दिवस: नोव्हेंबर 14, 2026

पंडित नेहरू जयंतीनिमित्त ठाणे काँग्रेसच्या अभिवादन कार्यक्रमास राजन राजे यांची उपस्थिती!

नेहरू जयंतीनिमित्त ठाणे काँग्रेसच्या अभिवादन कार्यक्रमास धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांची उपस्थिती!
ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी आंबेघोसाळे तलाव, मीनाताई चौक, ठाणे (पश्चिम) येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे उपस्थित होते.
यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच ब्लॉक अध्यक्ष अजिंक्य भोईर यांच्या वतीने लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि आधुनिक भारताच्या उभारणीचा विचार जपण्याचा संकल्प, हीच पंडित नेहरूंना खरी आदरांजली!
error: Content is protected !!