ठाणे जिल्ह्याचा ‘गड’ लढवणारा ‘बाजीप्रभू देशपांडे’

‘निर्भय बनो आंदोलन’, ‘ठाणेकरांचा आवाज’, ‘ठाणे विकास आघाडी’, ‘दक्ष नागरिक मंच’, ‘जाग’, ‘समर्थ व्यासपीठ’ ‘स्वायत्त-महाराष्ट्र महिला संघटना’, ‘स्वायत्त-महाराष्ट्र सायकलींग फेडरेशन’ आदि संघटनांमार्फत नागरिकांच्या प्रश्नांसाठी, श्रमिक, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी…. गेली ३७ वर्षे नितीन देशपांडे हे जागरूक नागरिक म्हणून सातत्याने प्रयत्नशील आहेत.

 उपाध्यक्ष : धर्मराज्य पक्ष
  • नितीन देशपांडे

  • उपाध्यक्ष : धर्मराज्य पक्ष
  • Join Me On:
'नितीन देशपांडे’ यांच्यासारखे जागरूक नागरिक नसते.... तर, ठाण्यातील उद्याने-बागबगीचे, तिवरांची जंगले, तलाव, मैदाने, मोकळे रस्ते, स्वस्त पिण्याचं पाणी, येऊरचं हिरवेगारपण, राखीव भूखंड.... हे सारे, ठाणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय भ्रष्ट राजकारणी व महापालिका-अधिकारी यांनी शिल्लक ठेवले नसते आणि भ्रष्टाचार आहे, त्यापेक्षाही भयानक बोकाळला असता! - राजन राजे
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या वादग्रस्त गृहनिर्माण सोसायटी विरोधात उभे राहण्याची हिंमत दाखवणारी कर्तव्यकठोर व्यक्ती - न्या. बी. जी. कोळसेपाटील
तनमनधनाने लढणारा पर्यावरण-संरक्षक - प्रा. गोपाळ दुखंडे
अभ्यासू व प्रामाणिक कार्यकर्ता - ऍड. प्रशांत पंचाक्षरी
कुठलाही स्वार्थ नसलेला, प्रसिध्दी पराड;मुख कार्यकर्ता - ऍड. प्रदीप टिल्लू
अत्यंत सहनशील, सद्गुणी, निस्वार्थी समाजसेवक - प्रा. विजय दप्तरदार
शंभर टक्के विश्वासार्ह कार्यकर्ता - दि. व्ही. असेरकर
निरलस, निष्ठावान, सरळमार्गी कार्यकर्ता - मनोहर पणशीकर
अत्यंत दुर्मिळ असा निःस्वार्थी कार्यकर्ता - वसंतराव केळकर

महाविद्यालयीन जीवनातील आंदोलने व सामाजिक उपक्रमातील सहभाग.

१. बी. एन. बांदोडकर महाविद्यालयाचे ‘विद्यार्थी प्रतिनिधी’(१९७७-७८)

२. मुंबई विद्यापीठ प्रतिनिधी(U.R.), विद्यार्थी मंडळ कार्यकारिणी सदस्य(१९७७-७८)

३. ऑल इंडिया स्टुडंटस् ऑर्गनायझेशन (आयसो)चे ‘संस्थापक सदस्य’... ‘आयसो’ मार्फत देशभर विद्यार्थी समस्यांवर अनेक यशस्वी आंदोलने(उदा. उल्हासनगरमधील फार्मसी-महाविद्यालय मुंबईला हलवू नये म्हणून व ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘ITI’ केंद्र उघडावीत म्हणून आंदोलनं)

४. अखिल भारतीय मराठी नाटय़ा-परिषदेच्या वादग्रस्त निवडणुकीत निवडणूक आयोग प्रतिनिधी म्हणून यशस्वी भूमिका.

५. ऍथलेटिक्स स्पर्धा, गुजरातमधील मोरवी-पूरग्रस्तांसाठी मदतफेरी, जलतरण स्पर्धा, नेत्रदानाची चळवळ.

६. अमर हिंद मंडळा(दादर)च्या निवडणूकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून यशस्वी जबाबदारी.

