दिवस: ऑगस्ट 20, 2016

कामोठे ग्रामस्थांच्या लाक्षणिक उपोषणाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची उपस्थिती…!

गटातटाच्या राजकारणाला बळी पडून आणि ग्रामसभेला राजकारणाचा अड्डा बनवून, सर्वसामान्य ग्रामस्थांचे हक्क डावलणा-या प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या मनमानी कारभाराविरोधात शनिवार, दि. २० ऑगस्ट रोजी कामोठेवासीयांनी पुकारलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कामोठे-जुई-नौपाडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सुमारे १५० कार्यकर्ते या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले होते.
यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. “प्रशासकीय व्यवस्थेत असलेल्या गुंडगिरीविरोधात लोकशाही मार्गानेच लढा दिला पाहिजे, त्यासाठी ‘धर्मराज्य पक्ष’ सदैव कामोठेवासीयांच्या पाठीशी राहील” अशा शब्दात राजन राजे यांनी आपला पाठिंबा दर्शवला.
याप्रसंगी मावळ लोकसभा अध्यक्षा शोभना म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष गोपीनाथ भगत, उपाध्यक्ष संतोष गोवारी, सचिव भाऊ म्हात्रे, युवा अध्यक्ष सुमित गोवारी, युवा उपाध्यक्ष सागर म्हात्रे, युवा सचिव सचिन गोवारी, कामोठे शहर अध्यक्ष रत्नाकर गोवारी, उपशहर अध्यक्ष रमाकांत गोवारी, सचिव परशुराम म्हात्रे, कामोठे गाव अध्यक्ष गणेश नाईक, उपाध्यक्ष राजू म्हात्रे, सचिव महेंद्र म्हात्रे, जुई गाव अध्यक्ष चंद्रकांत चिमणे, उपाध्यक्ष अमृत कडू, सचिव स्वामी म्हात्रे, नौपाडा गाव अध्यक्ष बाबुराव भगत, उपाध्यक्ष प्रकाश भगत, सचिव रमेश भगत, सह-सचिव भगवान भगत आणि संपर्कप्रमुख पंढरीनाथ भगत आदी पदाधिका-यांसोबत ‘धर्मराज्य पक्षा’चे शेकडो कार्यकर्ते आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!