ठाणे शहर व जिल्हा

धर्मराज्य पक्ष ध्येय व धोरणे : ठाणे शहर व जिल्हा

जिल्हा-विभाजन

ठाणे-जिल्हा हा भारतातील सर्वात मोठा (सात महानगरपालिका व पाच नगरपालिका असलेला व ७०% औद्योगिकरण झालेला हा सागरी, नागरी व डोंगरी जिल्हा) व आदिवासीबहुल जिल्हा आह्रे. ठाणे-जिल्ह्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी जनतेच्या सोयीसाठी आणि विभागीय सर्वांगीण विकासासाठी, ठाणे जिल्ह्याचे विभाजन व तशी गरज भासल्यास त्रिभाजन व्हावे म्हणून, सर्व शक्ती एकवटून प्रयत्न.

भ्रष्टाचार निर्मूलन

संपूर्ण ठाणे-जिल्हा हा भारतात, महाप्रचंड भ्रष्टाचार व मोठ्याप्रमाणावरील बेकायदा वा अनधिकृत बांधकामांसाठी अत्यंत कुप्रसिद्ध आहे. ठाणे-जिल्ह्यातील हि भ्रष्टाचारी माजलेली बुज्बुज्पुरी संपवण्यासाठी… ‘नंदलाल-समिती’ अहवालासह ( ज्या अहवालात सध्याची लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या एका लोकप्रतिनिधीची ‘आरोपी’ म्हणून सुस्पष्ट व लाजिरवाणी नोंद आहे!) ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर महापालिकेत सिद्ध झालेले लहान मोठे भ्रष्टाचाराचे घोटाळे धसास लावण्यासाठी मुळापासून पुन्हा प्रयत्न. तसेच, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर महापालिकांच्या आवक व जावक, या दोन्ही वर आणि केंद्र व राज्य सरकारकडून त्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या विनियोगावर करडी नजर.

अनधिकृत झोपडपट्टया व फेरीवाले

वर्ष-१९९५ नंतरच्या एकूण एक अनधिकृत परप्रांतीय झोपडपट्टया, कुठलाहि मुलाहिजा ‘न’ ठेवता, हटविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न… ‘खासदार’ म्हणून ठाण्यात यापुढे एकही ‘बेकायदा झोपडी व फेरीवाल’ उभा राहू ‘न’ देण्यासाठी; तसेच, सर्वपक्षीय अनधिकृत पक्ष कार्यालयं पडून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार विशेष प्रयत्न…. जेणेकरून ‘अधिकृत जगण्याचा’ व सर्वांनीच कायद्याची भूज राखण्याचा प्रखर संदेश सर्वत्र जाईल.

क्लस्टर-डेव्हलपमेंट

प्रस्तावित ‘क्लस्टर-डेव्हलपमेंट’ योजनेची अपरिहार्यता हे, ठाणे-जिल्ह्यातील गेल्या ३०-४० वर्षातील अत्यंत भ्रष्ट, बेजबाबदार व गुंडशाहीच्या राजकारणाचा एकूण परिपाक आहे. सामान्य जनतेला हे समजावून सांगितलं गेल पाहिजे कि, “आज ‘क्लस्टर’चे टॉवर… उद्या, २५-३० वर्षानंतर तुम्हाला फुकट-घरं देण्यासाठी काय हे ‘बिल्डर-राजकारणी’ बांधणार आहेत, ‘आयफेल टॉवर’???”… तेव्हा, ‘क्लस्टर-डेव्हलपमेंट’ची योजना ही केवळ, “आजच मरणं उद्यावर ढकलणं आहे”… हे, लोकांनी नीट समजूनउमजून घेणं गरजेचं आहे. तरीसुद्धा, ‘आखरी रास्ता’ म्हणून ही योजना स्विकारण्यास प्राप्त परिस्थितीत पर्यायचं शिल्लक नसेलं; तर, ती खाजगी बिल्डरांकडून (विशेषतः बिल्डर-राजकरण्यांकडून) राबिवली ‘न’ जाता, अत्यंत पारदर्शकपणे सरकारतर्फे राबिवली जाण्यासाठी आणि त्यात महाराष्ट्रातल्या ‘मायमराठ्यांना’ झुकतं माप दिलं जाण्यासाठी सर्वकष प्रयत्न.

रासायनिक-कारखान्यांमुळे होणारे घातक रासायनिक प्रदूषण

ठाणे जिल्ह्यातील (विशेषतः डोंबिवली MIDC मधील), महाराष्ट्र-राज्यातील व देशातील ‘प्रदूषणकारी’ कारखाने बंद करण्यासाठी संसदीय व केंद्रीय पातळीवर पाठपुरावा.

महापालिकांच्या मराठी शाळांची दुरावस्था

खासदार-निधी व खासदारकीच्या अधिकार-जबाबदारीतून मराठी शाळांना उर्जितावस्था प्राप्त करून देणे व त्याद्वारे मायमराठी-संस्कृती आणि मराठी विद्यार्थीवर्गाचं उन्नयन साधण्याचा संकल्प.

