धर्मराज्य पक्ष आपले सहर्ष स्वागत करत आहे.

‘धर्मराज्य’ म्हणजे ‘नीतिधर्म राज्य’….. ‘नैसर्गिक न्यायतत्त्व‘ सुसंगत व्यक्तिगत, सामाजिक व राजकीय व्यवहाराचा आग्रह…. मानवी पिढ्यापिढ्यांचा व पृथ्वीतलावरील अवघ्या सजीवसृष्टीच्या ‘शाश्वत-कल्याणा’चा ‘अंतिम-सत्यवादी’ विचार व व्यवहार…. ज्याचा, कुणा एका धर्माशी संबंध नसून, वरील दृष्टिकोनाच्या संदर्भात म्हटलं तर, सर्वच धर्मांचं सार आणि जागतिकस्तरावरील यच्चयावत उपलब्ध सर्व तत्त्वप्रणालींचा (ज्याला, कोणी कुठला ‘ईझम्’ही म्हणू शकेल!) साररुपाने विचार त्यात आहे.
यालाच आपण असही म्हणू शकतो की, “अध्यात्म, समाजकारण आणि राजकारण यांचा समष्टिच्या हिताच्या दृष्टिनं सांधा जुळवणं!”

 संस्थापक अध्यक्ष
 • राजन राजे

 • संस्थापक अध्यक्ष
 • Join Me On:

माझ्या विषयी...

शालेय जीवनात अत्यंत बुध्दिमान विद्यार्थी म्हणून गणलेला, ४ थीची स्कॉलरशिप परीक्षा, जुन्या अभ्यासक्रमातील ७वीची व्हर्नेक्युलर फायनल परीक्षा - या परीक्षांमध्ये ठाणे जिल्हयात सर्वोत्तम प्राविण्य, त्यानंतर जुन्या अभ्यासक्रमाची शालांत परीक्षा (मुंबई-पुणे एकत्रित एस्.एस्.सी. बोर्ड) - साडेतीन लाख विद्यार्थ्यांमध्ये ठाणे जिल्हयात मराठी विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आणि संपूर्ण एस्.एस्.सी. बोर्डात सोळावा - असं घवघवीत यश, नॅशनल स्कॉलरशिप व स्टेट स्कॉलरशिपचा बहुमान, मिळालेला विद्यार्थी, 'सर टाटा दोहराबजी ट्रस्ट स्कॉलरशिप'चा मानकरी, कायद्याची पदवी प्राविण्यासह प्राप्त केल्यानंतर अनेक शालेय संस्था, इतर सामाजिक संस्था व 'रोटरी क्लब' सारख्या मान्यवर संस्थांमध्ये विविध विषयांवर शेकडो व्याख्यानं दिली, नैसर्गिक शेती, कामगारक्षेत्र, शिक्षण, योगशिक्षण, खेळ अशा विविध विषयांवर अनेक मासिकं - वर्तमानपत्रांमध्ये लेखन, संवेदनशील व हळव्यामनाचां कवी म्हणून 'राजहंस' काव्यसंग्रहाचं प्रकाशन व त्याचं जनमानसांमध्ये झालेलं उत्स्फूर्त स्वागत (पाच हजारांहून अधिक प्रति वितरीत झाल्या), सर्वसामान्यांच जीवन-मरण आणि पर्यावरण । हवं एवढयासाठीच राजकारण' या संकल्पनेतून 'धर्मराज्य ' पक्षाची स्थापना.

“ज्या लोकांना शिवछत्रपती, लो. टिळक, म. गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया, स्वा. सावरकर, साने गुरुजी मुळापासून समजले….. त्यांना, मी आणि माझा ‘धर्मराज्य पक्ष’ दोन्ही समजून घेणं फारसं अवघड नव्हे!" - राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)

गेले एक तपाहूनही अधिक काळ मराठी माध्यमातील असंख्य विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटपाच्या निमित्ताने मातृभाषेवरील प्रेम वर्धिष्णू करून व मराठी संस्कृति अंगी बाणवून व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी मोठया प्रमाणावर प्रेरित केले. ठाणे शहरातील काही निवडक बैठया चाळीतील व झोपडपट्टयांमधील मराठी माध्यमातून बारावी उत्तीर्ण होणाऱ्या गरीब विद्यार्थिनींना, प्रदीर्घकाळ सातत्यानं प्रोत्साहनपर ड्रेस् मटेरियल व शिलाई खर्च वाटप.

पर्यावरण-संरक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असताना नैसर्गिक शेतीचे अनुसरण, तसेच त्यावर व्यक्तिशः प्रयोग व संशोधन. सार्वजनिक क्षेत्रात व कामगार क्षेत्रात (आजच्या घडीला विविध कामगार क्षेत्रातील अडीच ते तीन हजार कामगारांचे नेतृत्व) धुतल्या तांदळासारखी शंभर टक्के स्वच्छ प्रतिमा असलेले, अलिकडच्या काळातील अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्व.

समस्त कामगार वर्गाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून व हक्काच्या जागृति अगोदर कर्तव्याची जाण अंगी बाणवण्यासाठी प्रबुध्द करून त्यांच्यामधून सुसंस्कृत नागरिक घडवण्याचे ब्रीद हाती घेतले. 'सुल्झर पंप्स् इंडिया' या कंपनीतील कामगार संघटनेचे सलग २७ वर्षे अध्यक्षपद भूषवताना अखिल भारतीय स्तरावर कामगार क्षेत्रात अनेक विक्रमांची नोंद.

अधिक माहितीसाठी....

महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी

धर्मराज्य पक्ष कशासाठी?

