महिना: एफ वाय

ठाण्यातील पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने लाक्षणिक उपोषण

सिव्हिल हॉस्पिटलसमोरील इमारत क्रमांक दोनच्या गच्चीचा भाग शनिवारी (ता. ६) सायंकाळी कोसळल्याने पोलिस कुटुंबीय धास्तावले आहेत. पोलिस वसाहतींत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून घरभाडेपट्टी व देखभाल खर्च घेतला जात असतानाही या इमारतींची व्यवस्थित देखभाल किंवा दुरुस्ती केली जात नव्हती. या इमारती ६० वर्षे जुन्या आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा नियम असतानाही एकही ऑडिट करण्यात आलेले नाही. या इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बाधणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, धोकादायक इमारतींतील जिने, व्हरांडे यांची स्थिती पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. इमारत क्रमांक २ मधील गच्चीचा कोबा तोडून केलेल्या दुरुस्तीमुळे पावसाळ्यात घरांत पाणी गळते, अशी तक्रार या इमारतीतील रहिवाशांनी केली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने संबंधित विभागास युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत व या वसाहतीतील पोलिस कुटुंबांचे जीवन सुसह्य करावे, या मागणीसंदर्भात ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने गुरुवार दि. ११ डिसेंबर-२०१४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान सरकारी विश्रामगृह, ठाणे येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

उल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीर

, , ,

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (३० वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (३० वर्षावरील व्यक्तींसाठी), डॉक्टरी सल्ल्यानुसार ECG (हृद्यास्पंदनालेख) तपासणी आदी तपासण्या व डॉक्टरांचा सल्ला मोफत देण्यात येणार आहे. सदर शिबीर रविवार, दि. ७ डिसेंबर-२०१४ रोजी, सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० यावेळेत, साईनाथ मित्र मंडळ, एमआयडीसी वॉटर टँक रोड, बिर्ला मंदिर, शिवनेरी नगर, उल्हासनगर-1 या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक लोकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘‘धर्मराज्य पक्षा’’चे उल्हासनगर (शहर) विधानसभा अध्यक्ष गौतम बस्ते यांनी केले आहे.

error: Content is protected !!