‘कार्बनमुक्त व विनाप्रदूषण’ सायकलस्वारी

मुख्य रस्त्याला विभागणारी हिरवीगार झाडांची भिंत उभी करून (रस्त्यावरील धूळ व वाहनांच्या धूराचा त्रास कमी व्हावा म्हणून), सायकलस्वारांसाठी स्वतंत्र अशा ‘सायकल-मार्गिका’ ठाणे, नवी मुंबई व मीरा भाईंदरमध्ये निर्मिण्याचा संकल्प; तसेच, ‘ सायकल-निर्मिती पूर्णतः करमुक्त’ व्हावी व सायकल-स्वारांना आरामदायी अशा, ‘गियर्स’ असलेल्या सायकली अतिशय स्वस्तात उपलब्ध व्हाव्यात म्हणून, खास सरकारी-अनुदानासाठी आग्रह… (जेणेकरून, पर्यावरणीय व वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून जणू ‘पंढरीची वारी’ असणा-या, ‘सायकलस्वारी’ला व सायकल-वाहतूकीला चालना मिळेलं!).

खाजगी गाड्यांमुळे होणारे भरमसाठ कार्बन-उत्सर्जन व प्रदूषण

‘खाजगी-कार/एसयूव्ही वाहतूकी’द्वारे मोठ्याप्रमाणावर होणा-या ‘कार्बन-ऊत्सर्जना’ची मात्र कमी करण्यासाठी, तातडीचा व महत्वपूर्ण पर्याय म्हणून, ‘सार्वजनिक-वाहतूक सेवे’ला स्वस्त व कार्यक्षम करण्यासाठी प्राधान्य. ठाणे-लोकसभा मतदारसंघातील टीएमटी, एनएमएमटी, एमबीएमटी बस-सेवा ‘नि:शुल्क’ देण्यासाठी मूलभूत स्वरूपाचे प्रयत्न.

ठाण्याचं नंदनवन व फुफ्फुस असलेलं येऊर

येऊरमधील बड्या धेंडांचे शिल्लक असलेलं अनधिकृत बंगले व इतर अनधिकृत बांधकामे हटवून, येऊरचं निसर्गवैभव व वन्य जीवांचा अधिवास निर्वेध राखण्याचा जोरदार आग्रह.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

ठाण्यातील उरल्यासुरल्या वृक्षराजीला, ‘राजकारण-बिल्डर’लॉबी पुरस्कृत, बेकायदा वृक्षतोडीच्या ‘सैतानी-छाये’पासून संपूर्ण संरक्षण. तसेच, जे काही थोडेबहुत तलाव, विहिरी, बागबगीचे, मैदाने, तिवराची किंवा खारफुटीची जंगलं शिल्लक आहेत, त्यांचं जीवाच्या करारानं संरक्षण.

उध्वस्त झालेला ‘ठाण्यातील भूमिपुत्र’ आगरी व कोळी समाज

रासायनिक कारखान्यांचे प्रदूषित सांडपाणी खाडीमध्ये मोठ्याप्रमाणावर सोडले जात राहिल्याणे; तसेच, सागरी-जीवनाचा पाया असलेली खारफुटीची व तिवरांची ठाणे-खाडीकिनारीची जंगलं ठाण्यातील सर्वपक्षीय बिल्डर-राजकारण्यांनी स्वार्थासाठी संगनमतानं उध्वस्त केल्यामुळे, ठाण्यातील भूमिपुत्र आगरी/कोळी समाजाचे मासेमारी, भातशेती व मिठागरांसारखे पारंपारिक व्यवसाय कायमस्वरूपी संपुष्टात आले.

आज दिशाहीन अवस्थेत भटकणा-या, या समाजातील तरुणवर्गाला मानसिक आधार देत, भविष्याचा चांगला मार्ग दाखविणाऱ्या योजना उदा. ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ निर्मूलनाद्वारे कायमस्वरूपी चांगल्या पगाराच्या नोक-या, लष्कर भारती, भूमिपुत्रांना उद्योगधंद्यात प्राधान्य व त्यांच्यात उद्दमशीलता रुजविणे ई. ‘धर्मराज्य पक्षा’चा भावी खासदार आखेल.

