Content

Style Switcher

img

आधुनिक कुरूक्षेत्रावरील गीता जगणारा योध्दा

शालेय जीवनात अत्यंत बुध्दिमान विद्यार्थी म्हणून गणलेला, ४ थीची स्कॉलरशिप परीक्षा, जुन्या अभ्यासक्रमातील ७वीची व्हर्नेक्युलर फायनल परीक्षा - या परीक्षांमध्ये ठाणे जिल्हयात सर्वोत्तम प्राविण्य, त्यानंतर जुन्या अभ्यासक्रमाची शालांत परीक्षा (मुंबई-पुणे एकत्रित एस्.एस्.सी. बोर्ड) - साडेतीन लाख विद्यार्थ्यांमध्ये ठाणे जिल्हयात मराठी विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आणि संपूर्ण एस्.एस्.सी. बोर्डात सोळावा - असं घवघवीत यश, नॅशनल स्कॉलरशिप व स्टेट स्कॉलरशिपचा बहुमान, मिळालेला विद्यार्थी, 'सर टाटा दोहराबजी ट्रस्ट स्कॉलरशिप'चा मानकरी, कायद्याची पदवी प्राविण्यासह प्राप्त केल्यानंतर अनेक शालेय संस्था, इतर सामाजिक संस्था व 'रोटरी क्लब' सारख्या मान्यवर संस्थांमध्ये विविध विषयांवर शेकडो व्याख्यानं दिली, नैसर्गिक शेती, कामगारक्षेत्र, शिक्षण, योगशिक्षण, खेळ अशा विविध विषयांवर अनेक मासिकं - वर्तमानपत्रांमध्ये लेखन, संवेदनशील व हळव्यामनाचां कवी म्हणून 'राजहंस' काव्यसंग्रहाचं प्रकाशन व त्याचं जनमानसांमध्ये झालेलं उत्स्फूर्त स्वागत (पाच हजारांहून अधिक प्रति वितरीत झाल्या), 'सर्वसामान्यांच जीवन-मरण आणि पर्यावरण । हवं एवढयासाठीच राजकारण' या संकल्पनेतून 'धर्मराज्य ' पक्षाची स्थापना.

गेले एक तपाहूनही अधिक काळ मराठी माध्यमातील असंख्य विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटपाच्या निमित्ताने मातृभाषेवरील प्रेम वर्धिष्णू करून व मराठी संस्कृति अंगी बाणवून व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी मोठया प्रमाणावर प्रेरित केले. ठाणे शहरातील काही निवडक बैठया चाळीतील व झोपडपट्टयांमधील मराठी माध्यमातून बारावी उत्तीर्ण होणाऱ्या गरीब विद्यार्थिनींना, प्रदीर्घकाळ सातत्यानं प्रोत्साहनपर ड्रेस् मटेरियल व शिलाई खर्च वाटप.

पर्यावरण-संरक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असताना नैसर्गिक शेतीचे अनुसरण, तसेच त्यावर व्यक्तिशः प्रयोग व संशोधन. सार्वजनिक क्षेत्रात व कामगार क्षेत्रात (आजच्या घडीला विविध कामगार क्षेत्रातील अडीच ते तीन हजार कामगारांचे नेतृत्व) धुतल्या तांदळासारखी शंभर टक्के स्वच्छ प्रतिमा असलेले, अलिकडच्या काळातील अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्व.

“ज्या लोकांना शिवछत्रपती, लो. टिळक, म. गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया, स्वा. सावरकर, साने गुरुजी मुळापासून समजले….. त्यांना, मी आणि माझा ‘धर्मराज्य पक्ष’ दोन्ही समजून घेणं फारसं अवघड नव्हे!" - राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)

समस्त कामगार वर्गाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून व हक्काच्या जागृति अगोदर कर्तव्याची जाण अंगी बाणवण्यासाठी प्रबुध्द करून त्यांच्यामधून सुसंस्कृत नागरिक घडवण्याचे ब्रीद हाती घेतले. 'सुल्झर पंप्स् इंडिया' या कंपनीतील कामगार संघटनेचे सलग २७ वर्षे अध्यक्षपद भूषवताना अखिल भारतीय स्तरावर कामगार क्षेत्रात अनेक विक्रमांची नोंद

१. कंपनीच्या उत्पादन विभागाशी संबंधित किंवा ऑफिस कामकाजाशी संबंधित एकही 'कंत्राटी कामगार-कर्मचारी' नाही. (एकूणएक कर्मचारी कायमस्वरूपी कंपनीच्या सेवेत असून युनियनचे सभासद आहेत. तसेच शोषणाधारित कुठल्याही प्रकारची 'बेक् सिस्टिम्' सारखी अनुचित कामगार प्रथा, कंपनीत अस्तित्वात ठेऊ दिलेली नाही)

२. कायमस्वरूपी सर्वात खालच्या श्रेणीतील कामगार-कर्मचाऱ्याचे शुभारंभाचे वेतन रू. २५,०००/- च्या घरात असणारी कदाचित भारतातील एकमेव कंपनी.

