घटना

घटनेची प्रस्तावना

भारतीय संस्कृतिचे राष्ट्रीय स्वभाव वैशिष्टय, प्रतिष्ठा आणि महात्मा गांधीच्या तत्वांच्या राज्यकारभारावर विश्वास/श्रद्धा असलेले आम्ही, भारतीय नागरिकांच्या ऐक्य, एकात्मता, शांतता, समृद्धि यासाठी व हे अबाधित राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून त्याचप्रमाणे राष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अन् धोरणात्मक/डावपेचात्मक पुनर्निर्माणा करीता,वचनबद्ध राहून, पवित्रतेने; गांभीर्याने; आणि दृढनिश्चयाने, आज वीस जून इसवी सन दोन हजार अकरा रोजी, आमच्या संघटनेच्या घटनेची रचना – आखणी करून, तसेच ती स्वीकारून, आम्ही ही घटना प्रस्थापित करीत आहोत.

घटना लागू करण्या बाबत :

भारत धर्म सभेच्या पहिल्या सभेनंतर, ह्या घटनेत तरतुद केल्याप्रमाणे घटनेच्या कार्यप्रणालीच्या तरतुदी संघटनेला लागू होतील. मुख्य समिती अजून गठीत होऊन प्रस्थापित व्हावयाची असल्यामुळे पहिली सभा होईपर्यंत, संस्थापक अध्यक्ष श्री. राजन राजे, हे ह्या अधिकाराची अंमलबजावणी करतील.

१.० संघटनेचे आदर्श आणि संघटनेची व्यक्तित्व ओळख

१.१ नाव

संघटनेचे नाव धर्मराज्य पक्ष असेल (ह्यापुढे धर्मराज्य पक्ष असे नमूद केले जाईल.) त्याचे संक्षिप्त स्वरूप उदा. धराप किंवा धर्मराज्य असे असेल.

१.२ ध्येय

भारतीय समाज संपूर्णपणे एकजिनसी, उद्योगशील, प्रभावी, समृद्ध – संपन्न, प्रबळ आणि सकारात्मक सांस्कृतिक वैशिष्टय़ांचा घडावा, तसेच आपला देश आणि संपूर्ण विश्व, सांप्रतेच्या पर्यावरणीय हानीमुळे होऊ घातलेल्या महाआपत्तिपासून वाचविण्यासाठी कार्य करण्याचे आमचे ध्येय आहे.

१.३ मोहीम

आमच्या पक्षाच्या ध्येयपूर्तीसाठी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणूकांमध्ये यशस्वीपणे सहभागी होऊन प्रारंभी महाराष्ट्रात आणि नंतर इतर राज्यांमध्ये आमच्या पक्षाचे सरकार स्थापण्याची आमची मोहिम आहे. आमचा पक्ष संसदेच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये सुद्धा सहभागी होईल.

१.४ नितिमुल्ये

अखिल मानवजातीसाठी, जगण्यावर, जगू देण्यावर आणि जगण्यासाठी मदत करण्यावर आमचा विश्वास आहे. भारताच्या सांस्कृतिक ऐक्यावर आणि सामाजिक एकात्मतेवर आमची श्रद्धा आहे.

कायद्याने प्रस्थापित झालेल्या, भारताच्या घटनेवर आणि सामाजिक समता, धर्मातीतता व लोकशाहीच्या तत्वांवर आमचा पक्ष खरी श्रद्धा व निष्ष्ठा ठेवून, भारताचे ऐक्य, एकात्मिकता आणि सार्वभौमत्व शिरोधार्य मानेल.

आमचा पक्ष करेल ती प्रत्येक कृति, हाती घेतलेले काम, कार्यक्रम, धोरण राबविताना, ते ज्ञान आणि विज्ञानाच्या भक्कम पायावर आधारित असेल. एखाद्या पुरातन धर्मग्रंथात म्हटले आहे किंवा निव्वळ कोणीतरी सांगितले म्हणून आम्ही कोणतीही गोष्ट करणार नाही. “डाव्या विचारसरणी”च्या खऱ्या अर्थाने आम्ही लोकशाहीवादी असण्याचा प्रयत्न करू.

भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या, भारताच्या प्रत्येक समाजाच्या, भारताच्या प्रत्येक राज्याच्या आणि भारताच्या प्रत्येक भागाच्या सर्वांग परीपूर्ण विकासावर आमचा विश्वास आहे. प्रारंभी आम्ही महाराष्ट्राच्या विकासाकरीता कार्य करू आणि नंतर भारतभर आमचे कार्य पसरवू.

भारताच्या एका भागातील एखाद्या मुद्यावर तोडगा काढताना त्याचा परिणाम अकारण भारताच्या दुसऱ्या भागावर होऊ नये म्हणून प्रशासकीय तसेच राजकीय सत्तेच्या विकेंद्रीकरणावर आमचा विश्वास आहे. “स्वायत्त संरचने”शी सुसंगत अशा सत्तेच्या अंतिम विकेंद्रीकरणासाठी भारताच्या घटनेत सुयोग्य दुरूस्त्या आणण्यासाठी आम्ही कार्यरत राहू.

निर्मिलेल्या साधन-संपत्तिच्या सुयोग्य वाटप करण्याच्या व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. भारतातील प्रत्येक कुटुब प्रतिष्ठित जीवनाचा दर्जा गाठल अशा प्रकारची आर्थिक मोबदल्याची प्रणाली आम्ही प्रस्थापित करू.

प्रत्येक राज्य सरकार, त्या राज्यातील जनतेच्या सर्वांग परीपूर्ण विकासा करीता प्रामुख्याने जबाबदार असल्याची आमचा विश्वास आहे.

आमच्या मते न्यायपालिका, प्रशासन, वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्या, आणि शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार हा शत्रूंच्या अतीरेकी कारवायांपेक्षा जास्त घातक/धोकादायक असून तो समाजातील राजकीय आणि समाजिक व्यवस्थांच्या ऱहासाचे मूळ कारण आहे. म्हणून भ्रष्टाचाराच्या बाबतीत शून्य सहनशीलता हा मार्ग आम्ही अंमलात आणू.

आमच्या मते भ्रष्टाचार म्हणजे असे कोणतेही हेतुपुरस्सर केलेले जास्तीचे कार्य किंवा हेतुपुरस्सर टाळलेले प्रस्थापित कार्य ज्याच्या फलस्वरूप काही विशिष्ट व्यक्ति, समाज किंवा संस्था अनावश्यकरित्या लाभान्वित होत असतानाच काही अन्य व्यक्ति, समाज किंवा संस्था त्यांच्या न्याय्य लाभापासून वंचित केल्या जात असतात. यातील लाभ किंवा हानि ही संधि, हक्क, संपत्ति, उत्पन्न, माहिती, पद किंवा हितसंबंध ह्याबद्दल असू शकते. समाजातील प्रत्येक आस्थापना, प्रत्येक सोय-सुविधा, प्रत्येक उत्पादन, प्रत्येक कार्य, कार्यपद्धति, आणि प्रत्येक सेवा ह्या संबंधित सर्व व्यवस्था पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रस्थापित केल्या जातील. आपले पर्यावरण आणि जैव – विविधतेचे जतन करण्यासाठी आम्ही अथक परिश्रम करू आणि ज्या जीवनशैलीमुळे, वापरलेल्या नैसर्गिक साधन – संपत्तिचा ऱहास भरून निघेल अशा जीवनशैलीचा आग्रह धरू.

१.५ संघटनात्मक कार्यपद्धतिची तत्वे

संघटना, तिच्या कार्य-पद्धतित; मुक्त, न्याय्य आणि पारदर्शक कार्य-संस्कृति प्रस्थापित करेल. प्रत्येक व्यक्तिला स्वतःचे विचार आणि मते व्यक्त करण्याची पुरेशी संधि दिली जाईल अन् त्या व्यक्तिचे विचार आणि मते ऐकून घेतली जातील. तथापि, निवडलेल्या नेतृत्वाचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.

एकात्मिक, आत्मविश्वासू, उद्योगशील, संपन्न-समृद्ध आणि मूल्याधारित संस्कृति विकसित करण्याचे सुस्पष्ट ध्येय लक्षून, संघटना त्यानुसार संघटनेची धोरणे, कार्य-कामगिरी, उपक्रम आणि कार्यक्रमांची योजना आखेल.

आमची संघटना कोणत्याही संशयास्पद किंवा लबाड-फसवणुकीची वृत्ती असलेल्या व्यक्तिकडून निधि स्वीकारणार नाही.