रेल्वेप्रवाशांच्या सोयीसुविधा

अ) रेल्वे-प्रवासासंदर्भात नवनवे संकल्प सोडण्याअगोदर… वारंवार होणारे मेगा-ब्लॉक, तांत्रिक-बिघाड, विविध नौटंकी राजकीय आंदोलनामुळे होणारा नेहेमीच उपद्रव, रेल्वे-अपघातांचे मोठे प्रमाण, रेल्वे-स्थानकांवरील गैरसोयी, लांबच्या रेल्वे-प्रवासाच्या आरक्षणाच्या बाबतीतील रेल्वेने नेमलेल्या दलालांचा व त्यांच्या गुंडांचा उपद्रव आणि त्यासंदर्भात भ्रष्ट रेल्वे-पोलिसांची हेतुपुरस्सर निष्क्रियता आणि रेल्वे-मंत्रालयाने सातत्यान ‘मागणी-पुरवठ्या’च्या समीकरणाकडे आजवर केलेले अक्षम्य दुर्लक्ष… या सर्वच बाबतीत अत्यंत सजगपणे जोरदार पाठपुरावा करून रेल्वेप्रवाशांना प्रथमच खराखुरा दिलासा देण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’चा ‘ठाणेदार’ व ‘बाजी प्रभू देशपांडे’सारखा ‘बाणेदार’ ‘खासदार’ श्री. नितीन देशपांडे जंग जंग पछाडेल.

ब) नवी मुंबई-हार्बर रेल्वेमार्गावर वर्ष-१९९२ पासून वाशी पुलासाठी आकारण्यात येणारा, मासिक पासवरील रु.५० आणि तिकिटावरील रु.५ अधिभार तत्काळ रद्द करून उपनगरीय रेल्वे दारात समानता आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार.

किफायतशीर व तुलनेनं कमी प्रदूषणकारी जलवाहतूक

ठाणे-लोकसभा मतदारसंघाला सुदैवाने बारमाही पाण्याने भरलेला निसर्गतः उदंड ‘खाडी-किनारा’ लाभलेला असल्यानं प्रवाशांसाठी व मालाची वहातूक करण्यासाठी ‘जलवाहतूक’ हा, अत्यंत स्वस्त, कार्यक्षम व तुलनेनं कमीतकमी ‘ कार्बन-पाऊलखुणा’ असलेला पर्याय विकसित करण्यावर भर.

मीरा-भाईंदर, ठाणे येथील अनधिकृत मोबाईल-टॉवर्स

जागतिक आरोग्य संघटनेनं मोबाईल-टॉवर्सच्या विद्युतचुंबकीय किरणोत्सर्गामुळे आरोग्यावर धोकादायक परिणाम होत असल्याचे वारंवार बजावूनही ठाणे-जिल्ह्यामध्ये, विशेषतः मीरा-भाईंदर परिसरात, नागरिकांच्या आयुष्याशी खेळणारे, मोठ्याप्रमाणावर उभे असलेले अनधिकृत मोबाईल-टॉवर्स हटवायला प्रशासनाला तत्काळ भाग पाडणार

गृह्संकुलांच्या नावांवर जमिनीचे बिल्डरांकडून हस्तांतरण (कन्व्हेअन्स डीड)

‘धर्मराज्य पक्षा’चे खासदार स्थानिक स्वराज्यसंस्थांकडे व सरकारकडे जोरदार पाठपुरावा करून,

अ) सोसायट्यांच्या किंवा गृह्संकुलांच्या नावांवर त्यांच्या जमिनीचं तत्काळ हस्तांतरण (डीड ऑफ कन्व्हेअन्स) व्हावं म्हणून बिल्डरांवर कायदेशीर दबाव आणेल.

ब) तसेच, ज्या जुन्या सोसायटयांकडे ‘ऑक्युपेशन-सर्टीफिकेट’ नाही; त्यांच्या नावावर जमिनिंचं हस्तांतरण पूर्ण होण्यासाठी जो दंड आकारला जातो तो, सोसायटयांकडून ‘न’ घेतला जाता, मुळ बिल्डरांकडूनच घेतला जाण्यासाठी सर्वकष प्रयत्न.

Search


नवे लेख

ताज्या बातम्या

 • इयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश

  ।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा

  पुढे वाचा...
 • ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!!

  आमचा पाचवा ग्रामीण मराठी तरुण बळी गेला, ‘राक्षसी’ पोलीसी चाचणीत..... एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. .......हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ? लहानपणी आम्ही सर्कशीत ”मौत का कुवाँ“ हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो .... मात्र, असली ”मौत की दौड“ प्रथमच अनुभवतोयं..... भरदुपारी रणरणत्या उन्हात

  पुढे वाचा...
 • 20 मार्च – जागतिक चिमणी दिवसानिमित्त भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’ वाटणार ‘चिमण्यांची घरटी’!

  जागतिक चिमणी दिनानिमित्त, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’, 20 मार्च रोजी, पर्यावरण संरक्षणासाठी वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’, गृहसंकुल&चाळीत वाटणार असल्याची माहिती ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी दिलीय. गेली तीन वर्षे हा उपक्रम ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सुरू आहे.

  पुढे वाचा...
 • ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न

  ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिव्हील रूग्णालयाचे डॉ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे

  पुढे वाचा...
 • उल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीराचे आयोजन

  ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (30 वर्

  पुढे वाचा...

आगामी उपक्रम

 • 'धर्मराज्य पक्षा'तर्हे सध्या कोणतेही उपक्रम प्रस्तावित नाहीत.