दिवस: ऑक्टोबर 19, 2026

‘लोकशाही वाचवा, मत वाचवा, देश वाचवा’ पदयात्रा व जनजागरण अभियानात राजन राजे यांचा सक्रिय सहभाग!

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ‘लोकशाही वाचवा, मत वाचवा, देश वाचवा’ या घोषवाक्यांतर्गत ब्लॉकस्तरीय पदयात्रा व जनजागरण अभियान कार्यक्रमास धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे यांनी प्रमुख म्हणून उपस्थित राहून आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
लोकशाही मूल्यांचे संवर्धन, मतदानाच्या अधिकाराविषयी जनजागृती आणि संविधानिक हक्कांचे रक्षण या उद्देशाने आयोजित या अभियानाच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट करण्याचा संदेश देण्यात आला. लोकशाहीचे रक्षण ही केवळ एका पक्षाची जबाबदारी नसून, प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे! लोकशाही, संविधान आणि जनतेच्या मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी सर्व लोकशाहीप्रेमी शक्तींनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे… असं सर्व वक्त्यांनी मोर्चाला संबोधित करताना ठामपणे नमूद केलं.
error: Content is protected !!