महाडयेथील सावित्री नदीवरील दुर्घटनेसंदर्भात प्रस्थापित व मुजोर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि कोकणवासीयांच्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या उपोषणाचे नेतृत्व ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे यांनी केले. महाडच्या दुर्घटनेनंतर ठाणे खाडीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने, तो जोपर्यंत सुस्थितीत आणि सुरक्षित करण्यात येत नाही, तोपर्यंत कोपरी-आनंदनगर तसेच ऐरोली पुलाजवळील टोलवसुली बंद करण्यात यावी अशीही मागणी यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’कडून करण्यात आली.
याप्रसंगी राजन राजे यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. पक्षाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

