Category: आंदोलन

“EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)….जांभळी नाका-ठाणे

‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यातर्फे, समस्त भारतीय-नागरिकांच्यावतीने…रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ या ‘अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी’, रात्रौ ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ‘EVM’विरोधी आपला तीव्र निषेध व्यक्त करा…!!!”
————————————————————————————–
भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी *ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून…
आज, शुक्रवार, दि.२०/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ६ वा.पर्यंत, जांभळी नाका (शिवाजी मैदानासमोर), ठाणे (प.) येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
————————————————————————————–
…यापूर्वीही, “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)….
१) १० डिसेंबर (मंगळवार)-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत ठाणे रेल्वेस्थानक येथे….
२) बुधवार, दि. ११/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे….
३) गुरुवार, दि.१२/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे….
४) सोमवार, दि. १६/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत ठाण्यातील मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉप येथे….
५) बुधवार, दि.१८/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, आनंद टाॅकीजजवळ, कोपरी, ठाणे (पू.) येथे, ‘ईव्हीएम’विरोधी जनजागृती आंदोलन करण्यात आले.
तसेच, ठाण्यातील विविध ठिकाणी “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्या…धन्यवाद!
————————————————————————————–
“अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी ‘EVM’चा निषेध होणार बुलंद…२६ जानेवारी-२०२५ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद…!!!”
————————————————————————————

“अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी ‘EVM’चा निषेध होणार बुलंद…२६ जानेवारी-२०२५ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद…!!!”

‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यातर्फे, समस्त भारतीय-नागरिकांच्यावतीने…रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ या ‘अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी’, रात्रौ ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ‘EVM’विरोधी आपला तीव्र निषेध व्यक्त करा…!!!”
————————————————————————————
भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून…
बुधवार, दि.१८/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, आनंद टाॅकीजजवळ, कोपरी, ठाणे (पू.) येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
—————————————————————————————-
…यापूर्वीही, “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)….
१) १० डिसेंबर (मंगळवार)-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत ठाणे रेल्वेस्थानक येथे
२) बुधवार, दि. ११/१२/२०२४ रोजी… वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे,
३) गुरुवार, दि.१२/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) व आज सोमवार दि. १६/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉपजवळ, ठाणे (प.) करण्यात आले.
४) सोमवार दि. १६/१२/२०२४ रोजी, संध्य ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत ठाण्यातील मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉप येथे, ‘ईव्हीएम’विरोधी जनजागृती आंदोलन करण्यात आले*
तसेच, *शुक्रवार, दि. २०/१२/२०२४ रोजी सं. ४ वाजल्यापासून ते ६ वाजेपर्यंत, जांभळी नाका (शिवाजी मैदानासमोर), ठाणे (प.) येथे *”EVM हवं की, BALLOT-PAPER”* यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ धर्मराज्य पक्षातर्फे करण्यात येणार आहे,* याची कृपया नोंद घ्या…धन्यवाद!
———————————————————————————————-
“अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी ‘EVM’चा निषेध होणार बुलंद…२६ जानेवारी-२०२५ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद…!!!”

‘EVM’विरोधी आंदोलन_मनोरमा नगर-ठाणे

‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यातर्फे, समस्त भारतीय-नागरिकांच्यावतीने…रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ या ‘अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी’, रात्रौ ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ‘EVM’विरोधी आपला तीव्र निषेध व्यक्त करा…!!!”
—————————————
भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी *ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून…
सोमवार दि. १६/१२/२०२४ रोजी, संध्य ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत ठाण्यातील मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉप येथे, ‘ईव्हीएम’विरोधी जनजागृती आंदोलन करण्यात आले.
यापूर्वीही, “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)….
१) १० डिसेंबर (मंगळवार)-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत ठाणे रेल्वेस्थानक येथे
२) बुधवार, दि. ११/१२/२०२४ रोजी… वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे,
३) गुरुवार, दि.१२/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) व आज सोमवार दि. १६/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉपजवळ, ठाणे (प.) घेण्यात आले.
तसेच, बुधवार, दि.१८/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, आनंद टाॅकीजजवळ, कोपरी, ठाणे (पू.) येथे मही जनमत-चाचणी घेण्यात येणार आहे.
यादरम्यान, २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधून ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून…‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहनदेखील ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने करण्यात आहे.

रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ रोजी, भारताच्या अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी, रात्री ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ‘EVM’चा प्रतिकात्मक; पण, तीव्र निषेध व्यक्त करण्याचे विनम्र आवाहन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यावतीने करण्यात आले आहे…!!!”

रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ रोजी, भारताच्या अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी, रात्री ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ‘EVM’चा प्रतिकात्मक; पण, तीव्र निषेध व्यक्त करण्याचे विनम्र आवाहन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यावतीने करण्यात आले आहे…!!!”
भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, दि. १० डिसेंबर-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून बुधवार, दि. ११/१२/२०२४ रोजी…”EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी, कागदी-मतपत्रिकेद्वारे वर्तकनगर भागातील जनतेचं ‘सार्वमत’ संध्याकाळी ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत, वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे घेण्यात आले.
तसेच, गुरुवार, दि.१२/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे मही जनमत-चाचणी घेण्यात येणार आहे.
यादरम्यान, २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधून ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून…‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहनदेखील ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने करण्यात आहे.
दि. ११ डिसेंबर-२०२४ रोजी, ठाण्यातील वर्तकनगर नाका येथे, पक्षाध्यक्ष मा. राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत, ‘ईव्हीएम’विरोधी जनजागृती आंदोलन घेण्यात आले… यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित, पक्षप्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष तसेच, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर यांच्यासह, ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते आणि कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

मतपत्रिकेद्वारे निवडणुकीसाठी ‘धर्मराज्य पक्ष’ आक्रमक…

, , , ,

१९४७ पूर्वी आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो, आता मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला वाचवायचे असेल तर, मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही. त्यानंतर, भाजपाला अगदी दोन तृतीयांश जरी मतं मिळाली तरी, आमची हरकत नाही; मात्र, अशी बनावटगिरी आणि भोंदुगिरी आम्ही यापुढे खपवून घेणार नाही. आमच्या जनमताचा अनादर चालवून न घेण्यासाठीच ‘धर्मराज्य पक्षा’ने नो “बॅलेट पेपर… नो इलेक्शन” या घोषणेखाली, स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरु केली असल्याचे उद्गार पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना काढले. आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली असून, ठाणे शहराच्या विविध भागात राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान पत्रकार परिषदेनंतर, लगेचच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घेण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी आपले मत नोंदवले. या जनजागृती मोहिमेअंतर्गत, पक्षाच्या वतीने मतपेटी तयार करण्यात आली असून, त्यात नागरिकांकडून आपले मत कोणाला… ईव्हीए की, मतपत्रिकेला? यासाठी प्रतीकात्मक मतदान घेण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात, भाजपा-महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. जर, त्यांचा विजय इतकाच “न भूतो” व ऐतिहासिक होता; तर, त्यांच्या तथाकथित कार्यकर्त्यांखेरीज, रस्तोरस्ती सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त आनंदोत्सव का दिसला नाही? असा परखड सवाल उपस्थित करुन, ही तर सर्वसामान्य जनतेच्या मतांची थेट चोरी असून, आपली फसवणूक होतेय आणि हीच फसवणूक भविष्यात पुन्हा होऊ द्यायची नसेल तर, दिलीश्वरांना आणि गुजराथी लॉबीला धडका देण्यासाठी ईव्हीएम मशीन अरबी समुद्रात फेकून देण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा जोरदार घणाघात राजन राजे यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यावेळी पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, यासंदर्भात आम्ही विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांना भेटून, ही संकल्पना त्यांच्या गळी उतरवणार आहोत. ज्यांना पटेल ते आमच्यासोबत येतील, न पेक्षा आम्ही “एकला चालो रे” याप्रमाणे, भारतीय स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने जपणूक करण्यासाठी अधिक आक्रमकपणे ‘ईव्हीएम’ला प्राणपणाने विरोध करु. “नो बॅलेट पेपर… नो इलेक्शन” ही आमची घोषणा असून, मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, येत्या २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, रात्री ठीक ९ वाजता, फक्त पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहनदेखील राजन राजे यांनी यावेळी केले. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय, देशातील नागरिकांची अत्यंत लाजिरवाणी व क्रूर चेष्टा करतायेत. दिलेली मतं ‘ईव्हीएम’मध्ये दीडत नव्हती म्हणून, ‘व्हीव्हीपॅट’ आणलं; परंतु, मतं मोजली कुठली? तर, ‘ईव्हीएम’मध्ये न दिसणारी. मतपत्रिका मोजणे हे, एव्हरेस्ट शिखर चढण्याएवढे किंवा एखादा भलामोठा डोंगर खोदण्याएवढे अवघड काम आहे का? असा थेट प्रश्नदेखील राजन राजे यांनी यावेळी उपस्थित केला. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे, राज्यघटनेचे रक्षक असताना, ही न्यायपीठे मात्र, सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालची मांजरं झालीयेत, अशी जोरदार टीकादेखील ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी शेवटी पत्रकार परिषदेत केली.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निषेध आंदोलन

