
दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवछत्रपतींच्या प्रतिमेस ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे (Rajan Raje) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन, स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी राजन राजे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतानाच, आपल्या भाषणात पक्षाची राजकीय, पर्यावरणवादी आणि क्रीडाविषयक धोरणांबाबतची परखड मते मांडली.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने ‘धर्मराज्य पक्ष’ आयोजित या भव्यदिव्य स्पर्धेसाठी एकूण ५ लाखांहून अधिक रोख परितोषिकांची बक्षिसे देण्यात येणार असून, पुरुष एकेरीसाठी १ लाख, महिला एकेरीसाठी ३० हजार, पुरुष ज्येष्ठ खेळाडू १० हजार, महिला ज्येष्ठ खेळाडू ५ हजार, पुरुष संघ (प्रथम) ३० हजार तर महिला संघ (प्रथम) १५ हजार अशा रोख रकमेचे वाटप करण्यात येणार आहे.
