दि. १९ जानेवारी-२०२५ (रविवार) रोजी धर्मराज्य पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी आपले सुपूत्र ऋग्वेद राजे, ठाण्याचे माजी खासदार सर्वश्री राजनजी विचारे यांच्यासमवेत आपल्या सहकाऱ्यांसह (महेश ठाकूर, समीर चव्हाण, राजेश गडकर) शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री बंगल्यावर भेट घेतली.
या भेटीदरम्यान प्रचलित ‘ईव्हीएम’वरील (EVM) अत्यंत संशयास्पद व शंकास्पद मतप्रक्रियेसंदर्भाने सखोल चर्चा झाली आणि ठाणे-जिल्हा प्रीपेड स्मार्ट मीटर (घरगुती इलेक्ट्रिक मीटर) विरोधी समितीला लवकरच भेटीसाठी बोलावण्याचं आश्वासन दिलं.
बैठकीत मा. उद्धवजींनी EVM मुद्द्यापलिकडे जाऊन मतदानासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांना स्पर्श केला व उपस्थित सर्वांना एकूणच मतप्रक्रियेबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं. राजन राजे यांनी सत्ताधारी भाजप-NDA आघाडी, ‘प्रजासत्ताका’चा अमृतमहोत्सव (वर्ष १९५० ते वर्ष-२०२५) साजरा करण्याबाबत पूर्णतया उदासीन असण्यामागे, त्यांचा ‘प्रजासत्ताक-संकल्पने’लाच (प्रजा म्हणजेच जनता, देशाची मालक असण्याच्या लोकशाही-तत्त्वाला) मुळातून विरोध असल्याचा मुद्दा ठासून मांडला…मुठभरांच्या हातात सत्ता केंद्रित करण्याची, वर्णवर्चस्ववादी-शोषक मानसिकता असणाऱ्यांचा भाजप हा पक्ष असल्यानेच, ते घडत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, EVM हॅक अथवा मॅनेज (प्रोग्रॅम्ड) होवोत वा न होवोत…आता, जनतेला पूर्वीचीच कागदी-मतपत्रिकेवरील पारदर्शक-मतदानप्रक्रिया हवी असल्याचं, राजन राजे यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केलं व त्यासंदर्भात ‘धर्मराज्य पक्ष’ मोहिम राबवत असल्याचं व प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवदिनी म्हणजेच, २६ जानेवारी-२०२५ रोजी रात्रौ ठीक ९.०० वा. फक्त ५ मिनिटे ‘ईव्हीएम’चा निषेध म्हणून सर्व घरातील लाईट्स बंद ठेवण्याचं आवाहन केलं जात असल्याचंही…मा. उद्धवजींच्या कानावर घातलं.
याचसंदर्भात, दि. २८ जानेवारी रोजी (मंगळवार) सायंकाळी ६.०० वा. ठाणे (प.), जांभळी नाका येथील ‘शिवाजी मैदाना’त राहुल चिमणभाई मेहता यांनी बनवलेल्या ईव्हीएम-मशीनद्वारे अमित उपाध्याय, मेघराज जोशी यांचा चमू (Team), ‘ईव्हीएम’ (EVM) कसं ‘मॅनेज’ केलं जाऊ शकतं (भले हॅक होऊ शकत नसलं तरी)…याचं प्रात्यक्षिक आयोजित केल्याची माहितीही शिवसेना पक्षप्रमुखांना दिली. त्यावर, मा. उद्धवजींनी त्यादिवशी मुंबईत असल्यास, सदर कार्यक्रमाला आवर्जून येण्याचं आश्वासन दिलं.
“EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)… माजिवडा गाव, बस स्टॉपजवळ, फातिमा चर्च समोर,ठाणे (प.)
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्यातर्फे, समस्त नागरिकांना विनम्र आवाहन…रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ या ‘अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी’, रात्रौ ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील तसेच, इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेऊन, ‘EVM’विरोधी आपला तीव्र निषेध व्यक्त करा…!!!”
——————————–
भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून…
आज, शनिवार, दिनांक १८/०१/२०२५ रोजी, फातिमा चर्च समोर, माजिवडा गाव, ठाणे (प.) येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
==================
…यापूर्वीही, “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)
१) १० डिसेंबर-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत ठाणे रेल्वेस्थानक येथे….
२) दि. ११/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे….
३) दि.१२/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे….
४) दि. १६/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत ठाण्यातील मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉप येथे….
