भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने पर्यावरण विषयाला चालना देण्यासाठी ‘मी सायकल चालविण्याचा निर्धार केलाय कारण…’ या विषयावर न्यू इंग्लिश स्कूल ठाणे येथे गुरूवारी सकाळी १० : ०० वाजता भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना ७२५सायकलींचे बक्षीसरूपाने वाटप होणार आहे.
आरोग्य व पर्यावरण संरक्षणाचे प्रभावी साधन, वाहतूक कोंडीवरील सुलभ उपाय, हृदयरोग, मधुमेह, अस्थमा आदी रोगांवरील परिणामकारक उपाय, उत्तम शारिरीक व्यायाम, प्रदूषणावर परिणामकारक उपायासंदर्भात महत्त्वाचा असलेल्या ‘मी सायकल चालविण्याचा निर्धार केलाय कारण…’ या विषयांतर्गत ‘धर्मराज्य पक्षा’ने ‘भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० असे दोन शालेय गट आणि महाविद्यालयीन गट अशा तीनही गटांतील विजेत्या स्पर्धक मुलींना ३६५ आणि मुलांना ३६० असे रू. ४,५००/- किंमतीचे एकूण ७२५ सायकलींचे बक्षीसरूपाने वाटप कले जाणार आहे. तसेच निबंध स्पर्धेतील सहभागी होणाऱ्या सर्वच मुला-मुलींना ‘दिवाळीची विशेष भेट’ आणि ‘प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे.
गुरूवार, दि. १४ नोव्हेंबर २०१३ रोजी, सकाळी १० वाजता न्यू इंग्लिश स्कूल, राममारूती रोड, ठाणे (प.) येथे ही निबंध स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धेतील सहभागासाठी जयेंद्र जोग (98209 13925), राजेश गडकर (93246 81224) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव राजू फणसे यांनी केले आहे.