section-d562af4

section-d8ea7e6

पक्षाचे उपक्रम..

section-3c0643b

अध्यक्षांची निवडक प्रकाशनं..

//dharmarajya.org/wp-content/uploads/2025/02/India-Ek-Idea-FInal-Book-Setup-page-001-scaled.jpg
//dharmarajya.org/wp-content/uploads/2025/02/RAJHANS-KAVITASANGRAH-page-001-scaled.jpg
//dharmarajya.org/wp-content/uploads/2025/02/Booklet-page-001-scaled.jpg
section-faf073c

पक्षाची धोरणं..

निसर्ग-पर्यावरणस्नेही

निवडणुका लढवणं, निवडणुका जिंकणं... हे फक्त साधन आहे, साध्य नव्हे! अवघ्या जनतेच्या, सन्मानानं आणि समाधानाने जगण्याच्या आकांक्षांची पुर्तता करणं व निसर्गाकडून जेवढं घेऊ तेवढं निसर्गाला परत देऊ... हे आणि हेच, केवळ आमचं विश्वकल्याणकारी अंतिम ध्येय राहिलेलं आहे, अगदी आम्हा प्रत्येकाच्या अखेरच्या श्वासापर्यंत...

जात-धर्मनिरपेक्ष

धर्म-जातीपाती-आरक्षणासारखी ‘रणं’ पेटती ठेवून सकळ राजकीय व्यवस्थेनं शिक्षण, आरोग्य, पायाभूतसुविधा इ. जनकल्याणकारी क्षेत्रातील आपली जबाबदारी झटकून टाकून, आपल्या स्वार्थासाठी खाजगी क्षेत्राला चरायला मोकळ रान दिलेलं आहे. त्याविरुध्दचा ‘धर्मराज्य पक्षा’चा लढा, हा जात-धर्म-निरपेक्ष ‘एल्गार’ आहे!

भुमिपुत्र - न्याय, हक्क व सन्मान

"संयुक्त-महाराष्ट्रानंतर 'स्वायत्त-महाराष्ट्र'... राष्ट्रांतर्गत राष्ट्र, स्वायत्त-महाराष्ट्र" अशी परिपूर्ण संघराज्यीय तत्त्वप्रणाली राबवून भारतातील सर्व राज्यांना जास्तीतजास्त स्वायत्तता देण्यात यावी, तसेच प्रत्येक राज्याच्या भाषिक संस्कृतिचं जतन व संरक्षण करुन प्रत्येक राज्यात मातृभाषेला उत्तेजन व मातृभाषेतूनच न्याय, शिक्षण व सरकारी कामकाजाचा आग्रह.

कंत्राटी-कामगार/कर्मचारी

संघटित-असंघटित कामगारक्षेत्रात, विशेषत: कंत्राटी कामगार प्रथेविरूध्द. या प्रथेला धर्मराज्य पक्ष सेवा व उद्योगक्षेत्रातली ‘नव-अस्पृश्यता’ व ‘गुलामगिरी’ मानतो. आजवर आम्ही दलित-बहुजनांचे टोकाचे लढे लढत आलेलो आहोत. कंत्राटदारीतल्या ‘नव-अस्पृश्यते’ विरुध्द प्रखर लढयासाठी देखील धर्मराज्य पक्ष कृतसंकल्प आहे.

भ्रष्टाचार, शोषण व अन्याय

राजकारणाची मैली-गंगा, अध्यात्माची ‘मात्रा’ देऊन शुध्द करण्याचा आमचा भगीरथ प्रयत्न राहील. आम्ही कुठलाही धर्म ही ‘अफूची गोळी’ न मानता, उलटपक्षी अन्यायी-संवेदनाशून्य, भ्रष्ट व विषम व्यवस्थेविरुध्द, देशात प्रथमच धर्मश्रध्दांचा प्रभावी वापर, आम्ही राजकारण-शुद्धीसाठी करु पहात आहोत.

