सावित्री नदी दुर्घटनेविरोधात धर्मराज्य पक्षाचा ठाण्यात लाक्षणिक उपोषण

महाडयेथील सावित्री नदीवरील दुर्घटनेसंदर्भात प्रस्थापित व मुजोर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि कोकणवासीयांच्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या उपोषणाचे नेतृत्व ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे यांनी केले. महाडच्या दुर्घटनेनंतर ठाणे खाडीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने, तो जोपर्यंत सुस्थितीत आणि सुरक्षित करण्यात येत नाही, तोपर्यंत कोपरी-आनंदनगर तसेच ऐरोली पुलाजवळील टोलवसुली बंद करण्यात यावी अशीही मागणी यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’कडून करण्यात आली.
याप्रसंगी राजन राजे यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. पक्षाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, उपाध्यक्ष राजू सावंत, खजिनदार जयेंद्र जोग, ‘धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित, ठाणे विधानसभा सह-सचिव विजय भोसले, खोपट विभाग अध्यक्ष राजू शिंदे, कोपरी-आनंदनगर प्रभाग अध्यक्ष नितीन वायदंडे, संदीप सोनखेडे, नितीन उगले, रॉजर सायमन, गौरव गोरे, विकास मंडपे, सुहास बुगडे, प्रकाश डोंगरे, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, शिक्षक संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, ठाणे लोकसभा महिला सचिव दर्शना पाटील आणि मयुरी वायदंडे आदी पुरुष आणि महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!