, , ,

बदलापूर येथील ‘आदर्श विद्यामंदिर’ या शाळेतील दोन चिमुरड्या बालिकांवर, शाळेचा सफाई कर्मचाऱ्याने नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर, बदलापूर शहरात मोठा जनक्षोभ उसळला होता. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासनाने शाळा प्रशासनाला पाठीशी घालण्याचा प्रकार समोर आल्यावर, या संपूर्ण घटनाक्रमात राजकीय हस्तक्षेप झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी चालढकल करुन, गुन्हेगारांना पाठीशी घातले गेले असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होत असल्याने, दोषींवर ताबडतोब कठोर-कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने गुरुवार दि. २२ ऑगस्ट-२०२४ रोजी, पक्षाध्यक्ष मा. राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली, सायंकाळी ४:०० वा.पासून ते सायंकाळी ५:०० वा.पर्यंत, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, शासकीय विश्रागृहाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या लोकशाहीविरोधी कृतीबाबत ‘धर्मराज्य पक्षा’ची ठाण्यात मूकनिदर्शने.

संसदेच्या सभागृहात राहुल गांधी, विरोधी पक्षनेत्याच्या अधिकाराने नीट पेपरफुटीप्रकरणी बोलत असताना, त्यांचा माईक बंद केला गेला. त्यावर लोकसभाध्यक्ष म्हणाले की, “माईक कोणी बंद केला हे मला माहित नाही” मग, सभागृह कोण चालवतंय? लोकसभाध्यक्ष, पंतप्रधान की, राष्ट्रपती? मुळात मुद्दा असा आहे की, ओमप्रकाश बिर्ला यांना, सगळं माहित आहे, पण ते खोटं बोलत आहेत. बिर्ला हे, राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. याच कोटामध्ये नीट आणि इंजिनियरिंगपासून ते आयएएस, आयपीएस तसेच, राष्ट्रीय पातळीवरील ज्या स्पर्धा परीक्षा होतात, त्याचे कोचिंग क्लास चालतात. यात करोडो रुपयांचं उत्पन्न असून, यातील पैसा राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाटला जातो. म्हणूनच आमच्या डोक्यात असा संशय आहे, हा एकप्रकारचा कट तर नाहीये ना? नीटच्या पेपरफुटीची पोलखोल होऊ नये, यासाठीच राहुल गांधींचा माईक बंद केला गेला. कालपरवा गुजराथमध्ये राकेश राठोड आणि दीक्षित पटेल या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आलीय. याधीही सगळेच घोटाळेबाज गुजराथमधूनच पळून गेलेत आणि तेदेखील बहुतांश ‘मोदी’ आडनाव असलेले, त्यामुळे नीट पेपरफुटीमागे गुजराथ कनेक्शन असणारच, असा थेट घणाघाती आरोप ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, बुधवारी संध्याकाळी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. नव्याने स्थापन झालेल्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या, संसदेच्या सभागृहात सुरु आहे. विद्यमान संसदेचे हे पहिलेच अधिवेशन आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. २८ जून-२०२४ रोजी, संसदेचे कामकाज सुरु असताना, विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नीट परीक्षेसंदर्भातील पेपरफुटीच्या विषयावर बोलत असताना, अचानक त्यांच्यासमोरील माईक बंद झाला. त्यावेळी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी, “माझा माईक सुरु करा” अशी विनंती लोकसभाध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना केली असता, “मी माईक बंद केलेला