आमची संघटना आणि संघटनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्यात समाज आणि देश उभारणीचे कार्य करणाऱ्या लोकांना, कार्यचौकट; संपर्कजाळे; मदत-आधार; मार्गदर्शन आणि साधन-सामुग्री पुरविण्याचे जोरदार प्रयत्न करतील. संघटना, आपल्या कार्यात व कार्यपद्धतित न्याय्य पारदर्शकता राखेल आणि संघटनेच्या प्रत्येक सभासदाला, संघटनेच्या व तिच्या पदाधिकाऱयांच्या कृतिबद्दल कोणतीही माहिती मिळविण्याचा वा चौकशी करण्याचा अधिकार असेल.

आमची संघटना कोणत्याही प्रकारच्या ंिहंसक कृत्यांना कोणत्याही प्रकारे पाठींबा देणार नाही वा त्यात सहभागी सुद्धा होणार नाही.

१.६ विचारप्रवर्तक किंवा विशेष सल्लागार समिती :

महत्वाच्या विविध घटना-मुद्यांवर चर्चा करून सल्ला देण्यासाठी, संघटनेचे अध्यक्ष – जीवनाच्या वेगवेगळया क्षेत्रांमध्ये (उदा. खेळ, विज्ञान, व्यवसाय, वैद्यक, कायदा इत्यादि) कार्यरत असलेल्या, त्यांचे राजकीय संबंध विचारात न घेता, विख्यात व्यक्ति आणि-तज्ञ व्यक्तिंची विशेष सल्लागार समिती अथवा एका विचार प्रवर्तक व्यक्तिची नेमणूमक करू शकतात.

१.७ जेष्ठ व ज्ञानी परीक्षक मंडळ

कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त अकरा विख्यात व्यक्तिंचा समावेश असलेले ¬ जेष्ठ व ज्ञानी परीक्षक मंडळ, भारत धर्म सभेचे अध्यक्ष नेमतील. संघटनेने घोषित केलेल्या मूल्याधारीत कार्यप्रणालीनुसार संघटनेच्या कामगिरीची कठोर समीक्षा व विश्लेषण करून, त्याचा अहवाल भारत धर्म सभेला देण्याची जबाबदारी ह्या जेष्ठ व ज्ञानी परीक्षक मंडळावर असेल.

अध्यक्षांसह पक्षाच्या कोणाही सभासदाकडून त्याने केलेल्या कोणत्याही कृतिचे स्पष्टिकरण मागण्याचा अधिकार ह्या ¬ जेष्ठ व ज्ञानी परीक्षक मंडळाला असेल.

जेष्ठ व ज्ञानी परीक्षक मंडळालाच्या अहवालावर भारत धर्म सभा चर्चा करेल. संघटनेच्या अध्यक्षांना, सभा; अहवालावर आधारित मार्गदर्शक सूचना करेल.

१.८ उत्सव, सण-समारंभ आणि अभिनंदन कार्यक्रम साजरे करणे

संघटना आपला स्थापनादिन, कृष्ण जन्माष्टमी, नवीन कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणून विजया दशमी, नववर्षदिन म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा, ह्यांचे आयोजन करून हे दिवस साजरे करेल.

चांगल्या कार्याबद्दल अन् यशाबद्दल त्याची दखल घेऊन; संघटना तिच्या पदाधिकाऱयांचा, सभासदांचा, आणि इतर नागरिकांचा, अभिनंदन-सत्कार सोहळा आयोजित करण्याची प्रथा पाडेल.

पंचांगातील प्रत्येक महिन्याकरीता, विशिष्ट कार्यक्षेत्र/कार्यक्रम निश्चित करण्यावर भर देईल आणि त्यानुसार महिन्याचे उद्दिष्ट साध्य करण्याची प्रथा प्रस्थापित करेल.

१.९ आदेश पाळणे

भारताच्या निवडणूक आयोगाच्या सर्व नियम, कायदे, नियंत्रणे, सर्व हितावह आदेशांचे पालन आमची संघटना करेल. ह्या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी संघटनेच्या सरचिटणीसाची राहील.

१.१०

ह्या घटनेतील कोणत्याही शब्दप्रयोगाचा वा व्याख्येचा अर्थबोध, प्रस्थापित रूढीं, संघटनेची नितीमूल्ये, आशय व त्या शब्दप्रयोगाचा अर्थ ह्यावर संयुक्त आधारावर घेतला जाईल. कोणत्याही एखाद्या परिस्थितीत पक्षाच्या संहितेचा अर्थबोध करून घेण्याची आवश्यकता असल्यास, भारत धर्म सभा, सल्ल्यासाठी एक समिती नेमेल. असा अर्थबोध मान्य करण्यास, धर्मसभेमधे उपस्थित सभासदांच्या मतदानाची आणि सामान्य बहुमताची आवश्यकता असेल.

घटनेत दुरूस्ती करण्याचा कोणताही प्रस्ताव, सल्ल्यासाठी तज्ञसमितीला पाठविला जाईल. समिती तीन महिन्यात, तिच्या शिफारसी दाखल करेल. शिफारसी मिळाल्यानंतर, घटना दुरूस्तीचा सुयोग्य प्रस्ताव, भारत राष्ट्र सभेमधे दाखल केला जाईल.

घटनेतील कोणत्याही दुरूस्तीसाठी, उपस्थित सभासदांपैकी दोन तृतीयांश बहुमताची, जे धर्म सभेच्या सभासदांच्या ५०% हून कमी नसेल, ‘कलम १.४ – नितीमूल्ये’ मधे कोणतीही दुरूस्ती केली जाणार नाही.

१.११ पक्षाचे विलिनीकरण, विसर्जन

पक्षाच्या विलिनीकरण अथवा विसर्जनाच्या कोणत्याही प्रस्तावाच्या प्रसंगी, भारत धर्म सभा तिच्या सहयोगी उप-धर्मसभांच्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांसह एक विशेष सभा घेऊन त्या प्रस्तावावर चर्चा करेल, आणि असा ठराव संमत करण्या/होण्यासाठी, विशेष सभेच्या एकूण सर्व सभासदां पैकी कमीत कमी दोन तृतीयांश सभासदांच्या मंजूरीची आवश्यकता असेल.

१.१२ संपर्क, व्यवहार आणि नोंदीची भाषा

संपर्क व्यवहार आणि नोंदीसाठी प्रमुख भाषा म्हणून, पक्ष मराठीचा वापर करेल. काही परिस्थितीत मराठीचा वापर सुलभ किंवा शक्य नसेल त्यावेळी बदली भाषा म्हणून इंग्रजीचा वापर केला जाईल.

१.१३ धर्म व्याख्येचा अर्थ

आमच्या मते “धर्म” ही संकल्पना, पंथ अथवा “अध्यात्मिक विश्वास पद्धति” यांच्याशी संबंधित नाही तसेच विशिष्ठ ईश्वरनिष्ठा अशा संकुचित अर्थाने धर्म ही संकल्पना नाही. धर्म म्हणजे कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आम्हाला प्रकर्षाने वाटते की, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या अचूकपणे ओळखणे व विभागून घेणे हेच भारतीय समाजाच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यात आम्हाला वरील अर्थाने सुयोग्य धार्मिक पद्धती प्रस्थापित करावयाची आहे. इतर राज्यांतील संघटनांना ह्याच कल्पना, नितीमूल्ये आणि उपक्रम जर त्यांना त्यांच्या राज्यात राबवावयाचे असतील तर आम्ही त्यांना पाठींबा देवू.

१.१४ नेतृत्व आणि लोकशाही ह्या व्याख्यांचा अर्थ

आमचा विश्वास आहे की ज्या व्यक्ति, समाजाला मार्गदर्शन करून प्रगति अन् विकासाच्या मार्गावरून पुढे नेतात तेच नेते असतात. लोकप्रिय समजांविरूद्ध सत्य घोषित करण्याचे धाडस त्यांच्या आंतदृष्टिमुळे, त्यांच्यात असते. आम्हाला वाटते की लोकशाही म्हणजे, निर्णय घेण्यास आणि समाजाचे नेतृत्व करण्यास लोकप्रिय स्वीकार असलेल्या ‘व्यक्तिची-निवड’, करण्याची प्रणाली.

२.० पक्षाचे सभासदत्व आणि नेतृत्व

पक्षाच्या सभासदांना त्यांच्या क्षमता व सहभागावर आधारित मान्यता देण्यासाठी, पक्ष एक औपचारिक व्यवस्था प्रस्थापित करेल. पक्षात, सभासदांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे असेल.

अ. वर्ग : सामान्य सभासद

ब. वर्ग : क्रियाशील सभासद

क. वर्ग : कार्यकारी सभासद

ड. वर्ग : उप नेता

इ. वर्ग : नेता

उपरोक्त व्यवस्थे व्यतिरीक्त, नोंदणीकृत पाठींबा देणाऱयांची यादी, पक्ष ठेवेल. नोंदणीकृत पाठींबा देणाऱ्या व्यक्ति म्हणजे ज्यांचा पक्षाच्या तत्वप्रणालीवर विश्वास आहे पण वैयक्तिक कारणांमुळे जे पक्ष – सभासद होऊ शकत नाहीत.