भ्रष्टाचाराविरूध्द लढे....

१. ठाणे महानगरपालिकेतील नोकर भरतीतील वशिलेबाजीला विरोध करून नितीन देशपांडे यांचा जनहिताच्या प्रश्नाला हात(वर्ष-१९८४)

२. मासुंदा तलावाभोवती मिठी मारून बसलेल्या फेरीवाल्यांना उठवून मासुंदा तलाव फेरीवालामुक्त करण्यासाठी यशस्वी न्यायालयीन लढा(वर्ष-२०००)

३. टपाल-कार्यालयाच्या भूखंडाचे आरक्षण उठविण्याचा डाव उधळला.

४. ठाणे महापालिकेचा ‘पांढरा हत्ती’ ठरलेल्या वैद्यकिय महाविद्यालयाला विरोध. ठाणे महापालिकेच्या लेखा-परिक्षण अहवालात वैद्यकीय महाविद्यालयावर गंभीर आक्षेप.

५. पदपथावरील सोनेरी दिव्यांच्या भ्रष्टाचाराविरूध्द लढा.

६. अभ्यास-दौऱ्यांच्या नावाखाली लाखो रूपयांच्या करदात्यांच्या निधीवर होणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर मधील नगरसेवकांच्या निरर्थक व महागड्या पर्यटन दौऱ्यांना नितीन देशपांडे यांचा सातत्याने विरोध.

७. नंदलाल समितीतील दोषी नगरसेवकांच्या संपत्तीची चौकशीची मागणी, ‘भ्रष्ट नगरसेवक चलेजाव’ यासाठी जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी ‘दत्ताजी ताम्हाणे’ यांच्या नेतृत्वाखाली ‘टॉर्च-मार्च’. ठाणे महापालिकेच्या ४१ टक्के भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी ‘नितीन देशपांडे’ यांच्या प्रयत्नाने ‘नंदलाल समिती’ स्थापन. नंदलाल समितीचे ठाणे महापालिकेच्या भ्रष्टाचारावर, अनियमिततेवर, आर्थिक गैरव्यवहारावर गंभीर आक्षेप.

 ८. नितीन देशपांडे यांच्या आंदोलनाला थोर समाजसेवक प. पू. अण्णा हजारे यांचा सक्रीय पाठींबा. तर, अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात नितीन देशपांडे यांचा सातत्यानं सक्रीय सहभाग; तसेच, माहितीचा अधिकार, जनलोकपाल यांसारख्या आंदोलनात ते अग्रभागी.

पर्यावरणासाठी लढे....

१. गणेश मूर्ती-विसर्जनाने तलावातील पाणी प्रदूषित होऊन गाळ साचतो आणि जिवंत पाण्याचे झरे लुप्त होतात. यामुळे कृत्रिम तलाव निर्माण करून मूर्ती-विसर्जन करावे, या नितीन देशपांडे यांनी उभारलेल्या चळवळीला पर्यावरणतज्ज्ञांचा पाठींबा व देशभर या प्रयोगाचे स्वागत.

२. निसर्गरम्य येऊर हे संवेदनशील व संरक्षक-पर्यावरणक्षेत्र जाहीर करण्यासाठी यशस्वी प्रयत्न.

३. येऊर येथे ध्वनी-प्रदूषणामुळे वन्यजीवांना होणाऱ्या त्रासाला आणि वन्यजीवांच्या अधिवासावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामाला जबाबदार असलेल्या, येऊर येथील हॉटेल्सवर कारवाईसाठी पुढाकार.