५) दि.१८/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, आनंद टाॅकीजजवळ, कोपरी, ठाणे (पू.) येथे…
६) दि.२०/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ६ वा. पर्यंत, जांभळी नाका (शिवाजी मैदानासमोर), ठाणे (प.) येथे…
७) दि.२४/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, कळवा नाका, शाखेच्या बाजूला, कळवा, ठाणे येथे…
८) दि.०२/०१/२०२५ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, होंडा शोरुमजवळ, राजश्री सोसायटीसमोर, श्रीनगर, ठाणे (प.) येथे
९) दि.०४/०१/२०२५ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, स्वामी समर्थ चौक, हाजुरी (राजतारा सोसायटीसमोर), वागळे, ठाणे (प.) येथे …
१०) गुरुवार, दि. १६ जानेवारी-२०२५ रोजी, सायंकाळी ४:०० वा. पासून ते रात्रौ ८:०० वा. पर्यंत, पंचगंगा सोसायटी, राबोडी क्र. २, ठाणे (प.) येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
————‐-‐—-‐———–
तसेच, येणाऱ्या दिवसांत ठाण्यातील अन्य ठिकाणीसुद्धा “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आयोजित करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्या…धन्यवाद!
——————————–
“अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी ‘EVM’चा निषेध होणार बुलंद…२६ जानेवारी-२०२५ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद…!!!”
“EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)….पंचगंगा सोसायटी, राबोडी क्र. २, ठाणे (प.)
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्यातर्फे, समस्त नागरिकांना विनम्र आवाहन…रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ या ‘अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी’, रात्रौ ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील तसेच, इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेऊन, ‘EVM’विरोधी आपला तीव्र निषेध व्यक्त करा…!!!”
—————————————————————————————————————————–
गुरुवार, दि. १६ जानेवारी-२०२५ रोजी, सायंकाळी ४:०० वा. पासून ते रात्रौ ८:०० वा. पर्यंत, पंचगंगा सोसायटी, राबोडी क्र. २, ठाणे (प.) येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
—————————————————————————————————————————–
१) १० डिसेंबर-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत ठाणे रेल्वेस्थानक येथे….
२) दि. ११/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे….
३) दि.१२/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे….
४) दि. १६/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत ठाण्यातील मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉप येथे….
५) दि.१८/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, आनंद टाॅकीजजवळ, कोपरी, ठाणे (पू.) येथे…
६) दि.२०/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ६ वा. पर्यंत, जांभळी नाका (शिवाजी मैदानासमोर), ठाणे (प.) येथे…
७) दि.२४/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, कळवा नाका, शाखेच्या बाजूला, कळवा, ठाणे येथे…
८) दि.०२/०१/२०२५ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, होंडा शोरुमजवळ, राजश्री सोसायटीसमोर, श्रीनगर, ठाणे (प.) येथे
९) दि.०४/०१/२०२५ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, स्वामी समर्थ चौक, हाजुरी (राजतारा सोसायटीसमोर), वागळे, ठाणे (प.) येथे ‘जनमत-चाचणी‘ घेण्यात आली.
—————————————————————————————————————————–
तसेच, शनिवार, दिनांक १८/०१/२०२५ रोजी, फातिमा चर्च समोर, माजिवडा गाव, ठाणे (प.) येथे “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आयोजित करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्या…धन्यवाद!
—————————————————————————————————————————–
“अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी ‘EVM’चा निषेध होणार बुलंद…२६ जानेवारी-२०२५ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद…!!!”
स्मार्ट मीटरसारखी अनेक धोरणं ही, सरकारपुरस्कृत रक्तपिपासू शोषक-व्यवस्था होय! ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचा राज्य शासनावर जोरदार घणाघात…
“प्रीपेड-स्मार्ट मीटर, हे जनतेला अधिकचा आर्थिक भुर्दंड देणारं व पाणीपुरवठ्यासारखी वीजपुरवठा ही जीवनावश्यक सेवा, बेफाम नफा कमावण्यासाठी खाजगीकरणाद्वारे अदानीसारख्या सत्ताधाऱ्यांचा बगलबच्चा असलेल्या बदनाम भांडवलदाराला मोकाट सोडण्याचं; तसेच, मोठ्याप्रमाणावर कामगार-कपात करत बेरोजगारी वाढवण्याचं समाजघातकी भांडवली-धोरणं होय!”
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचा राज्य शासनावर जोरदार घणाघात…
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गत सरकारच्या काळात उर्जामंत्री असताना, त्यांनी तत्कालीन पावसाळी अधिवेशनात, (दि. ३ जुलै-२०२४ रोजी) महाराष्ट्रीय जनतेला आश्वासन देताना, “सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावण्यात येणार नाही” अशी घोषणा केली होती. मात्र, विधानसभेत दिलेल्या आपल्याच आश्वासनाला हरताळ फासत, ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची अदानी-कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला नादुरुस्त मीटर व नवीन वीज जोडणीकरीता, प्रीपेड-स्मार्ट मीटर बसविण्यास अदानी कंपनीने बेलाशक सुरुवात केलेली आहे. सर्वसामान्य जनतेची ही घोर फसवणूक अदानीचं उखळ पांढरं करण्यासाठी सरकारने सुरु केलेली असून, या विरोधात ठाणे शहरातील विरोधी राजकीय पक्ष, समविचारी संस्था व डाव्या कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ठाणे जिल्हा स्मार्ट प्रीपेड वीज मीटरविरोधी समिती’ची स्थापन करण्यात आलेली आहे.