पक्षाच्या मंजुरी आणि स्वीकाराच्या अटीवर, प्रत्येक नूतन सभासदत्व दिले जाईल. तथापि, सभासदत्व नाकारण्यास, भक्कम व पुरेसे कारण असावे लागेल.

वर्गीकरण केलेल्या उपरोल्लेखित सभासदत्वाच्या आवश्यकता खाली वर्णन केल्या आहेत.

२.१ पक्षाचे सामान्य सभासद

खालील अटींची पूर्तता करणारी, भारताचे नागरिक असलेली १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ति पक्षाची सामान्य सभासद होऊ शकते.

पक्षाच्या तत्वप्रणाली, ध्येय आणि नितीमूल्यांवर अशा व्यक्तिचा विश्वास हवा.

अशा व्यक्तिने हमीपत्र दिले पाहीजे की ती, सरकारी करांचा भरणा योग्य वेळेस करेल.

अशा व्यक्तिने पक्ष सदस्यत्वाची वर्गणी दिलीच पाहिजे.

अशी व्यक्ति पक्षाचे कार्यक्रम, उपक्रम आणि उमेदवारांच्या विरोधात काम करणार नाही. त्याचप्रमाणे पक्षाच्या तत्वप्रणालीच्या विरोधात असलेल्या कोणत्याही सामाजिक अथवा राजकीय संघटना/संस्थेची, अशी व्यक्ति सभासद किंवा कर्मचारी असता कामा नये.

अशी व्यक्ति इतर कोणत्याही राजकीय पक्षाची सभासद असता कामा नये.

वॉर्ड धर्म सभेच्या निवडणूकीत आणि स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभेच्या निवडणूकांमध्ये सामान्य सभासद मतदान करेल. पक्षाच्या कोणत्याही निवडणूकीत सामान्य सभासदाला एकच मत देता येईल. सामान्य सभासद, धर्म सभेत, परवानगी दिलेले पद, ग्रहण करू शकतो. सामान्य सभासद, पक्ष कार्याची व कार्यपद्धतिची कोणतीही माहिती मागू शकतो.

२.२ पक्षाचे क्रियाशील सभासद

खालील अटींची पूर्तता करून पक्षाचा कोणीही सामान्य सभासद क्रियाशील सभासद होऊ शकतो.

पक्षाच्या शिस्तीला शरण जाऊन आणि निवडलेल्या नेत्यांचे नेतृत्व मान्य करून, कोणीही सामान्य सभासद, क्रियाशील सभासद होऊ शकतो.

अशा व्यक्तिने दरवर्षी कमीत कमी, पक्षाच्या एका प्रशिक्षण वर्गात, एका सामाजिक कार्यक्रमात, एका उपक्रमात, आणि एका चळवळीत भाग घेतलाच पाहिजे.

पक्षाच्या ज्या मंडळाचा तो सभासद असेल त्या मंडळाच्या कमीत कमी ७०% सभांना तो हजर असलाच पाहिजे. जर कदाचित तो एका पेक्षा जास्त मंडळांचा सभासद असेल तर त्याने प्रत्येक मंडळाच्या निदान ५०% सभांना उपस्थिती राखलीच पाहिजे.

सामान्य सभासदाचे सर्व अधिकार क्रियाशील सभासदाला असतील आणि त्या व्यतिरीक्त, समान क्षमतांच्या बाबतीत सामान्य सभासदपेक्षा त्याला अग्रक्रम मिळाल्याचा आनंद घेता येईल.

तो/ती निवडणूकीशिवाय वॉर्ड धर्म सभेचा सभासद असेल. क्रियाशील सभासदाला पक्षांतर्गत कोणत्याही निवडणूकीत पाच मतांचा अधिकार असेल.

२.३ पक्षाचा कार्यकारी सभासद

महत्वाकांक्षी कार्यशील सभासद पक्षाचा कार्यकारी सभासद होण्याची महत्वाकांक्षा करू शकतो. असा सभासद, पक्षाला त्याच्या उमेदवारी बद्दल सुचना देईल. किंवा कार्यशील सभासदाच्या गुणांचे मूल्याकन करून, पक्ष नेतृत्व त्याला पक्षाच्या कार्यकारी सभासदत्वाचा उमेदवार म्हणून मान्यता देईल. अशा सर्व उमेदवारांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील कार्यक्रम वा उपक्रम नेमून दिले जातील. पक्षाचे कमीत कमी दोन उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर, हे उमेदवार; कार्यकारी सभासदत्वाची मान्यता मिळविण्यास पात्र ठरतील ही मान्यता, पक्षाच्या वरिष्ठ सभासदांनी केलेल्या कामाच्या पडताळणीच्या अटींवर अवलंबून असेल.

क्रियाशील सभासदाचे सर्व अधिकार कार्यकारी सभासदाला असतील आणि निवडणूकीविना तो तालुका/शहर धर्म सभेचा सभासद असेल.

पक्षाची शिस्त पाळण्याची शपथ, कार्यकारी सभासदाला दिली जाईल.

पक्षाच्या कोणत्याही अंतर्गत निवडणूकीत, कार्यकारी सभासदाला दहा मतांचा अधिकार असेल.

२.४ पक्षाचा उप नेताः

कोणीही कार्यशील सभासद अथवा कार्यकारी सभासद, जो प्रांत धर्म सभा ंिकंवा भारत धर्म सभा किंवा मोठया शहराच्या शहर धर्म सभेवर, सलगपणे दोन वर्षांकरीता नेतृत्व करण्यास निवडला/नमला गेला आहे तो पक्षाचा उप नेता म्हणून नेमला जाण्यास पात्र ठरेल.

कार्यकारी सभासदाला असलेले सर्व अधिकार, उप नेत्याला असतील आणि निवडणूकी शिवाय तो प्रांत धर्म सभेचा सभासद असेल.

उप नेत्याला त्याच्या पदाची शपथ दिली जाईल.

पक्षाच्या कोणत्याही निवडणूकीत, उप नेत्याच्या वीस मतांचा अधिकार असेल.

२.५ पक्षाचा नेता

पक्षाचा कोणीही क्रियाशील सभासद, जो प्रांत धर्म सभा किंवा महाराष्ट्रातील मोठय़ा शहरातील शहर धर्म सभेचे नेतृत्व करण्यास निवडला गेला आहे तो, नेता म्हणून नेमणूक होण्यास पात्र ठरेल. पक्ष नेत्याच्या नेमणूकीसाठी पात्र ठरण्याकरीता, उमेदवाराने जनतेच्या जीवनमानाचा किंवा उत्पादकतेचा दर्जा उंचावणाऱ्या लक्षणीय बदलाच्या आणि पक्षाची प्रतिमा उंचावणाऱ्या किंवा सुधारणाऱ्या किंवा पक्षाचा आवाका वाढवणाऱ्या, कमीत कमी दोन नावीन्यपूर्ण, यशस्वी संकल्पना निर्माण करून त्यांची अंमलबजावणी केलेली असली पाहिजे. सांप्रत नेत्यांची एक समिती, अंतिमतःअशा उमेदवाराची नेता म्हणून नेमणूक होण्यास, त्याच्या कामगिरीचा आढावा घेईल.

उप नेत्याचे सर्व अधिकार व हक्क, पक्षाच्या नेत्याला असतील अन् त्याशिवाय तो भारत धर्म सभेचा, निवडणूकीत भाग घेतल्याशिवाय, सभासद असेल.

नेत्याला, त्याच्या पदाची शपथ दिली जाईल.

पक्षाच्या कोणत्याही अंतर्गत निवडणूकांमधे नेत्याला शंभर मतांचा अधिकार असेल.

२.६ सभासदाच्या विकासाचे मार्ग

समाजात नेतृत्व करण्याचा सभासदांचा विकास साधण्याकडे, पक्ष विशेष लक्ष देईल. सभासदांच्या विकासाच्या हेतुने खालील प्रमाणे व्यवस्था असेल.

२.६.१ नेतृत्वाच्या संधि

नेतृत्व गुणांना झळाळी आणण्यासाठी, प्रत्येक सभासदाला, संघटनेच्या उपक्रम आणि कार्यक्रमात नेतृत्व करण्याच्या पुरेशा संधि, पक्ष देईल.

२.६.२ प्रशिक्षण

नेतृत्वाची विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी, पक्ष संघटना प्रशिक्षण आयोजित करेल.

