Category: महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

धर्मराज्य पक्षाच्या ५२व्या भव्यदिव्य महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला ठाण्यात दिमाखदार सुरुवात

‘धर्मराज्य पक्ष’ आयोजित ५२वी भव्यदिव्य ‘महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा-२०१६’ या “न भूतो न भविष्यति” स्पर्धेचे सीकेपी हॉल, खारकर आळी, ठाणे (प) येथे शनिवार, दि. १३ ऑगस्ट रोजी दिमाखदार पद्धतीने उद्घाटन पार पडले. मंगळवार, दि. १६ ऑगस्टपर्यंत संपन्न होणा-या या कॅरम स्पर्धेत ठाणे-मुंबईसहित पुणे, नाशिक आणि कोल्हापूरयेथील नामवंत खेळाडूंनी भाग घेतला असल्याने, हि स्पर्धा पहिल्याच दिवसापासून चुरशीची बनली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवछत्रपतींच्या प्रतिमेस ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे (Rajan Raje) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन, स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी राजन राजे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतानाच, आपल्या भाषणात पक्षाची राजकीय, पर्यावरणवादी आणि क्रीडाविषयक धोरणांबाबतची परखड मते मांडली.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने ‘धर्मराज्य पक्ष’ आयोजित या भव्यदिव्य स्पर्धेसाठी एकूण ५ लाखांहून अधिक रोख परितोषिकांची बक्षिसे देण्यात येणार असून, पुरुष एकेरीसाठी १ लाख, महिला एकेरीसाठी ३० हजार, पुरुष ज्येष्ठ खेळाडू १० हजार, महिला ज्येष्ठ खेळाडू ५ हजार, पुरुष संघ (प्रथम) ३० हजार तर महिला संघ (प्रथम) १५ हजार अशा रोख रकमेचे वाटप करण्यात येणार आहे.
याप्रसंगी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, चेअरमन जितेंद्र शहा, उपाध्यक्ष परशुराम पाटील, मंजूर खान, शांताराम गोसावी, सह-सचिव जनार्दन संगम, राजेश रोडे, संतोष चव्हाण, ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नील किरकिरे, सचिव रवींद्र मोडक, खजिनदार अविनाश टिळक आणि ऑल इंडिया कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीपकुमार हजारीखा आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी ज्येष्ठ कॅरम खेळाडू रमेश चित्ती यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्या हस्ते त्यांच्या योगदानाबद्दल एक लाखाचा धनादेश देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशन यांनादेखील राजन राजे यांनी प्रत्येकी एक लाखाचा धनादेश निधी म्हणून सुपूर्द केला. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सर्व पुरुष व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!