४. ठाणे कळवा खाडीतील बेकायदेशीर मातीची भर आणि सीआरझेडचा(CRZ) झालेला भंग, या नितीन देशपांडे यांनी लावून धरलेल्या प्रकरणाची केंद्रीय पर्यावरण खात्याकडून दखल. ठाणे कळवा खाडी पुलालगत मोकळय़ा जागेत मास्टर प्लॅन आणून ३७५ लक्ष खर्चाचा निसर्ग उद्यानाचा आराखडा मंजूर करण्यामागे सक्रिय झालेल्या ‘बिल्डर-राजकारण्यां’चे, बाळकूम रस्त्याबाजुची ९०० एकर खाडीतील जागा बांधकामासाठी खुली करणे हेच ध्येय होते. याद्वारे किनारा संरक्षण कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६, वृक्ष संरक्षण कायदा-१९७५, महाराष्ट्र-नगररचना कायदा-१९६६ यांचा भंग झाल्याचे नितीन देशपांडे यांनी दाखवून दिले. भारत सरकारच्या वन व पर्यावरण कक्षाच्या पश्चिम विभागाचे सहसंचालक डॉ. जे. बी. हरपनहळ्ळी यांनीही साईटचे निरिक्षण करून कायद्यांचा भंग झाल्यामुळे, नितीन देशपांडे यांचे म्हणणे मान्य केले. नितीन देशपांडे यांची ही लढाई पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आजही अतिशय महत्त्वाची आहे.

५. महापालिकेच्या बिल्डरधार्जिण्या धोरणामुळे करण्यात येणाऱ्या बेसुमार वृक्षतोडी विरूध्द प्राणपणाने लढा देऊन ठाणे शहरातील असंख्य वृक्षांचे संरक्षण.

६. ठाण्यातील अनेक तलाव व शहराची फुफ्फुसे असलेली मैदाने अतिक्रमणापासून वाचावीत म्हणून जीवाचं रान.

सर्वसामान्य नागरिकांच्या हितरक्षणासाठी आंदोलने व न्यायालयीन लढे....

१. पिण्याच्या पाण्याबाबत मीटर-पध्दतीसाठी न्यायालयात याचिका; तसेच, रस्ता अडविणाऱ्या सार्वजनिक उत्सवांविरोधात याचिका.

२. पाणी दरवाढीसाठी २० टक्के अधिकार लावण्याच्या ठाणे महापालिकेच्या धोरणाला नितीन देशपांडे यांचा सप्रमाण व सर्वप्रथम विरोध.

३. नवीन कळवा पुलाचे कंत्राट अव्यवहार्य असल्याच्या सिध्दतेची मांडणी व त्यामुळे त्या कामातील भ्रष्टाचार उघड.

४. प्रस्तावित रिंग-रेल्वेच्या फेरबदलास जोरदार विरोध.

५. फेरीवाल्यांमुळे आणि टपऱ्यांमुळे जनतेला होणाऱ्या त्रासाविरोधात आणि ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर शहर फेरीवालामुक्त आणि टपरीमुक्त व्हावे; म्हणून, नितीन देशपांडे यांनी सातत्याने आवाज उठविला.

६. महापालिका क्षेत्रातील मैदानांचा वापर पार्किंग किंवा इतर अतिक्रमणांसाठी न करता बाळगोपाळांना खेळासाठी व्हावा; म्हणून, यशस्वी प्रयत्न.

७. दारिद्रय़ाने गांजलेल्या ठाणे-जिल्ह्यातील(वाडा, मोखाडा) आदिवासी महिलांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना स्वयंरोजगार देऊन उद्योजक करण्यासाठी नितीन देशपांडे यांचे अथक प्रयत्न.

८. विकास आराखड्यातील राखीव भूखंडांना अतिक्रमणापासून वाचविण्यासाठी प्रयत्न.

९. जनतेच्या समस्या मांडण्यासाठी लोकशाही-दिन व मुख्यालय-दिनाच्या नियमित अंमलबजावणीसाठी नितीन देशपांडे यांचे सातत्याने प्रयत्न.

१०. विशेष म्हणजे ‘सीएसटी-रेल्वे-स्टेशन’वर शेपटाच्या भागात प्रसाधनगृहांसाठी लढा देऊन रेल्वे प्रवाशांची मोठीच सोय नितीन देशपांडे यांच्यामुळे झालीय.

११. माहितीच्या अधिकार कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी ठाणे - नवी मुंबई - मीरा-भाईंदर येथे ‘जाणीव-हक्काची’, या बिरुदाखाली परिषदांचे आयोजन.