२.६.३ व्यक्तिगत मार्गदर्शन

पक्षाच्या ज्येष्ठ सभासदांकडून नियमित आणि औपचारिकरित्या मार्गदर्शन घेण्याची पुरेशी संधि प्रत्येक सभासदाला दिली जाईल. इतर सभासदांना विकसित करणारा ज्येष्ठ सभासद, वरच्या पदाच्या सभासदत्वासाठी पात्र ठरेल.

२.६.४ पक्षांतर्गत संवाद

विकासाचे मार्ग म्हणून इतरांच्या अनुभव, यश वा अपयशात सामील होण्याच्या नियमित संधि, पक्ष संघटना सभासदांना देईल.

२.७ सभासद वर्गणी आणि इतर देणगी – सहाय्य

पक्षाचे सभासद त्यांची वर्गणी देतील, पक्षनिधीत आर्थिक सहभाग देतील आणि आवश्यकतेनुसार पक्षाच्या फडासाठी देणग्या मिळवतील. तपशील खालीलप्रमाणे :

कर भरल्यानंतरच्या उत्पन्नावर देणगी – सहाय्य निर्धारित केले जाईल

देणग्या मिळविणे सक्तिचे नाही पण त्याची प्रशंसा केली जाईल.

२.८ शिस्तभंगाच्या कारवाईबद्दलची तरतूद

पक्षाच्या कोणत्याही सभासदा विरूद्धची बेशिस्त, पक्ष – नितीमूल्यांची अवमानना, पक्ष, कार्यक्रम आणि पक्ष उमेदवार विरोधी कामे, संबंधित तक्रार, शिस्तभंग कारवाई समितीकडे पाठविली जाईल.

भारत धर्म सभेच्या प्रमुखांच्या अधिपत्त्याखाली भारत धर्म सभा शिस्तभंग कारवाई समिती निवडेल आणि त्यामध्ये ३ किंवा ५ सदस्य असतील.

कोणत्याही सभासदाने केलेल्या शिस्तभंगाची चर्चा करून, समिती, सभासदा विरूद्ध कारवाईचा प्रकार व प्रमाण ठरवेल. शिस्तभंग कारवाई समितीचा कोणताही निर्णय, पक्ष अध्यक्ष अंमलबजावणीसाठी स्विकारतील.

शिस्तभंगाच्या कारवाई बद्दल असमाधानी असा कोणीही पक्ष सभासद भारत धर्म सभेच्या सरचिटणीसा कडे त्याबद्दल दाद मागू शकतो आणि सरचिटणीस त्यांच्या एकटयाच्या अधिकारात, इतर पदाधिकाऱयांशी चर्चा करून, सुनावणी व उपायासाठी सभेपुढे ती बाब मांडू शकतात. सामान्य बहुमताने त्यावरील कारवाईचा निर्णय सभा घेऊ शकते.

२.९ सभासदत्व रद्द करणे

कोणाही सभासदाने केलेल्या गंभीर बेशिस्तीबद्दल त्याचे सभासदत्व रद्द करण्याची शिफारस, शिस्तभंग समिती करू शकते. सरचिटणीसांशी सल्लामसलत करून, उप नेत्याच्या खालच्या पदावरील कोणाही सभासदाला सहचिटणीस, सभासदत्व रद्द केल्याचा आदेश देतील.

गृह प्रांत सभेत उपस्थित सभासदांपैकी दोन तृतीयांश बहुमतानेच फक्त पक्षाच्या उप नेत्याचे सभासदत्व रद्द करता येवू शकेल. अशा प्रसंगी धर्म सभेत उपस्थित सभासदांपैकी जे मतदान करणार नाहीत, त्यांचा सभासदत्व रद्द करण्याला पाठींबा आहे असे समजले जाईल.

पक्ष नेत्याचे सभासदत्व, फक्त भारत धर्म सभेमधे उपस्थित सभासदांपैकी दोन तृतीयांश बहुमतानेच रद्द होवू शकते. अशा प्रसंगी धर्म सभेत उपस्थित सभासदांपैकी जे मतदान करणार नाहीत, त्यांचा दृष्टीकोण त्यांनी लेखी कळविल्या शिवाय, त्यांचा सभासदत्व रद्द करण्याला पाठींबा आहे असे समजले जाईल.

शिस्तभंगाच्या कारवाई बद्दल असमाधानी असा कोणीही सभासद, वरच्या पातळीच्या सभेच्या शिस्तभंग समितीकडे दाद मागू शकतो, भारत धर्म सभेच्या सभासदांच्या बाबतीत, सभेचे अध्यक्ष; पुनर्विचार करणारे अधिकारी असतील.

३.० पक्ष संघटनेची रचना

पक्ष संघटनेचा तळ प्रारंभी महाराष्ट्र राज्यात असेल पण नंतर तो देशाच्या इतर भागांमध्ये पसरेल.

पक्ष, देश पातळी;राज्य पातळी;प्रांत पातळी;शहर पातळी व वॉर्ड पातळी केंद्रांमधे संघटित केला जाईल. प्रत्येक पातळीवर, धर्म सभा; समित्या व कार्यकारी अधिकारी अशा स्वरूपात पक्ष अस्तित्वात असेल.

प्रत्येक धर्म सभा तिचा सभापति एक वर्षा करीता निवडेल. सांप्रत सभापति, माजी सभापति व भावी सभापति हे वरच्या पातळीच्या धर्म सभेचे, पदसिद्ध सदस्य असतील. कोणीही माजी सभापति पुनर्निवडणूकीस, प्रत्येक वेळी तीन वर्षांच्या कालावधी नंतर पात्र असेल.

प्रत्येक धर्म सभा तिचा अध्यक्ष व सरचिटणीस तिचे कार्यकारी अधिकारी म्हणून निवडेल. अध्यक्ष आणि सरचिटणीस, त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मदती करीता त्यांचे संघ निवडतील. अध्यक्ष, सरचिटणीस आणि त्यांचे संघ हे वरच्या पातळीच्या धर्म सभेचे पदसिद्ध सदस्य असतील.

सभेच्या अध्यक्षाला माहिती देण्यासाठी, प्रत्येक धर्म सभेत, विशिष्ट कार्यसमित्या निवडल्या जातील. समित्यांचे अध्यक्ष हे वरच्या पातळीच्या धर्म सभेचे पदसिद्ध सदस्य असतील.

धर्मसभेच्या सर्व समित्या एकत्रितरित्या कार्यकारी मंडळ म्हणून ओळखल्या जातील. कार्यकारी मंडळ धर्मसभेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली कार्य करेल.

भारतीय धर्मसभेचे अध्यक्ष पक्षाचे अध्यक्ष म्हणून ओळखले जातील.

३.१ भारत धर्म सभा

भारत धर्म सभा हे पक्षाचे सर्वश्रेष्ठ प्रातिनिधिक मंडळ असेल. सभा देश पातळीवरील नैतृत्वाची निवड करून त्याला पाठींबा देईल. प्रारंभी, पक्ष भारतभर विस्तारे पर्यंत महाराष्ट्र पातळीवरील सभेला भारत धर्म सभा संबोधिले जाईल.

पक्ष स्थापने नंतर आणि इतर राज्यात पुरेसा विस्तार झाल्यानंतर, भारत धर्म सभा स्वतंत्र मंडळ म्हणून स्थापन केले जाईल.

३.२ राज्य धर्म सभा

राज्य धर्म सभा हे पक्षाचे राज्यातील सर्वश्रेष्ठ प्रातिनिधिक मंडळ असेल. सभा राज्य पातळीवरील पक्ष नेतृत्व ाची निवड करून त्याला पाठींबा देईल.

प्रस्थापित झालेल्या मतदार संघातील प्रांत धर्म सभेने निवडलेल्या अंदाजे १५०० सभासदांचा राज्य धर्म सभेमध्ये अंतर्भाव असेल. प्रत्येक प्रांत धर्म सभा अंदाजे १०० सभासद प्रांतातून निवडेल.

संपूर्ण राज्याशी संबंधित प्रश्न/विषयांवर सभा चर्चा करेल आणि समीक्षा करून संपूर्ण राज्याकरीता धोरणांची आखणी करेल.

सभापतींच्या नेतृत्वाखाली, कामगिरीचा आढावा घेण्यासाठी, अध्यक्ष, सरचिटणीस आणि विविध समित्या पुढे चालु ठेवण्यास अनुमति देण्यासाठी, धोरणातील बदलांना आणि नवीन धोरणांना अनुमति देण्यासाठी, सभा वर्षातून कमीत कमी एकदा बैठक भरवेल.

३.३ प्रांत धर्म सभा

प्रांत धर्म सभा ही पक्षाची प्रांत पातळीवरील प्रातिनिधिक मंडळ असेल आणि ही सभा प्रांत पातळीवरील पक्ष नेतृत्वाची निवड करून त्याला पाठींबा देईल.

प्रांत धर्म सभा प्रांत पातळीचे प्रश्न हाताळून, प्रांतासाठी कार्यक्रम व उपक्रमांची योजना आखेल.

