Content

Style Switcher

लोककल्याण, संस्कृति निर्माण आणि न्याय्य-विधान

img

माझी प्रार्थना

"माझ्या देहात प्राण असेस्तोवर आणि जोवर हा जनताजनार्दन मला त्याच्या ‘न्याय्य’ हुंकाराचा प्रणेता मानतो तोवर हे परमेश्वरा, सर्वसामान्यांच्या जीवनात प्रकाशाची मशाल धरण्याचे बळ तू माझ्या दो करांना दे!"

माझं दैवत

१) सद्रक्षणासाठी आणि खलनिग्रहणासाठी ज्याने धर्माचे राज्य निर्मिले.

२) दया,क्षमा,शांती हे ब्रीद मानिले, प्रसंगी शत्रूलाही ममत्वाने आपलेसे केले.

३) धर्म आणि माणुसकीचा वैरी झालेल्या शत्रूच्या विनाशासाठी प्रसंगी स्वतः शस्त्रकरी धरिले.

४) ज्याने फक्त न्याय आणि न्यायच केला आणि न्यायदानासमयी नाती गोती, शत्रू-मित्र, धर्म, पंथ, जात पात यांचा विचारही मनास स्पर्शू दिला नाही.

५) प्रबळ आणि राक्षसी वृत्तीच्या शत्रूच्या निःपातासाठी गनिमी कावा केला, कपटाला कूटनितीचा शह दिला.

असा हा धैर्याचा मेरूमणी, प्रजाहितदक्ष, नेतृत्वाचा हिमालय, मर्यादापुरूष, धर्म-संस्कृति रक्षक, राष्ट्रविधाता ‘छत्रपती शिवाजी राजा’ माझं आराध्य दैवत आहे!

माझा निश्चय

"माझी योग्यता शिवछत्रपतींच्या पायधुळीसमान जरी असो, तरीही माझ्या संघटनाकार्यात शिवाजी महाराजांच्याच राजनितीचं प्रतिबिंब ठायी ठायी पडेल, याची दक्षता घेऊन माझी प्रत्येक कृति अहंकाराला पूर्णतः तिलांजली देऊन शिवछत्रपतींच्या पावन चरणी समर्पित करेन!"