तत्व

लोककल्याण, संस्कृति निर्माण आणि न्याय्य-विधान

 

माझी प्रार्थना

“माझ्या देहात प्राण असेस्तोवर आणि जोवर हा जनताजनार्दन मला त्याच्या ‘न्याय्य’ हुंकाराचा प्रणेता मानतो तोवर हे परमेश्वरा, सर्वसामान्यांच्या जीवनात प्रकाशाची मशाल धरण्याचे बळ तू माझ्या दो करांना दे!”

माझं दैवत

१) सद्रक्षणासाठी आणि खलनिग्रहणासाठी ज्याने धर्माचे राज्य निर्मिले.

२) दया,क्षमा,शांती हे ब्रीद मानिले, प्रसंगी शत्रूलाही ममत्वाने आपलेसे केले.

३) धर्म आणि माणुसकीचा वैरी झालेल्या शत्रूच्या विनाशासाठी प्रसंगी स्वतः शस्त्रकरी धरिले.

४) ज्याने फक्त न्याय आणि न्यायच केला आणि न्यायदानासमयी नाती गोती, शत्रू-मित्र, धर्म, पंथ, जात पात यांचा विचारही मनास स्पर्शू दिला नाही.

५) प्रबळ आणि राक्षसी वृत्तीच्या शत्रूच्या निःपातासाठी गनिमी कावा केला, कपटाला कूटनितीचा शह दिला.

असा हा धैर्याचा मेरूमणी, प्रजाहितदक्ष, नेतृत्वाचा हिमालय, मर्यादापुरूष, धर्म-संस्कृति रक्षक, राष्ट्रविधाता ‘छत्रपती शिवाजी राजा’ माझं आराध्य दैवत आहे!

माझा निश्चय

“माझी योग्यता शिवछत्रपतींच्या पायधुळीसमान जरी असो, तरीही माझ्या संघटनाकार्यात शिवाजी महाराजांच्याच राजनितीचं प्रतिबिंब ठायी ठायी पडेल, याची दक्षता घेऊन माझी प्रत्येक कृति अहंकाराला पूर्णतः तिलांजली देऊन शिवछत्रपतींच्या पावन चरणी समर्पित करेन!”

Search


नवे लेख

ताज्या बातम्या

 • इयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश

  ।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा

  पुढे वाचा...
 • ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!!

  आमचा पाचवा ग्रामीण मराठी तरुण बळी गेला, ‘राक्षसी’ पोलीसी चाचणीत..... एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. .......हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ? लहानपणी आम्ही सर्कशीत ”मौत का कुवाँ“ हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो .... मात्र, असली ”मौत की दौड“ प्रथमच अनुभवतोयं..... भरदुपारी रणरणत्या उन्हात

  पुढे वाचा...
 • 20 मार्च – जागतिक चिमणी दिवसानिमित्त भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’ वाटणार ‘चिमण्यांची घरटी’!

  जागतिक चिमणी दिनानिमित्त, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’, 20 मार्च रोजी, पर्यावरण संरक्षणासाठी वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’, गृहसंकुल&चाळीत वाटणार असल्याची माहिती ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी दिलीय. गेली तीन वर्षे हा उपक्रम ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सुरू आहे.

  पुढे वाचा...
 • ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न

  ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिव्हील रूग्णालयाचे डॉ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे

  पुढे वाचा...
 • उल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीराचे आयोजन

  ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (30 वर्

  पुढे वाचा...

आगामी उपक्रम

 • 'धर्मराज्य पक्षा'तर्हे सध्या कोणतेही उपक्रम प्रस्तावित नाहीत.