याच अनुषंगाने, लाखो वीज ग्राहकांवर लादण्यात येणाऱ्या, स्मार्ट प्रीपेड मीटरच्या अरिष्टाबाबत, जनजागृती करण्याच्या उद्देशाने, दि. ७ जानेवारी-२०२५ रोजी, महावितरण कंपनीच्या वागळे इस्टेट, ठाणे येथील प्रशासकीय कार्यालयात एका द्वारसभेचं आयोजन करण्यात आले होते.
या सभेला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महावितरणच्या कामगारांना संबोधित करताना राजन राजे म्हणाले की, “प्रीपेड-स्मार्ट मीटरच्या माध्यमातून रक्तपिपासू-निर्दय-शोषक व्यवस्थेकरवी (Vampire State System) पहिली कुऱ्हाड ही, तरुण कंत्राटी-कामगारांवर पडणार आहे आणि त्यानंतर ती कुऱ्हाड, मनमानी चढ्या बिलांच्या रुपाने व रिचार्ज संपताच ‘बत्ती गूल’ होण्याच्या ‘दहशती’ने वीज-ग्राहकांवर पडणार आहे. गेली ३० ते ४० वर्षे महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात याच कंत्राटी-कामगार पद्धतीविरोधात मी धर्मयुद्ध पुकारलंय…एकीकडे सरकारी आर्थिक-धोरणं, काॅर्पोरेटीय व्यवस्थापकीय व उत्पादन-पद्धती, संदेशांची देवाणघेवाण-माहिती तंत्रज्ञान आणि संगणकीकरणासह, इतरही सगळीच क्षेत्र स्मार्ट बनलीयत… पण, आमचे पगार स्मार्ट कधी होणार? स्मार्ट मीटर लावण्याआधी आमच्या पगाराला देखील एक ‘स्मार्ट मीटर’ बसवा…देशाची आर्थिक प्रगतीसोबत महागाई, सेवाज्येष्ठता वाढताच ‘समृद्धी सर्वांची (Common-Prosperity)’ या तत्त्वानुसार ते आपसूकच भरघोस वाढले पाहिजेत…नाहीतर, आवक (पगार) वाढत नाहीत आणि वीज-बिलासारखी जावक वाढतच राहिली; तर संपूर्ण जनतेलाच ‘लाडक्या बहिणीं’सारखं दिड-दोन हजारी ‘गुलाम’ व्हावं लागेल!”, असा जोरदार घणाघात आपल्या तडाखेबंद भाषणात केला.
“मोदी-शहा आणि अदानी-अंबानी नव्हे; तर, आम्ही या देशाचे मालक आहोत…यांनी *स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला; पण, ते प्रजासत्ताकाचा अमृतमहोत्सव साजरा करायला उत्सुक नाहीत; कारण, प्रजा हीच या देशाची मालक, ही घटनादत्त संकल्पनाच यांना मान्य नाही…त्यांना मुठभरांची हुकूमशाही EVMची हेराफेरी करत निवडणुका जिंकून लादायचीय…तेव्हा, सावध होऊन काळाच्या हाका ऐका आणि सर्वसामान्य
जनता व कामगार यांनी एकत्र येऊन या ‘रक्तपिपासू-निर्दय-शोषक (Vampire-State System)’ भांडवली-व्यवस्थेविरुद्ध लढलं पाहिजे, ही काळाची गरज आहे”, अशा आवाहनासोबतच, “तरुणपण संघर्षात गुंतवलं नाही; तर, म्हातारपणी तुम्हाला लाचारीचा सामना करावा लागेल” असा गंभीर इशारा दिला. सरतेशेवटी, राजन राजे यांनी, “EVM सुरु राहिले तर, तुम्ही-आम्ही संपलो, या देशातली लोकशाही संपली, असं खुशाल समजा…कारण, सत्ताधाऱ्यांना तुमच्या जनमताची गरज EVM मुळे फारशी उरलेली नाहीये”. म्हणूनच, २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, रात्रौ ठीक ९.०० वाजता, फक्त ५ मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातील, कार्यालयांतील लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’चा निषेध नोंदविण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
“EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)….हाजुरी (राजतारा सोसायटीसमोर), वागळे, ठाणे (प.)



“EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)…._होंडा शोरुमजवळ, राजश्री सोसायटीसमोर, श्रीनगर, ठाणे (प.)

