मुंब्रा येथे रेल्वे अपघातात बळी पडलेल्या, प्रवाशांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने बुधवार, दि. ११ जून-२०२५ रोजी, ठाणे रेल्वे स्थानकपरिसरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी फलकांच्या माध्यमातून, रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि उदासीन भूमिकेविरोधात, निषेधाच्या घोषणा व्यक्त करीत, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे नेतृत्व, पक्षाचे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित यांनी केले होते. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष श्री. महेशसिंग ठाकूर, श्री. सचिन शेट्टी, ‘धर्मराज्य रिक्षा संघटने’चे श्री. रमेश रेड्डी, श्री. सुशीलकुमार चंद्रा आदी पदाधिकाऱ्यांसह, श्री. संजय दळवी, श्री. सोपान चौधरी, श्री. अमित लिबे, श्री. निलेश सावंत, श्री. अनिल डांगळ, श्री. सुनील जाधव, श्री. संतोष मोरे, श्री. सुनील डांगळ इत्यादी कार्यकर्ते आणि कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

मा. खासदार व शिवसेना नेते राजनजी विचारे यांची कनिष्ठ कन्या धनश्री, हिच्या ‘ताज द् ट्रीज बॅन्क्वेट’मधील दि. ९ मे रोजीच्या वाङनिश्चय (साखरपुडा) सभारंभप्रसंगी गप्पा-हास्यविनोदात रंगलेल्या राजकीय नेत्यांची क्षणचित्रे
भविष्यात ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी, “ईव्हीएम हटाव… देश बचाव… बॅलेट-पेपर लाव” या घोषणेखाली, मतपत्रिकेद्वारे निवडणुकांसाठीची लोकचळवळ सुरु करण्यात आली असून, दि. १४ डिसेंबर-२०२४ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे, एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निवृत्त न्यायमूर्ती मा. बी.जी. कोळसे-पाटील, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, डाव्या चळवळीतील नेते मा. फिरोज मिठीबोरवाला, आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. धनंजय शिंदे, मा. मेहमूद प्राचा, प्रा. अमित उपाध्याय आणि विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या मरकडवाडी गावचे सरपंच मा. रणजित मरकड आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सर्व समविचारी पक्ष आणि सामाजिक संस्था/संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी, ‘ईव्हीएम’विरोधी लोकचळवळ, यापुढे आक्रमकपणे सुरु ठेवत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका पार पाडण्यासाठी, मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. या बैठकीचे आयोजन अमीन सोलकर, शरद कदम, संतोष आंबेकर, एम.ए. खालिद यांनी केले होते. दरम्यान, मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, ‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून, दि. २६ जानेवारी-२०२५ रोजी, रात्रौ ठीक ९ वाजता, फक्त ५ मिनिटांसाठी आपल्या घरातील, कार्यालयातील व जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणचे, लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध नोंदविण्याचे विनम्र आवाहन मा. राजन राजे यांनी उपस्थित मान्यवरांना केले.


‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मु. काजिर्डे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १/२, अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना पाटी-पेन्सिल आणि इतर शैक्षणिक साहित्याचे नुकताच वाटप करण्यात आले. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’च्या सरपंच सौ. अंजलीताई आमकर, सदस्या मिनाक्षी पांचाळ, ग्रामसेवक संजय दळवी, संतोष काजारे, नरेंद्र शिंदे, अमित आमकर आदी मान्यवरांसोबत गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक आणि राजकीय बदल घडवायचा असेल तर, आपल्या समाजातील चांगल्या लोकांनी पुढे येऊन सत्ता ताब्यात घेतल्यास बदल शक्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन `धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी कामोठे येथील जाहीर सभेत बोलतांना केले. कामोठे येथील `धर्मराज्य पक्ष’प्रणित `स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटने’ने आयोजित केलेल्या या जाहीर सभेत पनवेल आणि परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. जुई-कामोठे-नौपाडा या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन बुधवार, दि. १५ जून रोजी कराडी समाज हॉल, कामोठे येथे ही सभा आयोजित केली होती.
यादरम्यान, पनवेल आणि कामोठे शहरांमध्ये येणारा नैना प्रकल्प, कामोठे ग्रामपंचायतीचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव, प्रस्तावित महानगरपालिकेत समाविष्ट होणारा गावठाण विस्तार तसेच प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरित राहिलेल्या मागण्या इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पनवेल शहर अध्यक्ष म्हणून गोपिनाथ भगत, उपाध्यक्ष संतोष गोवारी, सचिव भाऊ म्हात्रे, पनवेल तालुका युवक अध्यक्ष सुमित गोवारी, उपाध्यक्ष सागर म्हात्रे, सचिव सचिन गोवारी, कामोठे शहर अध्यक्ष रत्नाकर गोवारी, उपाध्यक्ष रमाकांत गोवारी, सचिव परशुराम अंबाजी म्हात्रे, कामोठे गाव अध्यक्ष गणेश नाईक, उपाध्यक्ष राजू म्हात्रे, सचिव महेंद्र म्हात्रे, जुई गाव अध्यक्ष चंद्रकांत चिमणे, उपाध्यक्ष अमृत कडू, सचिव स्वामी म्हात्रे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.