नाही, त्याचे बटन माझ्याकडे नाही” असे सांगत, त्यांची विनंती धुडकावली. मुळात, पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली तर, सरकार व विरोधकांकडून एकत्रितपणे योग्य तो संदेश पोहोचेल, असा सकारात्मक आशावाद विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोलून दाखवलेला असतानाही, त्यांचा माईक बंद केल्याच्या लोकशाहीविरोधी कृत्याच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने बुधवार, दि. ३ जुलै-२०२४ रोजी, ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर मूकनिदर्शने करण्यात आली. यावेळी पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्यासह, ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राजन राजे पुढे म्हणाले की, “सध्या देशात जे काही सुरु आहे, ते याआधी कधीही घडलेलं नाहीये. ७० वर्षे कॉंग्रेसचे सरकार होते, त्यांच्याही काळात घोटाळे झाले असतील, पण असा घोटाळा कधीच घडलेला नाही. बिहार, तेलंगणा, आसाम या राज्यांत भाजपची राजवट असताना, असेच घोटाळे झालेले आहेत. भारतातील लाखो तरुण, अशा स्पर्धा परीक्षांमधून आपलं आयुष्य पणाला लावत असतात. एकवेळ नव्हे; तर, दोन-दोन तीन-तीनवेळादेखील ही परीक्षा द्यावी लागते. नीटचे पेपर लिक करण्यासाठी, प्रत्येक परीक्षार्थीकडून १०/१० लाख घेतले गेलेले आहेत. ओमप्रकाश बिर्ला यांच्या कोटा मतदारसंघात तर, हजारो कोटी रुपयांचा शैक्षणिक घोटाळा झालेला आहे. यावर मोदी-शहा काहीही बोलत नाहीत, त्यांना फक्त राहुल गांधींचा माईक बंद करण्यातच पुरुषार्थ वाटतोय. भारतातील तरुण आज वैफल्यग्रस्त झालाय आणि हेच भारताची लोकशाही धोक्यात असल्याचे द्योतक होय!” अशा शब्दांत राजन राजे यांनी आपल्या भावना परखडपणे मांडल्या. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “प्रत्येक लोकसभा सदस्य हा, गौरवशाली लोकशाहीतील जनसेवक असून, इतर मार्ग अस्तित्वात असताना माईक बंद राहणे किंवा करणे व त्याबाबतीत सभापतींनी विशेष दखल घेऊन, सदर असंसदीय प्रकारास उत्तेजन न देता, ते तात्काळ बंद करणे हे लोकशाहीस अपेक्षित असताना, सभापतीपदाची अवनती केल्याचे, यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. या माईक बंद कृतीची चौकशी न करणे म्हणजे, पुढील अगदी कोणतेही सरकार त्याचा गैरफायदा घेईल व खऱ्याखुऱ्या जनतेच्या आवाजावर; म्हणजे, लोकशाहीवर बंधने आणणे हेच होय. संसदेचे अधिवेशन चालू असताना आणि थेट प्रक्षेपणाद्वारे ते, लाखो नागरिक पाहत असताना, माईक बंद करणे व त्यावर सभापतींनी दिलेले उत्तर हे, गौरवशाली भारतीय लोकशाहीची प्रतारणा करणारे आहे. सभापती आपल्या कायदेशीर कर्तव्यात कसूर करीत असून, भविष्यात भारतीय लोकशाही आम्हांस धोकादायक दिसत असल्याचे देशपांडे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. सभापतीपदाचे पावित्र्य राखण्यासाठी, सभापतींना योग्य ती समज देऊन, गौरवशाली असणारी आपली लोकशाही वैभवशाली करावी… आणि म्हणूनच, भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्ष’ लोकशाहीमार्गाने आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे, नितीन देशपांडे यांनी शेवटी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आंदोलनांची पुण्याई संपल्यामुळेच, भांडवलदारी व्यवस्था फोफावली! – राजन राजे

