Day: July 30, 2016

धर्मराज्य पक्षा’च्यावतीने रायगड जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप व विकास कामांचे उद्घाटन

‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने पोलादपूर (रायगड जिल्हा) तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या बोरघर गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नुकतेच पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन ‘धर्मराज्य पक्षा’चे महाड-पोलादपूर विधानसभा अध्यक्ष संभाजी पार्टे यांनी केले होते.
यावेळी बोरघर गावप्रमुख दगडूबुवा पार्टे, केंद्रप्रमुख श्री. कासारे सर, मुख्याध्यापक श्री. धहीवडे सर, ‘धर्मराज्य पक्षा’चे लोकमान्य नगर-४ (ठाणे) चे प्रभाग अध्यक्ष समीर गोलतकर तसेच पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोरघर ग्रामपंचायतीमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. दरम्यान गोवेले ग्रामपंचायतीचे सरपंच किसन मोरे यांच्या हस्ते गोवेले येथे पेव्हर ब्लॉकचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी ‘धर्मराज्य शेतकरी संघटने’चे महाड-पोलादपूर विधानसभा उपाध्यक्ष भगवान साळवी, ग्रामसेवक, समस्त ग्रामस्थ आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!