पक्षाच्या कार्यशील सभासदांमधून आणि त्यांच्या मतदार संघातील सभासदांमार्फत, प्रांत धर्म सभेचे सभासद निवडले जातील.

राज्य धर्म सभेसाठी प्रांत धर्म सभेचे सभसद त्यांचे प्रतिनिधी निवडतील अभौगोलिक मतदार संघातील प्रतिनिधी, ते प्रतिनिधीत्व करीत असलेल्या मतदार संघाचे सभासद असतील.

सभापतींच्या नेतृत्वाखाली प्रांत धर्म सभा तिच्या अध्यक्षांच्या, सरचिटणीसांच्या आणि वेगवेगळया समित्यांचा कामगिरी विषयी चर्चा करेल, आणि कार्यालयात त्यांना पुढे काम चालु ठेवण्यास अनुमति देण्यास, सभा वर्षातून कमीत कमी दोनदा बैठक भरवेल.

३.४ शहर धर्म सभा/तालुका धर्म सभा

तालुका धर्म सभा ही तालुका पातळीवरील प्रातिनिधीक संस्था असेल आणि तिचे २०० – ३०० सभासद असतील. नगर परिषद वा नगर पालिका असलेल्या शहरांची वेगळी धर्म सभा असेल आणि छोटी गावे व खेडी तालुका धर्म सभेत समाविष्ट असतील.

तालुका/शहर पातळीवर धर्म सभा, पक्ष नेतृत्वाची निवड करून त्याला पाठींबा देईल.

त्यांच्या संबंधित क्षेत्राशी निगडीत प्रश्न हाताळून, तालुका/शहर धर्म सभा कार्यक्रम व उपक्रमांची योजना आखेल.

ग्राम धर्म सभेने निवडलेले प्रतिनिधी, तालुका धर्म सभेचे सदस्य असतील. अभौगोलिक मतदार संघाचे प्रतिनिधी, संबंधित प्रतिनिधीक संस्थेकडून निवडले जातील.

वॉर्ड धर्म सभेने निवडलेले प्रतिनिधी शहर धर्म सभेचे सभासद असतील. अभौगोलिक मतदार संघाचे प्रतिनिधी, संबंधित प्रातिनिधीक संस्थेकडून निवडले जातील.

सभापतींच्या नैतृत्वाखाली, अध्यक्ष, सरचिटणीस आणि वेगवेगळया समित्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन, त्यांना पुढे कार्य चालु ठेवण्याबद्दल चर्चा करण्यासाठी, सभा दर तीन महिन्यांनी बैठक भरवेल.

३.५ वॉर्ड/ग्राम धर्म सभा

वॉर्ड/ग्राम धर्म सभा ही वॉर्ड वा ग्राम पातळीवरील प्रातिनिधीक संस्था असेल आणि वॉर्ड/ग्राम विभागातील पक्ष सभासदांनी निवडलेले २० – ३० जण ह्या धर्म सभेचे सभासद असतील.

सभेच्या कार्याला बळकटी आणण्यासाठी शहर/वा तालुका धर्म सभेचा प्रमुख जास्तीत जास्त, बाहेरील तील सभासदांची नेमणूक करू शकतो.

त्यांच्या सबंधित क्षेत्रांशी निगडीत उपक्रम व कार्यक्रम राबवून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सभेवर असले.

वॉर्ड धर्म सभा, शहर धर्म सभेवरील त्यांचे प्रतिनिधी निवडेल.

अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली, वॉर्ड धर्म सभा दर महिन्यात बैठक घेईल.

पक्ष संघटना खाली दिलेल्या प्रातांमध्ये विभागली जाईल :

पूर्व विदर्भ प्रांत : भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली आणि नागपूर, जिल्हय़ांच्या क्षेत्राचा समावेश.

पश्चिम विदर्भ प्रांत : वर्धा,यवतमाळ,अमरावती,वाशिम आणि अकोला जिल्ह्यांच्या क्षेत्राचा समावेश.

उत्तर मध्य प्रांत : बुलढाणा,जळगाव,औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांच्या क्षेत्राचा समावेश.

मध्य प्रांत : अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांच्या क्षेत्राचा समावेश.

दक्षिण मध्य प्रांत : नांदेड,हिंगोली,परभणी,बीड आणि लातुर जिल्ह्यांच्या क्षेत्राचा समावेश.

उत्तर प्रांत : नंदुरबार,धुळे आणि नाशिक जिल्हय़ांच्या क्ष़ेत्राचा समावेश.

मुंबई प्रांत : मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांच्या क्षेत्राचा समावेश.

कोकण प्रांत : रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या क्षेत्राचा समावेश.

दक्षिण प्रांत : सातारा,सांगली,कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या क्षेत्राचा समावेश.

सभासदत्व आणि प्रतिनिधीत्व

आधीच ठरविलेल्या प्रमाणात, प्रत्येक धर्म सभेला, समाजाच्या वेगवेगळया भागांमधे खालील प्रमाणे प्रतिनिधीत्व असेल.

अनु.क्र मतदार संघ महाराष्ट्र प्रांत शहर वॉर्ड
निवडणूकी मार्फत प्रतिनिधी ४०% ४०% ४०% १००%
उद्योजक व इंटरप्युनर ४% ४% ४%
व्यवसायिक ४% ४% ४%
सहकारी/क्षेत्रातील प्रतिनिधी ४% ६% ४%
कामगार/कर्मचारी ६% ६% ४%
शेतकरी ६% ६%
इंजिनिअर्स ३% ३% ३%
लेखा परिक्षक २% ३% ३%
कायद्याचे वकील २% ३% ३%
१० शिक्षक ४% ३% ४%
११ डॉक्टर्स व वैद्यकीय व्यवसायिक ४% ३% ४%
१२ निवृत्त न्याय अधिकारी १% १% २%
१३ निवृत्त सेनादल अधिकारी २% २% ३%
१४ निवृत्त पोलिस अधिकरी २% २% ३%
१५ निवृत्त सनदी अधिकारी २% २% ३%
१६ खेळाडू १% २% १%
१७ करमणूक उद्योग क्षेत्र २% २% १%
१८ साहित्य लेखक २% २% १%
१९ शास्त्रज्ञ व संशोधक ४% २% २%
२० बिनसरकारी संस्था ४% २% ४%
२१ महिलांचे प्रतिनिधी १% २% ७%

निर्देशिलेला प्रत्येक अभौगोलिक मतदारसंघ प्रातिनिधीक संस्था किंवा सभेतर्फे प्रतिनिधीत्व करेल. अशा प्रतिनिधीत्व संस्था, त्यांच्या प्रतिनिधींच्या निवडणूकित मतदार असतील. तथापि, अशी संस्था प्रस्थापित होऊन कार्यरत होईपर्यंत संस्थापक अध्यक्ष, मतदार संघासाठी प्रतिनिधींची नेमणूक करेल.

टक्केवारीवर आधारित जागांचा हिशोब करताना, कोणताही अपूर्णांक दशमान पद्धतीनुसार एक एकक गणला जाईल. सर्व धर्म सभा अविरत कार्य करणाऱ्या संस्था असतील आणि सभासदांचा कार्यकाळ पालक संघटनेतर्फे ठरविला जाईल. सूक्ष्म प्रतिनिधीत्व विभागणी, मतदार संघाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून, मुख्य सचिवा तर्फे ठरविली जाईल.

३.६ धर्म सभेतील महत्वाच्या समित्या

१. कायदेविषक २. महसुल आणि वित्तविषय
३. बँकिंग, कर्ज आणि विमा ४. शिक्षण
५. आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा ६. रस्ते आणि सार्वजनिक कामे
७. मुद्रण आणि प्रकाशन ८. संस्कृतिक आणि सांस्कृतिक चळवळी
९. दूरसंचार संपर्क १०. उद्योग क्षेत्र आणि रोजगार
११. हॉटेल्स,रास्टॉरंटस् आणि खाद्यगृहे १२. विद्युत शक्ति
१३. पाणी पुरवठा आणि सिंचन १४. सरकारी प्रशासन
१५. पर्यावरण १६. अन्न आणि अन्न उद्योग
१७. शहर रचना आणि इमारत बांधकाम १८. भाषा
१९. बिन सरकारी संस्था व सामाजिक सेवा २०. रोजगार आणि कामांची परिस्थिती
२१. परिवहन २२. दूरदर्शन आणि ध्वनि-चित्र माध्यम
२३. शेती,फलबागायती, शेत-उत्पादन व प्रक्रिया २४. खेळ
२५. तरूणाईच्या घटना आणि चळवळी २६. धर्म आणि धार्मिक घटना
२७. खाणकाम आणि खनिजे २८. सहकारी चळवळी
२९. माहितीचा अधिकार ३०. सुरक्षा,कायदा आणि व्यवस्था
३१. दुकाने,नागरी पुरवठा आणि वितरण प्रणाली.