शिक्षण व आरोग्य

शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेली ‘चातुर्वर्ण्य’ व्यवस्था व आरोग्य व्यवस्थेत निर्माण झालेली ‘पंचतारांकित’ व्यवस्था मोडीत काढणे हे ‘धर्मराज्य पक्षा'चे ध्येय आहे. आजच्या महागडया खाजगी शिक्षण व आरोग्य व्यवस्थेऐवजी, स्वस्त व तेवढयाच उच्चदर्जाच्या सार्वजनिक भ्रष्टाचारमुक्त व कार्यक्षम शिक्षण व आरोग्य सुविधेला चालना.

section-fc1e146

आमचे विचार..

कंत्राटी-कामगार/कर्मचारी = गुलाम + नव-अस्पृश्य
कंत्राटदार + कंपनी व्यवस्थापन = चोर + दरोडेखोर
"जुलमी कंत्राटी-कामगार प्रथेविरुद्ध 'धर्मयुद्ध' पुकारणारा एकमात्र नेता...राजन राजे!"

|| जय महाराष्ट्र, जय हिंद ||

"संयुक्त-महाराष्ट्रानंतर 'स्वायत्त-महाराष्ट्र'... राष्ट्रांतर्गत राष्ट्र, स्वायत्त-महाराष्ट्र"

नैसर्गिक-शेती... अस्तित्वाची शाश्वती...!!!

आपल्या देशातील शहाणपण गमावलेल्या आणि खुज्या नीतिमत्तेच्या, संवेदनाशून्य-स्वार्थी राजकारण्यांनी, भांडवलदारांनी व त्यांच्या दलाल-हस्तक बुध्दीमंतबाळांनी चालविलेली पर्यावरणाची विनाशकारक हानी रोखण्यासाठी.... 'सर्वसामान्य माणूस' आणि 'निसर्ग-पर्यावरण संरक्षण', याला विकासाचा केंद्रबिंदू मानणारा एकमेव १००% प्रामाणिक व दूरदर्शी पक्ष...'धर्मराज्य पक्ष', भारतातील पहिलावहिला 'निसर्ग-पर्यावरणवादी हरित' पक्ष

उत्सव-प्रियता' हा मराठी माणसाचा ‘वीक-पॉईंट' आहे... हे जाणून, आजवर सार्वजनिक गणेशोत्सव महापूजा, दहिहंड्या, गरबा, दिवाळी-पहाट, महापुरुषांच्या जयंत्या-मयंत्या आदी फाजिल उत्सवप्रियतेची ‘अफूची मात्रा' त्याला निरंतर पाजली जात आहे... त्या अफूच्या घातक तंद्रीतून गदागदा हलवून, सर्वसामान्य मराठी-माणसाला जागं करणं... आणि, जीवन-मरणाच्या प्रश्नांकडे त्याचं लक्ष केंद्रित करणं, हे आमचं ‘धर्मकर्तव्य' आहे...!!

डाव्यांची पोथीनिष्ठता आणि रसहिनता टाळून...काळानुरुप जनहितकारी धोरण-लवचिकता बाळगत, 'निसर्ग-पर्यावरणविनाशी' व 'हृदयशून्य' भांडवलशाहीला मूळातून हादरा देऊ पहाणारा...'साम्यवाद, समाजवाद, समतावाद आणि गांधीवाद' यांना एकाचवेळी कवेत घेऊ पहाणारा"...'निसर्ग-पर्यावरणवादी' पक्ष..."धर्मराज्य पक्ष'...!!!

अधिक माहिती..

YouTube

धर्मराज्य पक्षाचे अधिकृत यूट्यूब चॅनल..

Wikipedia

राजन राजेंबद्दल माहिती देणारा विकिपीडिया पेज..

Blog

राजन राजेंचे विचार लिखित स्वरूपात मांडणारा ब्लॉग..

section-aea5863

ठळक घडामोडी..

section-26466ab
Quotes
error: Content is protected !!