परिचय

श्रीकृष्णाच्या जीवनसंदेशानुसार व शिवछत्रपतींच्या राजनीतिनुसार चालणारा एकमात्र ‘अंतिम-सत्यवादी पक्ष’ -“धर्मराज्य पक्ष”

आज दि. 16 नोव्हेंबर 2011 रोजी आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना झाली, तिच मुळी काळाच्या अशा एका टप्प्यावर की, जेव्हा सामाजिक, राजकीय, आर्थिक व पर्यावरणीय समस्यांनी आपल्या देशात हाहाःकार माजलेला आहे. आपल्या देशात, विशेषतः महाराष्ट्रात जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणाच्या बुरख्याआडून शेती, उद्योग, शिक्षण व आरोग्य या जीवनावश्यक क्षेत्रात सर्वसामान्य माणसाला राजकारणी, नोकरशहा आणि उद्योगपती व त्यांचे दलाल या मूठभर 1ः वर्गाच्या भ्रष्टाचारी संगनमतानं विकासाच्या परिघाबाहेर ढकलून देण्यात आलेले आहे. शेती, उद्योग व सेवा या सर्वच क्षेत्रांमध्ये उत्पन्न व संधी या बाबतीत विषमतेनं कळस गाठल्यानं, या देशात एक नवी ‘अस्पृश्यता’ रूजविण्याचे षड्यंत्र मोठया प्रमाणावर चालू आहे.

या देशाचा खरा मालक असलेल्या कामगार व शेतकऱ्याला, ”आपण देशाच्या तथाकथित विकासाच्या प्रक्रियेतील केवळ ‘कच्चामाल’ वा दर 5वर्षानी येणाऱ्या निवडणूकींमध्ये मतदान करणारे, केवळ यांत्रिक मानव नसून या देशात निर्माण होणाऱ्या साधनसंपत्तीसाठी मधे व नैसर्गिक संसाधनांमधे समान हक्काचे वाटेकरू आहोत“…. याची प्रखर जाणिव करून देण्यासाठी ‘धर्मराज्य पक्ष’ नेटानं प्रयत्न करेल. अन्याय, विषमता व समाजातील विशिष्ट वर्गासाठीच काम करण्याची, या देशातील राजकारण्यांची वृत्ती सहन ‘न’ करण्याची प्रखर मानसिकता सर्वसामान्य जनतेमध्ये ‘धर्मराज्य पक्ष’ निर्माण करेल. या द्वारे समाजाची निकोप जडण-घडण नव्यानं करण्याची जबाबदारी धर्मराज्य पक्ष स्विकारीत आहे.

“समाजाच्या मूळ रोगावर इलाज ‘न’ करता, वरकरणी केवळ रोगाच्या लक्षणांवरच फसवे इलाज करत, ‘बेरजे’चं बदमाषीचं राजकारण करुन माणसं जोडणं मला साफ नामंजूर आहे!” – राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)

हे करताना आपल्याला यश मिळो वा अपयश, इतरेजनांकडून स्तुतींचा वर्षाव होवो वा निंदेला सामोरे जावे लागो, आर्थिक लाभ मिळो वा ना मिळो याची यःकिंचितही पर्वा न करता, आपण जी कृती करीत आहोत ती ‘नैसर्गिक-न्याया’च्या तत्वानुसार योग्य आहे की अयोग्य… केवळ हेच ध्यानात घेऊन ‘धर्मराज्य पक्ष’ व त्याचा प्रत्येक सभासद कृति करेल.

विकासाच्या कुठल्याही प्रारूपाचा केवळ ‘माणूस-केंद्री’ विचार ‘न’ करता संपूर्ण निसर्गाचा व पर्यावरण-संरक्षणाचा विचार साकल्यानं करण्याचं अभिवचन ‘धर्मराज्य पक्ष’ देत आहे!

विकास म्हणजे केवळ आर्थिक संपन्नता, दळणवळणाची आधुनिक साधने, पोलाद-तेल-सिमेंट वा विद्युतऊर्जा यांचा दरडोई वाढलेला खप, संपन्नतेनं व विपूलतेनं नटलेल्या माॅल्स् सारख्या बाजारपेठा, चकचकीत रूंद चारपदरी महामार्ग व जागोजागी उड्डाणपूल वा उंचच उंच काॅंक्रिटच्या इमारती असं नव्हे, तर ‘निसर्गाचा समतोल’ राखून माणसांचे आरोग्य, मनःस्वास्थ्य त्यांचे सौहार्द्रपूर्ण परस्पर-संबंध, साहित्य-संगीत-काव्य-नाटय यांच्या अभिरूचीनं नटलेल्या संस्कृति…व त्यामुळे समाजात नांदत असलेली शंाति व प्रसन्नता हा खरा विकास होय! तो साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक राज्यात, ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र’ या संघराज्यीय तत्वानुसार जास्तीतजास्त ‘स्वायत्तता’ देऊन मातीशी जुळणारी व आपल्या अवाजवी गरजांना कात्री लावणारी जीवनशैली व ‘सामाजिक लोकशाही’च तत्वज्ञान घेऊनच ‘धर्मराज्य पक्ष’ भविष्यात वाटचाल करेल!

Search


नवे लेख

ताज्या बातम्या

 • इयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश

  ।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा

  पुढे वाचा...
 • ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!!

  आमचा पाचवा ग्रामीण मराठी तरुण बळी गेला, ‘राक्षसी’ पोलीसी चाचणीत..... एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. .......हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ? लहानपणी आम्ही सर्कशीत ”मौत का कुवाँ“ हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो .... मात्र, असली ”मौत की दौड“ प्रथमच अनुभवतोयं..... भरदुपारी रणरणत्या उन्हात

  पुढे वाचा...
 • 20 मार्च – जागतिक चिमणी दिवसानिमित्त भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’ वाटणार ‘चिमण्यांची घरटी’!

  जागतिक चिमणी दिनानिमित्त, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’, 20 मार्च रोजी, पर्यावरण संरक्षणासाठी वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’, गृहसंकुल&चाळीत वाटणार असल्याची माहिती ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी दिलीय. गेली तीन वर्षे हा उपक्रम ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सुरू आहे.

  पुढे वाचा...
 • ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न

  ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिव्हील रूग्णालयाचे डॉ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे

  पुढे वाचा...
 • उल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीराचे आयोजन

  ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (30 वर्

  पुढे वाचा...

आगामी उपक्रम

 • 'धर्मराज्य पक्षा'तर्हे सध्या कोणतेही उपक्रम प्रस्तावित नाहीत.