धर्मसभेचे सभापति, सभेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्याशी चर्चा करून सभेअंतर्गत असणाऱ्या समित्यांच्या अठना बद्दल तसेच त्यांच्या सदस्य संख्येबद्दल निर्णय घेतील.

उपरोक्त समित्यांपैकी प्रत्येक समितीकडे, आवश्यकतेनुसार कमीत कमी तीन ते जास्तीत तास्त अकरा सभासद असतील. प्रत्येक समिती तिचा अध्यक्ष निवडेल जो समितीच्या कामकाज व ध्येयपूर्तीसाठी जबाबदार असेल.

समित्यांच्या जबाबदाऱ्या अशा असतील :

१. समाज आणि सरकारी संस्थांच्या त्यांच्या क्षेत्रातील कामगिरी व विकासावर देखरेख करणे.

२. चर्चा,वाटाघाटी-विचारमंथन, प्रायोगिकता आणि प्रकाशने हय़ांना मदत करून ते सुलभ – सोपे करणे.

३. धोरणात्मक मार्गदर्शन, कार्यक्रम आणि उपक्रम तयार करणे.

४. नियम आणि नियंत्रणांच्या अंमलबजावणीची खात्री करण्यासाठी परिक्षण.

५. विकासाकरिता कार्यवाही आणि चळवळींची योजना आखणे.

६. सर्वांगीण विकासाची खात्री करणे.

३.७ कृति दले, विशेष अधिकारी, नेमून दिलेल्या विशिष्ट कामांसाठी समित्या.

कोणत्याही धर्म सभेचा प्रमुख, आवश्यकता वाटल्यास, कृति दले, विशेष अधिकारी, नेमून दिलेल्या विशिष्ट कामांसाठी समित्या तयार करून नेमू शकतो. तथापि अशा सर्व नेमणूकींची नोंद आणि दस्तावेज ठेवले जातील.

३.८ प्रत्येक धर्म सभेचे महत्वाचे कार्यालयीन – पदाधिकारी

सभेचे कामकाज योग्य प्रकारे होण्याची खात्री करण्यासाठी प्रत्येक धर्म सभा तिचा सभापती निवडेल. आपल्या क्षेत्रातील पक्ष कार्याचे नेतृत्व करण्यासाठी सुद्धा प्रत्येक धर्म सभा तिचा अध्यक्ष व सरचिटणीस निवडेल. ह्या व्यतिरीक्त, भारत धर्म सभा तिच्या खजिनदाराची थेट निवड करेल. निवडलेले अध्यक्ष व सरचिटणीस जबाबदाऱ्या पार पाडताना मदतीसाठी त्यांचे संघ निवडतील. जोपर्यंत धर्म सभेचा विश्वास संपादन केलेले असेल तोपर्यंत सर्व कार्यालयीन अधिकारी धर्म सभेचे काम करीत रहातील. आवश्यक प्रसंगी किंवा विशिष्ट गरजे करीता, सभा एका पेक्षा जास्त सरचिटणीस निवडू शकते.

कार्यालयीन अधिकाऱयांच्या जबाबदाऱ्या आणि इतर तपशील खालील प्रमाणे असेल.

३.८.१ सभापति :

पक्षाची ज्येष्ठ व्यक्ति सभेचा सभापति असेल जी, धर्म सभांच्या प्रचार-संकेतांचे संघटन करण्यास व धर्म सभा पक्षाची शिस्त व कार्य – पद्धति सांभाळत असल्याची खात्री करण्यास, जबाबदार असेल. सभापतींचा कार्य – काळ एक वर्षाचा किंवा पुढील वर्षीच्या पहिल्या बैठकी पर्यंत, जेव्हा नवीन पक्ष प्रमुख सूत्रे ग्रहण करेल. कोणीही माजी पक्ष प्रमुख पुनर्निवडीला तीन वर्षांच्या खंडा नंतर पात्र असेल.

३.८.२ धर्म सभा अध्यक्ष :

पक्ष सदस्यांना त्यांच्या क्षेत्रातील ध्येय आणि मोहीम प्रत्यक्षात आणावयाला, धर्म सभा अध्यक्ष नेतृत्व करतील. अध्यक्षांना उपाध्यक्षांना मदत करतील. स्वतःच्या कामगिरीबद्दल, अध्यक्ष धर्म सभेला जबाबदार असेल.

३.८.३ उपाध्यक्ष – कार्यक्रम आणि उपक्रम

पक्ष तत्वप्रणालीच्या अनुरोधाने कार्यक्रम आणि उपक्रम राबवून पक्षाचे ध्येय साकारण्याची जबाबदारी, उपाध्यक्ष – कार्यक्रम आणि उपक्रम हय़ांची असेल.

३.८.४ उपाध्यक्ष – सभासदत्व वृद्धि

परिस्थिती, गरजा आणि अन्य परिस्थितीजन्य घटक ओळखून, सभासदत्वाचा पाया विकसित करण्याची जबाबदारी उपाध्यक्ष – सभासदत्व वृद्धि हय़ांची असेल. इतर राजकिय पक्षांच्या होतकरू सभासदांची भविष्यातील ऐक्याच्या दृष्टीने ते नोंद करून ठेवतील.

३.८.५ उपाध्यक्ष – स्वयंसेवक

स्वयंसेवक मिळवून त्यानां पक्ष कार्यासाठी साभांळून ठेवण्याची जबाबदारी उपाध्यक्ष – स्वयंसेवक, हय़ांची असेल.

३.८.६ उपाध्यक्ष – साधन, सामुग्री

पक्ष संघटनेचे कार्य अविरतपणे चालू राहण्यासाठी, साधने, सामुग्री मिळवून; जतन करण्याची जबाबदारी उपाध्यक्ष – साधने, सामुग्री हय़ांची असेल. साधने, सामुग्रीमध्ये वाहने, कार्यालय/प्रशिक्षण/संपर्क, संवाद, निवास हय़ा बाबींचा समावेश असेल.

३.८.७ उपाध्यक्ष – प्रशिक्षण

पक्ष संघटनेच्या सभासद व स्वयंसेवकांच्या विकासासाठी, प्रशिक्षण कार्यक्रमांची रचना – आखणी व आयोजन करून, ते राबविण्याची जबाबदारी उपाध्यक्ष – प्रशिक्षण हय़ांची असेल.

३.८.८ उपाध्यक्ष – निधी संकलन

पक्ष संघटनेच्या कार्यासाठी निधीसंकलन करण्यासाठी तसेच अनुशंगाने संबंधित सामाजिक संबंध विकसित करण्याची जबाबदारी, उपाध्यक्ष – निधी संकलन हय़ांची असेल.

३.८.९ उपाध्यक्ष – नेतृत्व विकास

पक्ष संघटनेच्या सर्व कार्य – कामगिऱयांमध्ये सभासदांमधील नेतृत्व गुणांचा विकास करण्याची जबाबदारी, उपाध्यक्ष – नेतृत्व विकास ह्यांची असेल.

३.८.१० उपाध्यक्ष – कायदेशीर पाठींबा

पक्ष संघटनेच्या सर्व कार्यात व सभासदांना कायदेशीर बाबींचा सल्ला, मार्गदर्शन व मदत देण्याची जबाबदारी उपाध्यक्ष – कायदेशीर पाठींबा हय़ांची असेल.

३.८.११ सरचिटणीस

पक्ष संघटनेची वाटचाल, आखणी आणि नियम व नियंत्रणे यानुसार होत आहे हे पहाण्याची जबाबदारी सरचिटणीस व त्यांच्या संघाची असेल. त्यांच्या संघात, सह चिटणीस आणि खजिनदार यांचा समावेश असेल. नेमून दिलेल्या जबाबदाऱयांच्या कामगिरी बद्दल सरचिटणीस, धर्म सभेला उत्तरदायी असतील.

३.८.१२ सहसचिव – संघटना

संघटनेची सर्व धोरणे, कार्यपद्धति, उपक्रम, कार्यक्रम, कामगिरी वगैरेंच्या नोंदी ठेवण्याची जबाबदारी सहसचिव – संघटना हय़ांची असेल. कामगिरींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते सर्व सभासदांच्या हालचालींची सुद्धा नोंद ठेवतील.

३.८.१३ सहसचिव – सभासदत्व

सर्व सभासदांची, त्यांच्या वर्गणीची नोंद ठेवून वेळोवेळी सभासदांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची जबाबदारी ह्यांची असेल.

३.८.१४ सहसचिव – तक्रार निवारण

तक्रारी व गाऱहाणी स्वीकारून, त्यांचा पाठपुरावा करून, निवारण करण्याची जबाबदारी हय़ांची असेल.