 • जन-लोकपाल विधेयक
 • अर्थक्रांति-संकल्पना
 • मूलगामी निवडणूक सुधारणा
 • लोकशाहीतील परिपूर्ण संघराज्यीय संरचनेचा (राष्ट्रांतर्गत राष्ट्र... महाराष्ट्र!) ठाम आग्रह
 • पर्यावरणस्नेही-विकासाचे प्रारूप (देशाचे संरक्षण, संरक्षण-दले राष्ट्रीय संशोधन संस्था व आरोग्यसेवा अशा अत्यंत महत्त्वाच्या व संवेदनशील क्षेत्रांचा अपवाद वगळता... कार्बन-उत्सर्जन, ‘रासायनिक व आण्विक' प्रदूषण टाळणारे!)
 • ऋषि-कृषि परंपरेतील नैसर्गिक सेंद्रिय शेती व पर्यावरणाची कमीतकमी हानी करणा-या विकेंद्रित सिंचन व्यवस्थेवरच केवळ भर
 • मूलगामी निवडणूक सुधारणा
 • लोकसंख्या-विस्फोट व चंगळवादी-जीवनशैली विरोधात कठोर व ठाम भूमिका
 • कंत्राटी-कामगार पध्दत निमूर्लन द किमान वेतन रू. २५,०००/- दरमहा.
 • रु. ४०,०००/- दरमहा पगारापर्यंतच्या महाराष्ट्रातील सगळ्या नोक-या फक्त आणि फक्त मराठी भाषिकांनाच
 • अनुचित कामगार प्रथांविरोधात तुरूंगवास वा दंड रूपाने कठोर कारवाई
 • उत्पादन-खर्चावर आधारित शेतमालाला रास्त बाजारभाव व इतर आवश्यक शेतकी-सुविधा सार्वजनिक उपक्रमांद्वारे
 • उच्च दर्जाच्या शिक्षण व आरोग्य सुविधा तसेच, रस्ते-पूल बांधणी व बंदरे विकास इ. पायाभूत सुविधादेखील सार्वजनिक उपक्रमांद्वारे; तसेच, विद्यमान शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणावर ‘राष्ट्रीयीकरण'
 • ‘अल्पसंख्य-आरक्षण' इ. समाजविभागणी करणा-या घातक भूमिकांना पूर्णतः तिलांजली देऊन सर्वांना समान न्याय व विकासाच्या संधिंचं अभिवचन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत व धार्मिक-जातीय दंगलींबाबत निःपक्षपाती व अत्यंत कठोर भूमिका

योजना

 • लाखो शेतकरी आत्महत्या का करतात? देशातला कामगार-कर्मचारी वर्ग उध्वस्त का झाला? घटतं जीवनमान वाढती महागाई, सामाजिक सुरक्षिततेचा अभाव, भ्रष्टाचाराचा कहर यामुळे सर्वसामान्य जनता मेटकुटीला का आलीयं, निवडणुकांचा फड हा भ्रष्ट, गुंड व बदमाष मंडळींचा अड्डा का बनला? पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, उद्योग इ. कल्याणकारी क्षेत्रांमधून गुंतवणूक आटोपती घेत, आपल्या सरकारला खाजगीकरणाच्या ‘लालसे’ला वा ‘मक्तेदारी’ला मुक्तव्दार का द्यावे लागत आहे? या व अशा बऱ्याच मुलभूत समस्यांचे एकमेव उत्तर म्हणजे आपल्या देशातील अत्यंत सदोष, भ्रष्ट व कमालीच्या गुंतागुंतीची-अपारदर्शक विविधस्तरिय करप्रणाली, हेच होय!

  त्यामुळे, देशातील शासकीय कर वा महसूल गोळा करण्याच्या पध्दतीत सुटसुटीतपणा व पूर्ण पारदर्शकता आणून देशाचं ‘पुनरुत्थान’ घडविण्याची क्षमता असणारी श्री. अनिल बोकिलांच्या ‘अर्थक्रांतिची’ संकल्पना (त्यातील संपूर्ण देशातील काळापैशाला एकवार शेवटचा विशिष्ट कर भरुन मूळ राष्ट्रीय प्रवाहात आणून ‘पांढरा’ होऊ देण्याची ‘ऐच्छिक संपत्ति जाहीर करण्याची’ (VDS) योजना (वगळून...) धर्मराज्य पक्षाने एक प्रमुख मुद्दा म्हणून स्वीकारलेली आहे.

लक्ष्य

निवडणुका लढवणं... निवडणुका जिंकणं, हे केवळ ‘साधन’ आहे, ‘साध्य’ नव्हे! अवघ्या जनतेच्या सन्मानानं-समाधानानं जगण्याच्या आकांक्षांची पूर्तता करणं व ‘निसर्गाकडून जेवढ घेऊ, तेवढं निसर्गाला परत देऊ’, या विश्वकल्याणकारी भावनेनं पर्यावरणाचं संरक्षण करण... हे आणि हेच केवळ आमचं अंतिम ध्येय राहील़ .

 • कृषिमालाला उत्पादन-खर्चावर आधारित बाजारभाव
 • अण्णांच्या “जनलोकपाल” व “लोकायुक्त” विधेयकाला संपूर्ण पाठींबा
 • आण्विक प्रकल्पांना देशभरात सक्त विरोध
 • शहरे-महानगरांचा घनकचरा-व्यवस्थापन/मैला-सांडपाण्याची व्यवस्था
 • इलेक्ट्रिक वाहने, सायकली यांचा वापर होण्यासाठी विशेष उत्तेजन व व्यवस्था
 • शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेली ‘चातुर्वण्य’ व्यवस्था नाहीशी करणे
 • आरोग्यप्राप्ति व रोगमुक्तिसाठी योगसाधना व प्राणायामाला उत्तेजन