Content

Style Switcher

शहीद विलास शिंदे कुटुंबाला आर्थिक मदत. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

खार (मुंबई) येथे दुचाकीस्वारांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना 'धर्मराज्य पक्षा'च्यावतीने ठाणे शहर, नवी मुंबई आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस पत्नी संघटनेच्या संस्थापक, अध्यक्षा यशश्री पाटील यांची विशेष उपस्थिति होती. ठाणे स्टेशन परिसर, राबोडी, वर्तकनगर नाका, ऐरोली रेल्वे स्टेशन आणि कामोठे या ठिकाणी पक्षाच्यावतीने स्व. विलास शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, त्यांनी पत्करलेल्या हौतात्म्याबद्दल मेणबत्ती प्रज्वलित करुन, दुःख व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी 'धर्मराज्य पक्षा'चे अध्यक्ष मा. राजन राजे (Rajan Raje) यांनी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात जातीने उपस्थित राहून शिंदे यांच्या प्रतिमेस वंदन करुन श्रद्धांजली अर्पण केली.

स्व. विलास शिंदे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या निधी संकलन आवाहनाला ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, सढळ हस्ते आर्थिक मदत केली.

Table 'dharmhlw_drp.donations' doesn't exist