, , , , ,

‘‘या महाराष्ट्रात कंत्राटी-कामगारपद्धतीविरुद्ध, मी गेली २५/३० वर्षे लढतोय. ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ ही गुलामगिरी तर आहेच, पण ती एकप्रकारची नव-अस्पृश्यतादेखील आहे. अस्पृश्यता म्हणजे, एका विशिष्ट समाज-घटकाने समाजाच्या दुसर्‍या मोठ्या हिश्श्याला विकासाच्या परिघाबाहेर ढकलून देत, त्याला जगण्याचा सन्मान आणि त्याला विकासाचे मूलभूत फायदे नाकारणे… ‘कंत्राटी-कामगार पद्धत’, ही नव-अस्पृश्यता यासाठी की, या प्रकारच्या अस्पृश्यतेत जन्माची जात गुंतलेली नसली; तरी, जन्माचं पोट गुंतलेलं आहे आणि तो कंत्राटी-कामगार अर्धपोटी आहे, त्याला माणुसपणाचे हक्क कामाच्या ठिकाणी नाकारलेले आहेत! मी, गेली तीन दशकं एकहाती या व्यवस्थेविरोधात ‘धर्मयुद्ध’ पुकारुन संघर्ष करतोय. लोकचळवळीकडून, डाव्या चळवळीकडून याबाबतीत काही मोठ्या त्रुटी राहून गेल्या. डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्टांनी ‘नागरी आण्विक दायित्व कायदा-123’ (Civil Nuclear Liability Bill-123) साठी बंगाल-केरळ मधील आपले ४३ खासदार संसदेत पणाला लावले; पण, भारतातील सर्वात मोठी समस्या असलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात त्यांना अंशानेही तसं काही करावसं वाटलं नाही, हे देशाचं आणि एकूणच डाव्या चळवळीचं फार मोठं दुर्दैव आहे. एकांडी शिलेदारी करीत ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधात आम्ही बेंबीच्या देठापासून बोंबलून-बोंबलून थकलो, मोठमोठी आंदोलनं केली, संपासारखे टोकाचे संघर्ष केले, बड्या बड्या राजकीय नेत्यांना भेटलो, सर्वपक्षीय प्रमुखांच्याही भेटीगाठी घेतल्या…पण, आमच्या हाती ‘राजकीय ताकद’ नसल्याने कंत्राटीकरणाची विषवल्ली अधिकाधिक फोफावली. मी, ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना यासाठीच केली. कारण, चळवळीतील नेत्यांनी, कंत्राटी-पद्धतीचा विषय लावूनच धरला नाही. दुर्दैवाने, आंदोलनांची पुण्याई आता संपलेली आहे. तुम्ही आमरण उपोषणाला बसलात, चक्री-उपोषणाला बसलात; तरी, शंभर टक्के सांगतो, तुमचे प्रश्न सुटणार नाहीत; त्यासाठी, तुम्हाआम्हाला निवडणुका जिंकून विधिमंडळात, संसदेत धडक द्यावी लागेल. कष्टकऱ्यांच्या अपरिमित शोषणातून चाललेली ही संपूर्ण भांडवलदारी व्यवस्था, देशात साम्यवाद-समाजवाद आणूनच संपवावी लागेल…इतर कुठलाही राजकीय पर्याय नाही’’, अशा घणाघाती शब्दांत ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधात जोरदार शरसंधान साधले. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने, मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर-२०२३ रोजी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी राजन राजे बोलत होते. केंद्र सरकारने जाहीर केलेला भाताचा हमीभाव अत्यंत तुटपुंजा असल्याने, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरुन, भाताला प्रति क्विंटल किमान चार हजारांचा हमीभाव देऊन, तसा कायदा करण्यात यावा, भातखरेदी केंद्रे पूर्ववत सुरु करण्यात यावीत, शेतकऱ्यांना वीजपंपासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकरी-शेतमजूर व असंघटित बांधकाम कामगार आणि महिलांना, वयाच्या ६० वर्षांनंतर मासिक पाच हजारांची पेन्शन सुरु करण्यात यावी, सरकारी (जिल्हा परिषद) शाळांचे खासगीकरण थांबवून, कंत्राटी नोकरभरतीचा कायदा रद्द करण्यात यावा, आरोग्यसेवेचे खासगीकरण थांबवा आणि आरोग्यसेवेत आमूलाग्र सुधारणा करुन, सर्वसामान्य जनतेला मोफत सेवा देण्यात याव्यात, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी, महाराष्ट्र राज्य किसान सभा, ठाणे जिल्हा यांच्या वतीने, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने, मंत्रालयावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, त्याच पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही प्रखर निदर्शने करण्यात आली होती.

यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे पुढे म्हणाले की, ‘‘ज्याप्रमाणे उंदीर, सारखं काही ना काही कुरतडत असतो, तसेच या व्यवस्थेचे हात तुमच्या खिशाला, तुमच्या पैशाच्या पाकिटाला कुरतडत, ओरबाडत असतात… आणि, म्हणूनच या व्यवस्थेला मी ‘रक्तपिपासू शोषक-व्यवस्था’ म्हणतो. या व्यवस्थेचे जे सगळे बगलबच्चे आहेत, ते कसलेल्या ‘पाकिटमारा’सारखे आपल्या खिशात हात घालून असतात, आपल्याला ते कळत नाही. एकीकडे उड्डाणपूल होतायत, मॉलटॉल होतायत, विकासकामं होताना दिसतायत, पण आमच्या पगाराची पाकिटं कधी जाडजूड होताना दिसतात का?* आम्ही मात्र, अजूनही टेकड्यांवर आणि त्यांची प्रगती हिमालयाच्या उंचीएवढी. म्हणूनच, आमचं जीवन खाली-खाली घसरत चाललंय… ना आम्हाला आरोग्यसेवा परवडत, ना आम्हाला खासगी शिक्षण परवडत. शिक्षणसेवा आणि आरोग्यसेवा या खासगी असूच कशा शकतात?’’ असा प्रश्न उपस्थित करीत, राजे पुढे म्हणाले, *’’ज्याला आम्ही ‘कल्याणकारी राज्य’ म्हणावं, त्याचा अगदी उलट हा कारभार सुरु आहे. आरोग्य व शिक्षण या सकस, दर्जेदार सेवा सरकारतर्फेच पुरविल्या गेल्या पाहिजेत. जोपर्यंत, आपल्या देशात ‘कल्याणकारी राज्य’ संकल्पनेची धारणा व धोरणं होती, तोपर्यंत, मूलभूत सुविधा सर्वसामान्यांना समाधानकारक मिळत होत्या, पण आता भाजपा-नरेंद्र मोदी सरकारच्या बेलगाम खाजगीकरणाच्या, खरं म्हणजे ‘अदानी-अंबानीकरणा’च्या, गेल्या दहा वर्षांच्या लोकशाहीविरोधी कालखंडात सगळंच बदललंय. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले काय, फडणवीस झाले काय आणि पवार झाले काय, आपले मूलभूत प्रश्न कधिही सुटणे नाही… ही व्यवस्थाच आपल्याला मुळातून आमूलाग्र बदलायला हवी. तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही स्वतःच तपासून पाहा, अमेरिकेत-युरोपात आता, समाजवादी-साम्यवादी चळवळी जोर धरु लागल्यात. ज्याला आपण समाजवाद व साम्यवादाचा विचार म्हणतो, तो पुन्हा जोरकसपणे पुढे यायला लागलाय. आता फक्त आंदोलनापुरते सीमित न राहता, राजकीयदृष्ट्या सुशिक्षित होणे गरजेचे आहे. तुम्ही आम्ही एकाच चळवळीतील लोकं आहोत, आपण वेळीच जागे झालो नाही तर, राजकीयदृष्ट्या अज्ञानी माणसाला, या पुढारलेल्या आणि विज्ञानवादी जगात कुठलाही थारा मिळणार नाही !’’* अशा रोखठोक भाषेत, उपस्थित शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना राजन राजे यांनी, आवाहन केले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष कॉ. मधुकर पाटील यांनी केले. यावेळी किसान सभेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कॉ. आत्माराम विशे, सचिव कॉ. रमेश जाधव, कार्याध्यक्ष कॉ. विलास शेलार, कॉ. भास्कर पाटील, कॉ. जयराम चंदे, कॉ. प्रकाश काठोळे, भिवंडी तालुका अध्यक्ष कॉ. बाळाराम भोईर, शहापूर तालुका अध्यक्ष भगवान दळवी, मुरबाड तालुका अध्यक्ष कॉ. नारायण पाटोळे, कल्याण तालुका अध्यक्ष कॉ. आदम शेख आदी पदाधिकाऱ्यांसह, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, लोकसभा उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, सचिन शेट्टी, कामगार प्रतिनिधी समीर चव्हाण इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आरे कॉलनीमधील वृक्षतोडीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’ची तीव्र निदर्शने !