३. कंपनी कामगार-कर्मचाऱ्यांना 'सहा आकडी' म्हणजेच रू. १,००,०००/- हूनही अधिक बोनस रक्कम (वर्ष २००७) देणारी भारतातील एकमेवाव्दितीय कंपनी.

४. २७ वर्षाच्या कंपनी इतिहासात व्यवस्थापनाचा कामगार-कर्मचाऱ्यांवर किंवा कामगार-कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनावर एकही 'औद्यागिक खटला' दाखल नाही. तसेच गेल्या २७ वर्षात एकही दिवसाचा 'संप' किंवा कुठल्याही प्रकारचे औद्योगिक अशांततेतून आंदोलन निर्माण झालेले नाही. शिवाय एकही हाणामारीसारखा किंवा गंभीरस्वरूपाचा गुन्हा, कंपनी इतिहासात घडलेला नाही.

कामगारक्षेत्रातील टोकाची पिळवणूक व अन्याय करणारी 'मजूर-कंत्राटदारी' नावाच्या 'आधुनिक औद्योगिक व सेवाक्षेत्रातील अस्पृश्यतेच्या' गुलामगिरीच्या प्रथेविरूध्द सातत्याने गेल्या दहा वर्षाहूनही अधिक काळ प्रखर आंदोलन. उदा. 'आयशर कंपनी', ठाणे येथील गेल्यावर्षीचा ६९ दिवसांचा यशस्वी संप, पेपर प्रॉडक्ट्स् लि., माजीवडा, ठाणे मधून आमरण उपोषणासारखे तीव्र आंदोलन, १ मे रोजीच्या महाराष्ट्र दिनी बदलापूर-कल्याण-डोंबिवली-कळवा-ठाणे-नवी मुंबई-मुंबई इतक्या विविध ठिकाणी 'दिड ते दोन हजार' कार्यकर्त्यांनिशी 'कंत्राटी-प्रथे' विरोधात गळयात निषेध फलक अडकवून मानवी साखळीव्दारे प्रभावी आंदोलन, कंत्राटीप्रथेविरोधात असंख्य ठिकाणी जन-जागृती अभियान. अफूच्या ग्लानीसारखी आत्मघातकी ग्लानी समाजात निर्माण करणाऱ्या फाजील उत्सवप्रियते विरोधात 'सुदर्शन दहिहंडी'सारखी परिणामकारक अभिनव आंदोलन.

देशातील बेरोजगारी हटवण्यासाठी व कामगाराच्या शोषणाला व सर्रास व्यवस्थापकीय मंडळींतर्फे अवलंबिल्या जात असलेल्या 'अनुचित कामगार प्रथांना' प्रभावी आळा घालण्यासाठी विविध नव-संकल्पनांचा आग्रही पुरस्कार. उदा. आलटून-पालटून 'तीन व चार दिवसांचा आठवडा' राबविण्याची महत्वपूर्ण सूचना (वेतनात कपात न करता) ज्यामुळे ५०% बेकारी एका रात्रीत दूर होण्याबरोबरच औद्योगिक उत्पादनात १६% हून अधिक वाढ सहज संभाव्य, दररोज 'सहा तासांची शिफ्ट' अशा एकूण चार शिफ्टमध्ये काम करून घेण्याने तत्काळ ३३% बेकारी दूर होऊन व्यक्तिगत व सामाजिक आरोग्य सुधारेल, H.R विभाग संभाळणाऱ्यांना ठराविक काल मर्यादेनंतर कर्मचाऱ्यांप्रती उत्तरदायी बनवण्यासाठी औद्योगिक आस्थापनांमध्ये कामगार-कर्मचाऱ्यांचे किमान ५०% समर्थन प्राप्त करणे अनिवार्य करणे, किमान वेतनासारख्या कामगार सुरक्षा कायद्यांची १००% भ्रष्टाचारमुक्त प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वपक्षीय 'नागरी-युवा मोहल्ला कमिटयांच्या' नेमणुकींची महत्वपूर्ण सूचना इ.

श्री माऊली सहकारी पतपेढीचे 'सल्लागार' या नात्यानं ठाणे शहरात सहकारक्षेत्राशी संबंधित आदर्श संरचनेची उभारणी! तसेच गेल्या अर्ध्यातपाहून अधिक काळ 'योग-प्रशिक्षणाच्या' कार्यक्षेत्रात कार्यरत राहून २५०० ते ३००० लोकांना 'योगप्रक्रियेचे' प्रशिक्षण दिले.

ठाण्यातील क्रिडाक्षेत्राशी जवळून संबंधित असून कॅरम खेळातील एकेकाळचे अव्वल मानांकित खेळाडूंपैकी एक खेळाडू.

२००९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अनुक्रमे १,३०,००० व ४५,००० पेक्षा जास्त मते मिळवली.

राजन राजे
पत्ता : ६०१/६०२, शुभारंभ - १, बिल्डींग नं. ७, कोकणी पाडा मार्ग, घोडबंदर रोड, ठाणे - ४०० ६१०.
मोबाईल : ९८२१० ६४८९८ | संकेत स्थळ : http://rajanraje.com