‘धर्मराज्य’ म्हणजे ‘नीतिधर्म राज्य’….. ‘नैसर्गिक न्यायतत्त्व‘ सुसंगत व्यक्तिगत, सामाजिक व राजकीय व्यवहाराचा आग्रह…. मानवी पिढ्यापिढ्यांचा व पृथ्वीतलावरील अवघ्या सजीवसृष्टीच्या ‘शाश्वत-कल्याणा’चा ‘अंतिम-सत्यवादी’ विचार व व्यवहार…. ज्याचा, कुणा एका धर्माशी संबंध नसून, वरील दृष्टिकोनाच्या संदर्भात म्हटलं तर, सर्वच धर्मांचं सार आणि जागतिकस्तरावरील यच्चयावत उपलब्ध सर्व तत्त्वप्रणालींचा (ज्याला, कोणी कुठला ‘ईझम्’ही म्हणू शकेल!) साररुपाने विचार त्यात आहे.
यालाच आपण असही म्हणू शकतो की, “अध्यात्म, समाजकारण आणि राजकारण यांचा समष्टिच्या हिताच्या दृष्टिनं सांधा जुळवणं!”
शालेय जीवनात अत्यंत बुध्दिमान विद्यार्थी म्हणून गणलेला, ४ थीची स्कॉलरशिप परीक्षा, जुन्या अभ्यासक्रमातील ७वी ची व्हर्नेक्युलर फायनल परीक्षा - या परीक्षांमध्ये ठाणे जिल्हयात सर्वोत्तम प्राविण्य, त्यानंतर जुन्या अभ्यासक्रमाची शालांत परीक्षेमध्ये (मुंबई-पुणे
गेल्या दोन तपाहूनही अधिक काळ निसर्ग-पर्यावरण संरक्षण-संवर्धनाबाबत कोकणातील जैतापूर अणुप्रकल्प, धोपावे-तवसाळसारखे राखेचे डोंगर उभे करु पहाणारे औष्णिक ऊर्जाप्रकल्प तसेच, नाणार जीवाश्म तेलशुद्धीकरण प्रकल्पविरोधी आंदोलनांमधून हिरिरीने सहभाग. आरे-काॅलनीतील मेट्रोकारशेड प्रकल्पासाठी प्रचंड वृक्षतोड होऊन उजाण होत होणाऱ्या आरे काॅलनीतील जंगलाचं संरक्षण करण्यासाठीच्या आंदोलनात राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली ‘धर्मराज्य पक्षा’चा मोठा पुढाकार.
पर्यावरण-संरक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असताना नैसर्गिक-जैविक शेतीचे, कुठलीही तडजोड न करता अनुकरण, तसेच त्याबाबत व जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासंदर्भात व्यक्तिशः अतिशय मेहनतीने व चिकाटीने अथक प्रयोग व संशोधन.
आरोग्य-शिक्षण सेवा, सार्वजनिक क्षेत्राद्वारे उत्तम दर्जाच्या व किफायतशीर दरात सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी पक्षीय पातळीवरुन जोरदार धोरण-आग्रह धरताना, त्याकामी अनेक आंदोलनांना चालना दिली. तसेच, कामगार क्षेत्रात हजारो कामगारांचे नेतृत्त्व करताना “धुतल्या तांदळासारखं शंभर टक्के स्वच्छ प्रतिमा असलेलं, अलिकडच्या काळातील अत्यंत दुर्मिळ लढवय्यं व्यक्तिमत्व”, ही प्रतिमा निर्माण केली.
समस्त कामगार वर्गाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून, हक्काच्या जागृतिअगोदर कर्तव्याची जाण अंगी बाणवण्यासाठी, त्यांना प्रबुध्द करुन त्यांच्यामधून सुसंस्कृत नागरिक घडवण्याचे ब्रीद हाती घेतले व त्यातूनच, अखिल भारतीय स्तरावर कामगार क्षेत्रात अनेक विक्रमांची नोंद
१) धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाची अथवा व्यक्तिशः राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील कंपन्यांच्या उत्पादन विभागाशी संबंधित किंवा कार्यालयीन कामकाजाशी संबंधित ‘कंत्राटी कामगार-कर्मचारी पद्धती’ला पायबंद! एकूणएक कामगार-कर्मचारी कायमस्वरुपी कंपनीच्या सेवेत. तसेच शोषणाधारित कुठल्याही अनुचित कामगार प्रथेला कुठल्याही कंपनीत बिलकूल थारा नाही.
अखिल भारतीय पातळीवर अत्यंत अपवादात्मक असा, “समृद्धी सर्वांची” (Common-Prosperity OR Shared-Prosperity) या ‘धर्मराज्य पक्षा’च्या अंगभूत धोरणानुसार राजकारणात व कामगारकारणात शक्य तिथे यशस्वीरित्या प्रत्यक्ष व्यवहार...
२) ‘बेकार-भत्त्या’ च्याही लायकीचं नसलेल्या तुटपुंज्या ‘किमान-वेतना’ला आव्हान देताना, “किमान-वेतन रु. ३०,०००/- प्रतिमास, ‘न’ देणाऱ्यास तुरुंगवास”, अशी बुलंद घोषणा देत, ती प्रत्यक्षात अनेक कंपन्यांमधून व्यवहारात यशस्वीरित्या राबवणारं क्रांतिकारी कामगार-नेतृत्त्व!
३) अनेक कंपन्यांमधून सर्वात खालच्या श्रेणीतील कामगार-कर्मचाऱ्यांना सुरुवातीचं वेतनमान ४० ते ५० हजाराच्या घरात तसेच, सातत्याने ‘सहा आकडी’ म्हणजेच रु. १,००,०००/- हूनही अधिक बोनस रक्कम देण्याचा विक्रम नावावर असलेला एकमात्र विश्वासार्ह असा अखिल भारतीय कामगार नेता.
४) सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीला कायमचा पायबंद घालण्यासाठी महसूल-करसंरचनेत आमूलाग्र बदल करु पहाणारे ‘अर्थक्रांती-विधेयक’ आणि ‘जनलोकपाल-विधेयका’चा संयुक्तरित्या विवेकपूर्ण आग्रह धरणारा... एकमात्र राजकीय नेता राजन राजे आणि एकमात्र राजकीय पक्ष ‘धर्मराज्य पक्ष’!
५) औद्योगिकीकरण, शहरीकरणाचा उधळलेला अश्वमेध रोखून तसेच जीवनशैली-अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करुन ‘कार्बन-ऊत्सर्जना’ला मूळातून आवर घालू पहाण्याचा आग्रह धरणाऱ्या निसर्ग-पर्यावरणवादी राजकारणी विचारसरणीचा प्रसार व प्रचार...
केवळ, “जल, जंगल, जमिनीचीच सुरक्षा-संवर्धन नव्हे... तर, जनसंख्या आणि जीवनशैली”लाही (पाच प्रकारचे ‘ज’) रोखून धरण्याचा मूलगामी आग्रह धरणारा एकमेव राजकीय नेता...
६) लोकशाहीमूल्यांवर अतूट निष्ठा असणारा व राष्ट्रपिता म. गांधी यांची ‘अहिंसे’ची शिकवणूक, ही केवळ ‘पक्षीय-धोरण’च नव्हे; तर, ‘जीवनमूल्य’ मानणारा नेता...
...राजन राजे अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)
सर्वसामान्यांचं जीवन आणि निसर्ग-पर्यावरण, हवं एवढ्यासाठीच राजकारण!...