,

मुंबईचे ‘फुप्फुस’ अशी ओळख असलेल्या आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी सुमारे २७०० झाडांच्या कत्तलीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने शनिवार, दि. १४ सप्टेंबर-२०१९ रोजी येथील बिरसा मुंडा चौकात सनदशीरमार्गाने निदर्शने करण्यात आली. या वृक्षतोडीमुळे आरे कॉलनी परिसरातील जैवविविधता पूर्णतः नष्ट होण्याचा धोका असून, इथल्या जंगलात अधिवास असणारे बिबटे, रानमांजर आणि इतर पक्षी-प्राण्यांचे अस्तित्वच कायमस्वरूपी संपुष्टात येऊ शकते. शिवाय अतिपर्जन्यवृष्टीच्या काळात मिठी नदीच्या पुराचा धोकादेखील वाढू शकतो. यासंदर्भात विविध पर्यावरणवादी संस्था-संघटना, तसेच ‘आरे’मधील मूळ भूमिपुत्र असणाऱ्या आदिवासी बांधवांनी संघर्ष उभा केला होता. याच पार्श्वभूमीवर मुळातच भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी मान्यता असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’नेदेखील या मेट्रो प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या आदेशानुसार ही निदर्शने शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ वा.च्या दरम्यान करण्यात आली. “विनाशकारी विकासाच्या नावाने, बेभान झालेले आसुरी ‘विकास-विचारवंत’ हिरव्यागार जंगलाने वेढलेल्या आरे कॉलनीत ‘रखरखीत वाळवंट’ निर्माण करू पाहत असतील, तर ‘धर्मराज्य पक्ष’ स्वस्थ बसणार नाही !” असा थेट इशारा राजन राजे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्थापित धनदांडगे व भांडवलदारी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांना दिला आहे. “स्मार्टसिटीच्या नावाखाली होऊ घातलेला विनाशकारी विकास आणि काँक्रीटच्या निष्प्राण जंगलांऐवजी, आम्हाला हिरवंगार जिवंत जंगल, प्राणी-पक्षी व निसर्गाने नटलेली घनदाट वृक्षराजी हवी आहे, त्यासाठी प्रसंगी आम्ही आमच्या प्राणांचीही बाजी लावू !” अशा शब्दांत राजे यांनी आपल्या रोखठोक भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौकात पार पडलेल्या या निदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक रेश्मा पवार, नवी मुंबई महिला अध्यक्षा शीतल कोळी, बेलापूर विधानसभा महिला अध्यक्षा रेखा साळुंखे, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा पौर्णिमा सातपुते, प्रीती क्षीरसागर, मनीषा सांडभोर, जयश्री पारकर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष मिलिंद कुवळेकर, ऐरोली विधानसभा अध्यक्ष रत्नदीप कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसमवेत नरेंद्र पारकर, नितीन उगले, शरद साळुंखे, सुमित कदम, सुशांत पंडा, दत्तु पाटील, संतोष मोरे, किशोर गवळी, संकेत गाडे, हेमंत पाटणकर, सुनील सांडभोर, जगदीश जाधव, नरेंद्र शिंदे, उमेश यादव, उमेश मोरे, खंडेराव जाधव, प्रवीण तांबट, प्रकाश नलावडे, सचिन पडवळ, विरेंद्र मोरे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान, आरे कॉलनीतील छोटा काश्मीर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका नूतन पवार, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उप-निरीक्षक प्रमोद सावंत, गोपनीय शाखेचे व्ही.के. सिंग, पोलीस नाईक संजय शिंदे आणि मुंबईतील पर्यावरणवादी कार्यकर्ते वसंत पाटील या मान्यवरांनी या निदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बहुमूल्य सहकार्य केले.

