Content

Style Switcher

img

‘धर्मराज्य पक्षा’तील सर्व बंधुभगिनींना । आदरपूर्वक वंदन करून । मी । ‘धर्मराज्य पक्षा’चा । पदाधिकारी या नात्याने । अशी शपथपूर्वक प्रतिज्ञा करीतो की, । मी माझे कर्तव्य । निर्भयतेने, । नि:पक्षपातीपणे । व न्याय्य बुध्दीने पार पाडेन. ।

अशातऱ्हेने । माझे कठोर कर्तव्य । पार पाडत असताना । मी सर्वांशी । आपुलकीने व प्रेमाने वागेन. ।

तसेच । कुठल्याही पक्ष सभासदाची । जातपात, । धर्मपंथ, । माझ्याशी व्यक्तिगत असलेली नातीगोती । किंवा मित्रत्व । किंवा शत्रूत्व । याचा काडीमात्र विचार न करता । मी सर्वांना । समानतेने व सन्मानाने वागवेन. ।

मात्र । कर्तव्य चुकार व अन्यायाने वागणाऱ्या । पक्ष सभासदाचा । मी प्रसंगी कुठलाही भेदभाव न बाळगता । कठोरतेनं मुकाबला करेन. ।

माझं । व्यक्तिशी नव्हे । तर त्या व्यक्तिच्या । चांगल्या प्रवृत्तींशी मित्रत्व । व वाईट प्रवृत्तींशी शत्रुत्व राहील. ।

मात्र प्रवृत्तींमध्ये । कायमस्वरूपी मूलभूत बदल होताच, । दया, क्षमा, शांती या न्यायाने । वाट चुकलेल्या । माझ्या पक्षातील बांधवांशी वा भगिनींशी । पूर्ववत प्रेमाने व सन्मानाने वागेन. ।

माझ्या नेत्याचे । ‘न्याय’ आदेश । व संघटनेची महान तत्त्वे । यांची मी । जागृकतेनं । व कार्यक्षमतेनं अंमलबजावणी करेन ।

आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’च्या । आदर्श विचारधारेचा व तत्त्वांचा । मला अभिमान असून । त्यांचं पालन करणे । हे मी माझे । परम कर्तव्य मानतो ।

।। जय महाराष्ट्र - जय हिंद ।।