१२. ठाणे-बेलापूर लोकल्स्ची वेळ वाढविली. १२ मिटरचा रेल्वे ब्रीज, रेल्वे स्टेशनची स्वच्छता, ठाणे-कळवा रेल्वे लाईनमधील धोकादायक खांब हलविला.

नागरी हितासाठी २१ जनहित याचिका.... ‘नितीन देशपांडे’ यांनी नागरी हितासाठी आजवर खालीलप्रमाणे २१ जनहित याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत.

१. नंदलाल समितीने उघडकीस आणलेले ठाण्यातील सर्वात मोठे व सर्वपक्षीय राजकारण्यांचे भ्रष्टाचार प्रकरण तडीस लावणे.

२. उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधिशांची दोन वर्षासाठी होणारी नियुक्ती आणि त्याच न्यायालयात या न्यायमूर्तींकडून केली जाणारी आक्षेपार्ह वकिली.

३. प्रकल्प-बाधितांसाठी राखीव असलेल्या जागेवर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे वादग्रस्त गृहनिर्माण प्रकरण.

४. राजन वेळूकर यांची बेकायदेशीर मुंबई विद्यापीठावर कुलगुरू नेमणूक प्रकरण.

५.  उद्योगपती मुकेश अंबानी यांना दिल्या गेलेल्या वादग्रस्त सी.आर.पी.एफ.ची सुरक्षा व्यवस्थेबाबत.

६. सॅटीस-प्रकल्पातील अव्यवहार्य बाबी.

७. सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली रस्ता अडविणे.

८. महापालिकेची जबाबदारी नसताना व आर्थिक तरतूद नसताना केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी ठाणे मेडिकल कॉलेज उभारणी प्रकरण.

९. पाण्यासाठी रद्द झालेली मीटर पध्दत सुरू करण्याबाबत.

१०. बिल्डरांना झुकतं माप देऊन बेकायदा वाढीव एफ्.एस्.आय(चटईक्षेत्र) न देण्याबाबत.

११. नालेबांधणीतला भ्रष्टाचार.

१२. महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांना शिक्षा दिलेल्या इंग्रज न्यायाधीशांचे तैलचित्र हटवून वास्तूसंग्रहालयात दाखल करणे.

१३. विविध अनधिकृत पक्ष-कार्यालये हटविण्याबाबत.

१४. आंबेघोसाळे-सिध्देश्वर तलाव वाचविण्याबाबत.

१५. मासुंदा तलावाशेजारी होणारे अनावश्यक व खर्चिक हँगिग गार्डन रोखण्याबाबत.

१६. मासुंदा तलावातील झुणका भाकर केंद्र हटविण्यासाठी.

१७. चेंदणी-तलाव बुजविण्यास विरोध करण्यासाठी.

१८. मासुंदा तलावाभोवतीचे फेरीवाले हटविण्याबाबत.

१९. राबोडीतील दंगलीतील राजकारण्यांच्या संशयास्पद भूमिकेबाबत.

२०. कोलबाड तलाव वाचविण्यासाठी.

२१. कळवा खाडी वाचवण्यासाठी.

सामाजिक चळवळींतील योगदान....

१. कोकणपट्टीतील जव्हार(ठाणे) पासून बांदा (सिंधुदुर्ग) पर्यंत, अनेक विषारी रासायनिक कारखान्यांच्याविरूध्द; तसेच, प्रदूषणकारी औष्णिकऊर्जा, अणुऊर्जा प्रकल्पांविरोधी आंदोलनात सहभाग.

२. आयशर-कामगारांच्या लढय़ात सक्रीय राहून नितीन देशपांडे यांनी कामगारवर्गाच्या संघर्षाशी स्वतःला जोडून घेतले. यानंतर त्यांनी सातत्याने विविध कामगार लढय़ांमध्ये ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांना मोलाची साथ दिली.

२० जुलै-२०१३ -मॅसेच्युएट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरीका) यांचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जीम वेस्कोट यांनी ठाणे शहरातील तलावांना भेट देऊन नितीन देशपांडे यांच्या लढ्याचे कौतुक केलेले आहे