आण्विक अपघात पहिला स्मृतीदिन

गेल्या वर्षी ११ मार्च-२०११ रोजी जपानमध्ये झालेल्या फुकुशिमा-दायची या अणूऊर्जा प्रकल्पातील त्सुनामी पश्चात झालेल्या विनाशकारी आण्विक-अपघाताच्या प्रथम-स्मृतिदिनानिमित्त देशात व जगभरात ११ मार्च-रविवार रोजी अणूऊर्जेविरोधात मोठ्याप्रमाणावर निदर्शने करण्यात आली. कोकणातील प्रस्तावित १०,००० मेगावँट जैतापूर-आण्विकप्रकल्पाला या फुकुशिमा-स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर तीव्र विरोध दर्शविण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ने ठाणे शहरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी निदर्शनं केली.

” जपानला ठेच ….भारत शहाणा; होणार की, नाही??? ” हे या निदर्शनांचं मुख्य सूत्र होतं!  ठाणे-पूर्व(आनंद चित्रपटगृह), कोरम-मॉल, शासकिय विश्रामगृह, वर्तकनगर नाका, लोकमान्य नगर बसडेपो अशा एकूण पाच ठिकाणी धर्मराज्य पक्षाचे शेकडो कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे, अणूऊर्जा निषेधाची घोषणापत्रके व अणूऊर्जे संदर्भात जनजागृती करणारा १०० फूटी लांबलचक बँनर घेऊन सकाळ-संध्याकाळ ऊन्हातान्हात उभे होते. थ्री-माईल आयलंड(अमेरिका), चेर्नोबिल(रशिया) आणि फुकुशिमा-दायची(जपान) या जागतिक आण्विक-दुर्घटनांसोबत भारतातील किरणोत्सारी युरेनियम खनिज उत्खनन(जादूगोडा-झारखंड) ते अणूविद्युत-निर्मितीचे सर्व टप्पे व त्यांचे संपूर्ण सजीवसृष्टिवर व मानवी पिढ्यापिढ्यांवर होणारे व होत असलेले घातक परिणाम अत्यंत प्रभावीरित्या चितारलेले होते. जागोजागी ठाणेकर घोळक्याघोळक्यानं फारच औत्सुक्यानं बँनर पहात होते व ‘अणूविद्युत हे निसर्गाशी द्यूत’ असून अणूविद्युत ही ‘वरदान’ नसून अणूविद्युत ही ‘मृत्युदूत’ आहे…मानवजातीसह अवघ्या सजीवसृष्टीला ‘शाप’ आहे, हे नीट समजावून घेत होते. कालच्या निदर्शनांना मिळालेला उदंड प्रतिसाद व त्यातून होणारी जनजागृती पाहून अशाचतऱ्‍हेनं महाराष्ट्रात ठिकठिकाणी अणूऊर्जेविरोधात निदर्शने करण्याचा ‘धर्मराज्य पक्षा’ने निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद!

आण्विक अपघात पहिला स्मृतीदिन फोटो गॅलेरी

संपर्क करा:

आपले मत नोंदवा