३.८.१५ खजिनदार

पक्षनिधी जमा करून त्याचा विनियोग करण्याची जबाबदारी खजिनदाराची असेल. प्रस्थापित हिशोब पद्धती प्रमाणे पक्षनिधीच्या नोंदी ठेवण्याची जबाबदारी खजिनदाराची असेल.

३.८.१६ मतदार समन्वयक

नगर परिषद, नगर पालिका, राज्य विधान सभा आणि लोकसभेच्या प्रत्येक मतदार संघाकरीता एक मतदार समन्वयक नेमलेला असेल. मतदार संघातील मुख्य व्यक्तिची जबाबदारी असेल की तिने निवडणूकीच्या दृष्टीने, मतदार संघात होणाऱ्या घटनांचा मागोवा घेणे.

३.९ तात्पुरते किंवा हंगामी कार्यालयीन अधिकारी

वरिष्ठ पातळीच्या धर्म सभेचे अध्यक्ष, पक्षाचे पुरेसे सभासदत्व नसलेल्या भागात, हंगामी अध्यक्ष व सरचिटणीस, त्या भागा करीता नेमतील. हंगामी कार्यालयीन अधिकाऱयांचा कार्यकाल जास्तीत जास्त एक वर्षाचा असेल ज्यामध्ये, त्या भागात पक्ष संघटनेची शाखा स्थापण्याची स्पष्ट अट असेल.

अशा हंगामी अधिकाऱयांना मर्यादित अधिकार असतील व नेमून दिलेल्या परिघा बाहेरील कामगिरीसाठी त्यांना प्रत्येक वेळी वरीष्ठ धर्म सभेच्या अध्यक्षांची संमति घ्यावी लागेल.

३.१० धर्म सभा बैठक

खालील मार्गदर्शक तत्वाप्रमाणे प्रत्येक धर्म सभा तिची बैठक घेईल.

सभेचे सभापति बैठकीच्या तारखा आणि ठिकाण ठरवतील. बैठकीचे आयोजन करण्याची जबाबदारी सरचिटणीसांची असेल. अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱयांच्या सोयीचा विचार, सभापति करतील कोणत्याही वाद प्रसंगी, उच्च पातळीच्या धर्म सभा प्रमुखाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.

भारत धर्म सभेच्या बैठक आयोजनाच्या वादात, ज्या वेळी वीस टक्के सभासदांपेक्षा जास्त सभासदांनी बैठकीला हजर रहाण्यास असमर्थता व्यक्त केली नसेल हय़ा अटीवर, धर्म सभेच्या अध्यक्षांचा निर्णयअंतिम व बंधनकारक असेल, आणि कोणत्याही परिस्थितीत मागील बैठकी नंतर १३ व्या महिन्याच्या पुढे, बैठक ढकलली जाणार नाही. कोणत्याही जास्त गुंमागुंतीच्या प्रसंगी, मागील बैठकीच्या पहिल्या दिवसा पासूनच्या ५५व्या आठवडय़ातील सोमवारी बैठक घेतली जाईल.

कोणत्याही धर्म सभेचे कामकाज आयोजित करण्यास, एकूण सभासदत्वाच्या एक तृतीयांश उपस्थिती असावी लागेल.

धर्म सभेच्या बैठकीत खालील कामकाज केले जाईल.

१. वर्षातून एकदा तरी, धर्म सभेने स्थापन केलेल्या समित्या, त्यांचे कामकाज आणि योजना, धर्म सभेला सादर करतील.

२. वर्षातून एकदा तरी, धर्म सभेचे अध्यक्ष व सरचिटणीस, त्यांचे कामकाज आणि योजना धर्म सभेला सादर करतील.

३. धर्म सभा सदस्यांच्या शंका/चौकशीं बद्दल, त्या त्या समित्यांचे प्रमुख, अध्यक्ष, आणि मुख्य सचिव सविस्तर माहिती/उत्तरे देतील.

४. संबंधित समितीशी कोणताही मुद्दा वा प्रश्नावर चर्चा करण्याची संधि सभासदांना बैठकीमध्ये मिळेल.

५. पुढील वर्षाचे बजेट व योजना, यावर धर्मसभेमधे चर्चा केली जाईल;

६. धर्म सभा सद्य परिस्थिती आणि त्याच्या विश्लेषणाची चर्चा करेल.

४.० निवडणूका :

धर्म सभेचे सभासद, अध्यक्ष आणि सरचिटणीस, तसेच विविध समित्यांवर सभासद निवडण्यासाठी, धर्मसभा, संघटनात्मक निवडणूका घेईल.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूकांसाठी सुद्धा, पक्षांतर्गत निवडणूक घेतली जाईल.

४.१ संघटनांतर्गत निवडणूक

धर्म सभा सभापतींच्या नैतृत्वाखाली, बैठकीच्या वेळी संघटनांतर्गत निवडणूका घेतल्या जातील. निवडणूका घेतलेल्या बैठकी पासून निवडलेल्या सभासदांच्या सभासदत्वाचा कालावधी चार वर्षाचा असेल, जेव्हा निवडणूक झाल्यापासून चवथ्या वर्षातील सहाव्या महिन्या नंतरच्या बैठकीत नवीन नेमणूकीसाठी निवडणूक आयोजित केली जाईल. प्रत्येक सभासद आणि पदाधिकारी, पुर्ननिवडणूकीसाठी पात्र असेल.

४.२ पक्षांतर्गत निवडणूकांचा कार्यक्रम

निवडणूका ज्या बैठकीत घेतल्या जाणार असतील त्यापूर्वीच्या बैठकीत निवडणूकींचा कार्यक्रम तसेच त्या संबंधीच्या नेमणूका केल्या जातील व त्याची सूचना सर्व संबंधितांना दिली जाईल.

इच्छुक उमेदवारांना त्यांचा अर्ज निवडणूकीच्या कमीत कमी एक आठवडा आधी सादर करावा लागेल व प्रत्येक अर्जाची सूचना सर्व सभासदांना दिली जाईल.

उमेदवारांना निवडणूकीच्या आधी आपला अर्ज मागे घेण्याची संधि दिली जाईल.

निवडणूकीच्या बैठकीमधे मतदान, मतमोजणी करून, नेमणूका जाहीर केल्या जातील.

४.३ स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणूकासांठी, उमेदवार निवड.

वैधानिक संस्थांच्या निवडणूकांमधे पक्ष उमेदवार ठरविण्याच्या निवडणूका, आगामी मतदानाच्या कमीत कमी तीन महिने आधी घोषित केल्या जातील पक्षांतर्गत निवडणूकांचे आगाऊ परिशिष्ट ठरवून, प्रसारीत केले जाईल. अंतर्गत निवडणूका अशा प्रकारे आयोजित केल्या पाहिजेत की कमीत कमी १०% पक्ष सभासद, निवडणूकीत मतदान करू शकतील.

पक्ष निवडणूका साध्या झाल्या पाहिजेत आणि अती फाजीलखर्चाला परवानगी मिळणार नाही. आगाऊ ठरविलेल्या प्रकार आणि पद्धतीनुसार आणि आधी ठरविलेल्या कालावधीतच प्रचाराला परवानगी मिळेल. उमेदवारांना स्वतःच्या निधीतून खर्च करण्याची परवानगी नसेल. कोणतेही उल्लंघन शिस्तभंग समितीला कळविले जाईल. निवडणूका हय़ा प्रत्येक उमेदवारांच्या कामगिरी व योग्यता हय़ांच्या आधारावर झाल्या पाहिजेत.

निवडून आलेल्या उमेदवाराला शपथ दिली जाईल.

कमीत कमी तीस दिवस आधी पक्ष उमेदवार ठरविला गेला पाहिजे.

४.४ नगर परिषद, राज्य विधान सभा आणि भारतीय संसदेच्या निवडणूकीतील सहभाग.

पक्ष सभाससदांनी निवडलेले उमेदवार, नगर परिषद, राज्य विधान सभा आणि भारतीय संसदेच्या निवडणूका लढवतील. निवडणूकांमधील संपूर्ण खर्चाची जबाबदारी पक्षाची असेल आणि उमेदवाराला कोणताही खर्च करावा लागणार नाही.

५.० अर्थ – वित्त आणि हिशोब :

संघटनेतील हिशोब आणि हिशोब पद्धतीच्या देखभालीची जबाबादारी, भारत धर्म सभेच्या खजिनदाराची असेल. भारत धर्म सभेच्या दुय्यम धर्म सभांचे खजिनदार, त्यांच्या धर्म सभांच्या हिशोब, हिशोब पद्धति व कार्यपद्धतीच्या देखभालीला जबाबदार असतील. ह्या कार्याकरीता, ते भारत धर्म सभेच्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे काम करतील. हिशोबाच्या देखभालीच्या बाबतीत, भारताच्या निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन, पक्ष करेल.

