इडिकॉन, मुंबई कामगारांना मिळणार रूपये 14,440/- रूपयांची भरघोस वाढ.

दि. 24 – मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात, त्रैवार्षिक पगारवाढीचा विक्रमी करार संपन्न झाला. या करारामुळे, ‘‘इडिकॉन’’ कामगारांना रूपये 14,440/- रूपयांची भरघोस वाढ मिळणार आहे.

मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात 1 जानेवारी-2014 ते 31 डिसेंबर-2016 या त्रैवार्षिक पगार वाढीचा करार संपन्न झाला. यानुसार किमान रूपये 10,000/- तर, टंतपंइसम क्ण्।;टक्।द्ध रू. 4,440/- इतकी वाढ करण्यात आलेली आहे. सदर पगारवाढीपैकी 70 टक्के रक्कम ;च्थ्.ठेंमद्ध व उर्वरीत 30 टक्के रक्कम इतर भत्यात समाविष्ट करण्यात खास कामगार हिताचा फॉर्म्युला अमलांत आलेला असून पूर्ण वाढीव रक्कम ही 50:25:25 या पध्दतीने तीन वर्षात देण्यात येईल. या करारानुसार 5 ते 10 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 15 दिवसाची ग्रॅच्युईटी, तर 10 ते 15 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 20 दिवसाची ग्रच्युईटी, तसेच 15 ते 20 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 25 दिवासांची ग्रच्युईटी देण्यात आली, हे या कराराचे खास वैशिष्ट्या आहे. त्याचप्रमाणे निवृत्तीची वयोमर्यादा 58 वर्षावरून 60 वर्ष अशी 2 वर्षांने वाढविण्यात आली आहे. तसेच 22 कंत्राटी कामगारांपैकी 9 कामगारांना परमनंट केले असून उर्वरीत 14 कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देऊन, त्या कामगारांना सेवाकाळाप्रमाणे 20 लाख 50 हजार रूपयांची भरपाई देण्यात आली.

इडिकॉन कंपनीच्या वतीने करार करतांना, कंपनीचे मालक श्री. ऑब्री, व्यवस्थापक श्री. पद्माकर आठवले, श्री. मेलवीन फर्नांडीस हजर होते, तर ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या वतीने अध्यक्ष राजन राजे, महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव रूपेश पवार, खजिनदार अण्णा साळुंखे इत्यादी पदाधिकारी तसेच, कंपनी युनिटचे कमिटी सदस्य उपस्थित होते.

कराराप्रसंगी बोलतांना, महासंघाचे अध्यक्ष राजन राजे म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलमुळे, प्रती महिना रूपये 5,000/- ते 6,000/- चे वेतन देऊन, कामगारांची लुट करून, कंत्राटदारी-मजूरीसारख्या गुलामगिरीला व नव-अस्पृश्यतेला कामगारांना तोंड द्यावे लागणार आहे. अशावेळी महाराष्ट्रातल्या मराठी कामगारांमध्ये, राजकीय जागृतीचे भान, या करारामुळे येईल आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तीच, महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मुळावर आलेले चित्र बदलेल आणि या करारामुळे नवीन गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. सामान्य जनतेच्या दृष्टीने अत्यंत घातकी असलेल्या, खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण (खाउजा) या आर्थिक सुधारणांच्या तडाख्याने चैतन्यहीन झालेल्या कामगार चळवळीत केशव सुतांच्या तुतारीप्रमाणे ‘‘प्राण फुंकणारा’’ असा हा ‘इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि.’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’मधील क्रांतीकारी-करार असल्याचे कामगार क्षेत्रांत बोलले जात आहे. या करारानंतर, इडिकॉन, मुंबई येथील कंपनीतील कामगारांनी एकमेकांना मिठाई भरवून भरघोस पगारवाढीची दिवाळी साजरी केली.

संपर्क करा:

आपले मत नोंदवा