प्रतिज्ञा

‘धर्मराज्य पक्षा’तील सर्व बंधुभगिनींना । आदरपूर्वक वंदन करून । मी । ‘धर्मराज्य पक्षा’चा । पदाधिकारी या नात्याने ।
अशी शपथपूर्वक प्रतिज्ञा करीतो की, । मी माझे कर्तव्य । निर्भयतेने, । नि:पक्षपातीपणे । व न्याय्य बुध्दीने पार पाडेन. ।

अशातऱ्हेने । माझे कठोर कर्तव्य । पार पाडत असताना । मी सर्वांशी । आपुलकीने व प्रेमाने वागेन. ।

तसेच । कुठल्याही पक्ष सभासदाची । जातपात, । धर्मपंथ, । माझ्याशी व्यक्तिगत असलेली नातीगोती । किंवा मित्रत्व । किंवा शत्रूत्व ।
याचा काडीमात्र विचार न करता । मी सर्वांना । समानतेने व सन्मानाने वागवेन. ।

मात्र । कर्तव्य चुकार व अन्यायाने वागणाऱ्या । पक्ष सभासदाचा । मी प्रसंगी कुठलाही भेदभाव न बाळगता । कठोरतेनं मुकाबला करेन. ।

माझं । व्यक्तिशी नव्हे । तर त्या व्यक्तिच्या । चांगल्या प्रवृत्तींशी मित्रत्व । व वाईट प्रवृत्तींशी शत्रुत्व राहील. ।

मात्र प्रवृत्तींमध्ये । कायमस्वरूपी मूलभूत बदल होताच, । दया, क्षमा, शांती या न्यायाने । वाट चुकलेल्या ।
माझ्या पक्षातील बांधवांशी वा भगिनींशी । पूर्ववत प्रेमाने व सन्मानाने वागेन. ।

माझ्या नेत्याचे । ‘न्याय’ आदेश । व संघटनेची महान तत्त्वे । यांची मी । जागृकतेनं । व कार्यक्षमतेनं अंमलबजावणी करेन ।

आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’च्या । आदर्श विचारधारेचा व तत्त्वांचा । मला अभिमान असून । त्यांचं पालन करणे । हे मी माझे । परम कर्तव्य मानतो ।

।। जय महाराष्ट्र – जय हिंद ।।

Search


नवे लेख

ताज्या बातम्या

 • इयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्रमित्रमैत्रीणींना संदेश

  ।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। ’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ - “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रा

  पुढे वाचा...
 • ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!!

  आमचा पाचवा ग्रामीण मराठी तरुण बळी गेला, ‘राक्षसी’ पोलीसी चाचणीत..... एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. .......हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ? लहानपणी आम्ही सर्कशीत ”मौत का कुवाँ“ हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो .... मात्र, असली ”मौत की दौड“ प्रथमच अनुभवतोयं..... भरदुपारी रणरणत्या उन्हात

  पुढे वाचा...
 • 20 मार्च – जागतिक चिमणी दिवसानिमित्त भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’ वाटणार ‘चिमण्यांची घरटी’!

  जागतिक चिमणी दिनानिमित्त, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’, 20 मार्च रोजी, पर्यावरण संरक्षणासाठी वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’, गृहसंकुल&चाळीत वाटणार असल्याची माहिती ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी दिलीय. गेली तीन वर्षे हा उपक्रम ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सुरू आहे.

  पुढे वाचा...
 • ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न

  ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिव्हील रूग्णालयाचे डॉ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे

  पुढे वाचा...
 • उल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीराचे आयोजन

  ‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (30 वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (30 वर्

  पुढे वाचा...

आगामी उपक्रम

 • 'धर्मराज्य पक्षा'तर्हे सध्या कोणतेही उपक्रम प्रस्तावित नाहीत.