार केला पाहीजे की, ”मी पोलीस सेवेत कुठल्याही परिस्थितीत गैरमार्गाने व भ्रष्टाचाराने पैसा कमावणार नाही !“…. तरच, तुमच्या ‘अंतरीचा दिवा’ पेटता राहील व अशातऱ्हेच्या, तुम्हाला किंवा तुमच्या भाईबंदांना पोलीससेवेत असताना वा सेवेत दाखल होण्यापूर्वी, दिल्या जात असलेल्या अन्यायपूर्ण वागणुकीचा तुम्ही सनदशीर मार्गाने प्रतिकार करु शकाल !…. या दारुण घटनेनं, पोलीस सेवेतील कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी एका विधायक व सदैव कार्यरत राहू शकणाऱ्या, ‘संघटना-स्थापने’च्या आवश्यकतेला अधोरेखित केलेलं आहे… ती काळाची गरज आहे; हे पोलीसदलातील कर्मचाऱ्यांनी वेळीच ध्यानात घेतलं पाहीजे….

जय महाराष्ट्र। जय हिंद।।

राष्ट्रांतर्गत राष्ट्र…. स्वायत्त महाराष्ट्र ! संयुक्त महाराष्ट्रानंतर….. आता, स्वायत्त महाराष्ट्र !!!

…… राजन राजे (अध्यक्ष- धर्मराज्य पक्ष)