Day: December 18, 2024

“अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी ‘EVM’चा निषेध होणार बुलंद…२६ जानेवारी-२०२५ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद…!!!”

‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यातर्फे, समस्त भारतीय-नागरिकांच्यावतीने…रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ या ‘अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी’, रात्रौ ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ‘EVM’विरोधी आपला तीव्र निषेध व्यक्त करा…!!!”
————————————————————————————
भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून…
बुधवार, दि.१८/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, आनंद टाॅकीजजवळ, कोपरी, ठाणे (पू.) येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
—————————————————————————————-
…यापूर्वीही, “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)….
१) १० डिसेंबर (मंगळवार)-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत ठाणे रेल्वेस्थानक येथे
२) बुधवार, दि. ११/१२/२०२४ रोजी… वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे,
३) गुरुवार, दि.१२/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) व आज सोमवार दि. १६/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉपजवळ, ठाणे (प.) करण्यात आले.
४) सोमवार दि. १६/१२/२०२४ रोजी, संध्य ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत ठाण्यातील मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉप येथे, ‘ईव्हीएम’विरोधी जनजागृती आंदोलन करण्यात आले*
तसेच, *शुक्रवार, दि. २०/१२/२०२४ रोजी सं. ४ वाजल्यापासून ते ६ वाजेपर्यंत, जांभळी नाका (शिवाजी मैदानासमोर), ठाणे (प.) येथे *”EVM हवं की, BALLOT-PAPER”* यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ धर्मराज्य पक्षातर्फे करण्यात येणार आहे,* याची कृपया नोंद घ्या…धन्यवाद!
———————————————————————————————-
“अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी ‘EVM’चा निषेध होणार बुलंद…२६ जानेवारी-२०२५ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद…!!!”
error: Content is protected !!