निवडणूक जाहीरनामा २०१७

आपले ठाणे स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त व महापालिका १००% भ्रष्टाचारमुक्त, कर्तव्यतत्पर व कार्यक्षम करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’चा जाहीरनामा

०१. ठाण्यात नव्यानं एकही अनधिकृत बांधकाम होऊ ‘न’ देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व त्यासंदर्भात महापालिकेतर्फे सातत्यानं परिक्षण.

०२. ठाणे महासभेचे थेट प्रक्षेपण स्थानिक टी.व्ही चॅनेलवर.

०३. प्रत्येक महासभेत ३० मिनिटांकरिता महापौरांच्या परवानगीने भाग घेऊन नागरिक आपले विचार/मत व्यक्त करु शकतील.

०४. ठाणे महापालिकेच्या सुविधा जाणून घेण्यासाठी व तक्रारी नोंदविण्यासाठी एक टोल फ्री नंबर २४ तास उपलब्ध.

०५. महापालिकेची वेबसाईट मराठीमध्ये.

०६. घरबसल्या ठाणे महापालिकेच्या विविध विभागांची बिले इंटरनेटवर भरण्याची, तसेच बसचे पास नूतनीकरण करण्याची सोय.

०७. नोकरदार महिलावर्गाकरीता त्यांची लहान मुले सांभाळण्यासाठी महापालिकेच्या सहकार्याने महिला बचत गटांच्या/सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून अद्ययावत पाळणाघरे, रेल्वे व बसस्थानकांच्या जवळ.

०८. महिलांसाठी बस व बाजारपेठेच्या ठिकाणी स्वतंत्र प्रसाधनगृहे.

०९. ठाणे शहरातील औद्योगिक जागांचे निवासी वापरासाठी होणारे बदल तत्काळ रोखून रोजगार निर्मितीवर भर.

१०. रस्त्यांवर साजरे केले जाणारे धार्मिक सण व इतर उत्सव हे ध्वनिप्रदूषण, वीज चोरी, रस्त्यांचे आणि पदपथांचे नुकसान न करता आयोजित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना.

११. झोपडपट्टीचे सॅटेलाईट ‘तिमाही’ परीक्षण करून त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारी योजनेतून स्वस्त व्याजदराने कर्ज.

१२. प्रत्येक नवीन पायाभूत सुविधा-प्रकल्प हे अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित व पर्यावरणपूरकच असतील.

१३.विविधक्षेत्रातील नामवंततज्ञांची सल्लागारसमिती बनवून प्रकल्प नियोजन करतांना नागरिकांचा प्रत्यक्ष सल्ला व सहभाग.

१४. विकास आराखड्यातील सर्व रस्ते पूर्ण करण्यासाठी प्राधान्य.

१५. सर्व रस्ते तिन्ही ऋतूत खड्डेरहित.

१६. पादचाऱ्यांसाठी फेरीवाले मुक्त पदपथ.

१७. आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘नगरसेवक आपल्या दारी’ ही योजना.

१८. स्वच्छ व षुध्द पाणीपुरवठा, तसेच सांडपाण्याची पुनर्प्रक्रिया करून त्याचा बांधकाम, बागकाम व गाडयाधुलाई इ. कामांसाठी पुनर्वापर.

१९. वाढीव एफ.एस्.आय्/टी.डी.आर. वापर परवानगी, त्या त्या विभागातील पायाभूत सुविधांचा विचार करूनच.

२०. बगीचे व वृक्षसंवर्धन यावर जास्तीतजास्त भर देण्यात येईल.

२१. प्लास्टिक तसेच थर्माकोलच्या अनिर्बंध वापरावर बंदी.

२२. स्वतंत्र सायकल ट्रॅक व जॉगिंग ट्रॅकची उभारणी करण्यावर भर.

२३. मैदानांचा वापर फक्त खेळांसाठीच.

२४. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमुख चैकात/रस्त्यांवर तिसरा डोळा (सी.सी. टि.व्ही).

२५. सार्वजनिक बससेवा उपक्रम भ्रष्टाचार थांबवून अधिकाधिक सक्षम करण्यावर भर.

२६. आजच्या लोकसंख्येला आवश्यक असलेल्या ६०० बसेसची गरज पूर्ण करण्याला प्राधान्य.

२७. मोनोरेल/मेट्रो यांचा ठाण्याच्या भौगोलिकसंरचनेच्या व विस्थापित होऊ शकणाऱ्यांच्या दृष्टीने विचार करूनच योग्य प्रकल्पाची आखणी.

२८. सुलभ शहर वाहतुकीसाठी जास्तीत जास्त ‘शेअर रिक्षा’ थांबे.

२९. अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित संपूर्ण घनकचऱ्यावर प्रक्रिया केंद्र तातडीने उभारण्यावर भर.

३०. सर्व शाळा, खाजगी शाळेच्या तोडीसतोड बनवल्या जातील. उत्तम शालोपयोगी साहित्य व शिक्षक उपलब्ध केले जातील. त्यासाठी शाळेतील पालकांच्या समित्या शाळानिहाय बनवून त्यावर बारीक लक्ष ठेवतील.तसेच ‘शाळा तिथे मैदान’ अशी संकल्पना राबवण्यावर भर.

३१. मुलांच्या चारित्र्य व स्वास्थ्य संवर्धनासाठी महापालिका शाळांमधून योग-प्राणायामाच्या प्रसारावर भर.

३२. जास्तीत जास्त दवाखाने व फिरते दवाखाने उपलब्ध करण्यावर भर. प्रभागवार इस्पितळांची सोय व तेथे अत्यावश्यक सेवा म्हणून डायलेसीससारख्या सुविधा.

३३. ‘नागरिकांची सनद’ तंतोतंत पाळण्यावर बारीक लक्ष.

३४. जकातमुक्त ठाणे बनवणे हे आमचे ध्येय असेल.

३५. दरवर्षी नगरसेवक कार्याचा अहवाल, तसेच लेखापरीक्षण अहवाल जाहीर करण्यात येईल.

३६. महापालिकेतर्फे ‘मतदार-नोंदणी मोहिम’ पल्स-पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर करण्यात येईल.

३७. वाहननोंदणी व घरनोंदणी करताना मतदार असल्याचा दाखला आवश्यक करण्यावर भर.

३८. महापालिकेतील कंत्राटी-कामगार/कर्मचारी प्रथेचं उच्चाटन करणार, अथवा त्यावर प्रभावी अंकुश आणण्यासाठी कंत्राटी-कामगार/कर्मचाऱ्यांना, कायम-कामगार/कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ‘दुप्पट वेतन’ द्यायला लावणार.