ठामपातील बेसुमार वृक्षतोडीविरोधात `धर्मराज्य पक्षा’ ची निदर्शने

रस्तारूंदीकरण आणि शहरीकरणाच्या नावाखाली ठाणे महानगरपालिकेने सध्या शहरातील नौपाडा, वर्तकनगर आणि पोखरण रोडवरील डेरेदार वृक्ष निर्दयीपणे कापायला सुरूवात केली आहे. एकाअर्था, ठामपा पुरस्कृत निसर्ग आणि पर्यावरणाचा खून पाडण्याचं कार्य महापालिका प्रशासनानं हाती घेतलेलं असून, त्याचाच निषेध करण्यासाठी `धर्मराज्य पक्षा’च्यावतीने शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ `वसुंधरा दिना’च्या पार्श्वभूमीवर तीव्र निदर्शने करण्यात आली. ठाणे शहराला लाभलेला निसर्गाचा समृध्द वारसा यानिमित्ताने नष्ट होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप यावेळी `धर्मराज्य पक्षा’ने ठाणे महापालिका प्रशासनावर केला आहे.
दरम्यान, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहर विकासाच्या आणि रस्तारूंदीकरणाच्या आड येणारी अनधिकृत बांधकामे तोडण्यास धुमधडाक्यात सुरूवात केली आहे. आयुक्तांच्या या धडाडीचे ठाणेकर नागरिकांनी कौतुक केले असले; तरी, बेसुमार वृक्षतोडीमुळे नागरिक नाराज झालेले आहेत. नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी विभागात सध्या प्रस्तावित उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून, त्यासाठी संपूर्ण महात्मा गांधी रस्त्यावरील झाडांच्या कत्तली झाल्या आहेत. मुळात याठिकाणी उड्डाणपूलाची आवश्यकता नसतांना तो उभारण्याचा घाट कुणाला खूष करण्यासाठी घातला जातोय? असा सवालदेखील `धर्मराज्य पक्षा’ने यावेळी उपस्थित केला आहे. याप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, धर्मराज्य महिला संघटनेच्या समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा अध्यक्षा जयश्री पंडित, नवी मुंबई शहर उपाध्यक्षा रेखा साळूंखे, दर्शना पाटील, गिता पाटील, उज्ज्वला जाधव, पोर्णिमा सातपुते, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, सहसचिव दिनेश चिकणे, प्रभाग क्र. ४७ चे प्रभाग अध्यक्ष समीर कालगुडे, प्रभाग क्र. 24 चे प्रभाग अध्यक्ष राजू शिंदे, डोंबिवली शहर अध्यक्ष जगदीश जाधव, ठाणे शहर माहिती अधिकार कक्ष प्रमुख अनिल महाडिक, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्ष प्रा. भरत जाधव, प्रकाश पवार, दिपक देशपांडे, युवा कार्यकर्ता संदीप सोनखेडे, अमित लिबे, मनोज बेर्डे, गंभीर आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!