ठामपातील बेसुमार वृक्षतोडीविरोधात `धर्मराज्य पक्षा’ ची निदर्शने

रस्तारूंदीकरण आणि शहरीकरणाच्या नावाखाली ठाणे महानगरपालिकेने सध्या शहरातील नौपाडा, वर्तकनगर आणि पोखरण रोडवरील डेरेदार वृक्ष निर्दयीपणे कापायला सुरूवात केली आहे. एकाअर्था, ठामपा पुरस्कृत निसर्ग आणि पर्यावरणाचा खून पाडण्याचं कार्य महापालिका प्रशासनानं हाती घेतलेलं असून, त्याचाच निषेध करण्यासाठी `धर्मराज्य पक्षा’च्यावतीने शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ `वसुंधरा दिना’च्या पार्श्वभूमीवर तीव्र निदर्शने करण्यात आली. ठाणे शहराला लाभलेला निसर्गाचा समृध्द वारसा यानिमित्ताने नष्ट होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप यावेळी `धर्मराज्य पक्षा’ने ठाणे महापालिका प्रशासनावर केला आहे.
दरम्यान, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहर विकासाच्या आणि रस्तारूंदीकरणाच्या आड येणारी अनधिकृत बांधकामे तोडण्यास धुमधडाक्यात सुरूवात केली आहे. आयुक्तांच्या या धडाडीचे ठाणेकर नागरिकांनी कौतुक केले असले; तरी, बेसुमार वृक्षतोडीमुळे नागरिक नाराज झालेले आहेत. नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी विभागात सध्या प्रस्तावित उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून, त्यासाठी संपूर्ण महात्मा गांधी रस्त्यावरील झाडांच्या कत्तली झाल्या आहेत. मुळात याठिकाणी उड्डाणपूलाची आवश्यकता नसतांना तो उभारण्याचा घाट कुणाला खूष करण्यासाठी घातला जातोय? असा सवालदेखील `धर्मराज्य पक्षा’ने यावेळी उपस्थित केला आहे. याप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, धर्मराज्य महिला संघटनेच्या समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा अध्यक्षा जयश्री पंडित, नवी मुंबई शहर उपाध्यक्षा रेखा साळूंखे, दर्शना पाटील, गिता पाटील, उज्ज्वला जाधव, पोर्णिमा सातपुते, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, सहसचिव दिनेश चिकणे, प्रभाग क्र. ४७ चे प्रभाग अध्यक्ष समीर कालगुडे, प्रभाग क्र. 24 चे प्रभाग अध्यक्ष राजू शिंदे, डोंबिवली शहर अध्यक्ष जगदीश जाधव, ठाणे शहर माहिती अधिकार कक्ष प्रमुख अनिल महाडिक, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्ष प्रा. भरत जाधव, प्रकाश पवार, दिपक देशपांडे, युवा कार्यकर्ता संदीप सोनखेडे, अमित लिबे, मनोज बेर्डे, गंभीर आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!