पक्ष, आर्थिक – वित्तीय वर्षाचा शुभारंभ; चैत्र शुद्ध प्रतिपदा मानेल.

आर्थिक – वित्त परिस्थिती सशक्त व शिस्तबद्ध रहाण्यासाठी, संघटना हिशोबाची कार्यप्रणाली अचूक व काटेकोर ठेवेल. प्रत्येक सभा तिच्या कार्याचे आयोजन, बजेट करणे, कार्यक्रमांचे आयोजन आणि निधी जमविणे स्वतंत्रपणे करेल. शिवाय स्वतःच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी सुद्धा प्रत्येक सभा निधी जमविल्याचा व त्याच्या विनियोगाचा वेगळा आर्थिक – वित्तीय हिशोब ठेवेल तथापि, निवडणूक आयोगाच्या, आर्थिक नियंत्रण ठेवण्याच्या आवश्यकतेनुसार, सर्व देणग्या मध्यवर्ती खात्यात जमा केल्या जातील, जेथून पुढे खर्चाच्या योजने प्रमाणे, त्या देणग्या ज्या ज्या सभेने मिळविल्या त्यांच्याकडे वर्ग केल्या जातील. ( आणि संबंधित सभेने निधी जमविल्याच्या विशिष्ट प्रमाणात )

फक्त राजकीय हेतु/उद्देशांसाठीच, पक्ष तिचा निधी वापरेल.

भारत धर्म सभेतर्फे, मध्यवर्ती हिशोब लेखा परिक्षक नेमला जाईल.

“कॅग” च्या यादीत असलेल्या लेखा परिक्षकाकडून, दरवर्षी संघटना तिच्या हिशोबांचे लेखा परिक्षण करवून घेऊन, प्रत्येक आर्थिक – वित्तीय वर्षाच्या समाप्ती नंतरच्या सहा महिन्यात त्याची एक प्रत निवडणूक आयोगाला सादर करेल. प्रत्येक आर्थिक – वित्तीय वर्षाच्या आरंभी, संघटना तिने आखलेल्या योजनांप्रमाणे तिचे बजेट निश्चित करेल.

५.१ देणग्या

पक्षाच्या प्रयोजनाला मदत करण्यात स्वारस्य असलेल्या प्रत्येक व्यक्तिकडून, पक्ष देणग्या स्वीकारेल. खालील अटींवर देणग्या स्वीकारल्या जातील.

१. आम्ही मुख्यतःसामान्य नागरिकांकडून व विशेषतः कामगार – कर्मचाऱयांकडून देणग्या मिळविण्याचा प्रयत्न करू कारण प्रामुख्याने त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कार्य करीत आहोत.

२. समाज – विरोधी किंवा राष्ट्र – विरोधी घटकांकडून आम्ही देणगी स्वीकारणार नाही.

३. कोणत्याही अटी वा सोयी – सवलती/लाभ मिळवण्याच्या बदल्यात, आम्ही कोणतीही देणगी स्विकारणार नाही. देणगी वा त्यांनी दिलेल्या भेटवस्तूंशी संबंधित विशेष हक्क वा सवलती देणगीदारांना अजिबात मिळणार नाहीत.

४. देणगीसंस्कृति वाढण्यासाठी, पक्ष सभासदांच्या वा पक्ष – हितचिंतकांच्या पक्ष फडासाठीच्या उच्च – मूल्य देणग्यांना विशेष उल्लेख आणि मान्यता दिली जाईल.

६.० कार्यप्रणाली वा कार्यपद्धती :

एकसूत्रता, सलगता आणि नियंत्रणाच्या उद्देशाने, संघटना तिची कार्यप्रणाली आखेल, प्रकाशित करेल, तिची अंमलबजावणी करून देखभाल करेल.

हय़ा घटनेच्या विशिष्ट आचरणाच्या अपेक्षेनुसार सर्व कार्यप्रणाली असेल.

पक्षाच्या आणि पक्षाच्या पदाधिकाऱयांच्या कामगिरी बद्दलची माहिती उपलब्ध करण्याची व्यवस्था संघटना करेल

प्रत्येक क्षेत्रातीन धर्म सभेचा मुख्य सचिव कार्यपद्धती आखून, प्रकाशित करून त्याची अंमलबजावणी व देखभाल करेल. सर्व कार्यपद्धती अध्यक्षांकडून संमत केल्या जातील.

पक्षाच्या कोणाही सभासदाला आवश्यक कार्यपद्धती उपलब्ध असतील.

पक्षाचा कोणीही सभासद कार्यपद्धतीत सुधारणा वा बदल सुचवू शकतो.

६.१ निर्णय

सुयोग्य पातळीवर योग्य तऱहेने सल्लामसलत केल्यानंतर पक्षांतर्गत निर्णय घेतले जातील. सल्लामसलत ही फक्त विचारमंथनासाठी असल्यामुळे निर्णयसंबंधित उत्तरदायित्वावर त्याचा कोणताही फरक पडणार नाही.

एखादा अतिमहत्वाचा आणि सर्वांचा सहभाग आवश्यक असलेला निर्णय सभादांच्या सार्वमताच्या माध्यमातून घेतला जाईल. निर्णया करीता जर दोनापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असले तर सार्वमतासाठी दोन उच्च पर्याय ठरविण्यासाठी सल्लामसलतीच्या प्राथमिक फेऱ्या घेतल्या जातील. सामान्य बहुमताने अंतिम निष्कर्ष काढला जाईल.

अस्तित्वातील व्यवस्थेत बदल करण्याच्या सार्वमताच्या प्रसंगी, निर्णयासाठी कमीत कमी ६०% बहुमत सक्तिचे असेल.

आधीच ठरविलेल्या / आधीच कळविलेल्या प्रस्तावांच्या बाबतीतच फक्त, अपर्याप्त परिस्थितीत जर एखादा सभासद हजर राहून मतदान करू शकत नसेल, तर त्याने मतदानाचा अधिकार दिलेल्या दुसऱ्या व्यक्तिला त्याच्या बद्दलच्या मतदानाची परवानगी दिली जाईल.

७.० जोडणी/जोडलेले

७.१ शपथ

पक्ष प्रवेशाच्या वेळी आणि कोणतीही जबाबदारी नेमून देताना, पक्षाच्या प्रत्येक सभासदाला शपथ दिली जाईल. द्यावयाच्या शपथेत खालील मुद्यांचा समावेश असेल.

१. भारताच्या घटनेशी निष्ठा.

२. पक्षाची नितीमूल्ये समजावून घेणे, भ्रष्टाचारा बद्दल आणि पर्यावरण ऱहासाबद्दल शून्य सहशीलतेचा अंतर्भाव.

३. पक्षाच्या पदाधिकाऱयांच्या अधिकारांबद्दल आणि इतर सभासदांबद्दल आदर असणे.

४. पक्षाच्या ध्येय आणि प्रयोजना व नेमून दिलेल्या जबाबदारीस पूर्ण समर्पण.

८.० ह्या दस्ताऐवजाबद्दल

हय़ा घटनेचा मूळ मसुदा इंग्रजीमधे असून, सदर मराठी भाषांतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यासाठी तयार केलेले आहे.

मूळ मसूदा दिनांक नोव्हेंबर ७, २०११.

Search


नवे लेख

ताज्या बातम्या

 • इयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश

  ।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा

  पुढे वाचा...
 • ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!!

  आमचा पाचवा ग्रामीण मराठी तरुण बळी गेला, ‘राक्षसी’ पोलीसी चाचणीत..... एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. .......हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ? लहानपणी आम्ही सर्कशीत ”मौत का कुवाँ“ हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो .... मात्र, असली ”मौत की दौड“ प्रथमच अनुभवतोयं..... भरदुपारी रणरणत्या उन्हात

  पुढे वाचा...
 • 20 मार्च – जागतिक चिमणी दिवसानिमित्त भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’ वाटणार ‘चिमण्यांची घरटी’!

  जागतिक चिमणी दिनानिमित्त, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’, 20 मार्च रोजी, पर्यावरण संरक्षणासाठी वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’, गृहसंकुल&चाळीत वाटणार असल्याची माहिती ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी दिलीय. गेली तीन वर्षे हा उपक्रम ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सुरू आहे.

  पुढे वाचा...
 • ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न

  ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिव्हील रूग्णालयाचे डॉ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे

  पुढे वाचा...
 • उल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीराचे आयोजन

  ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (30 वर्

  पुढे वाचा...

आगामी उपक्रम

 • 'धर्मराज्य पक्षा'तर्हे सध्या कोणतेही उपक्रम प्रस्तावित नाहीत.