दिवस: नोव्हेंबर 16, 2026

धर्मराज्य पक्षाचा १५वा वर्धापनदिन उत्साहात साजरा; ‘धर्मराज्य दिनदर्शिका-२०२७’चे प्रकाशन!

भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी ‘हरित पक्ष’ म्हणून सर्वमान्य ओळख असलेल्या आणि कामगार-कष्टकरी वर्गाचा बुलंद आवाज बनलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’चा १५वा वर्धापनदिन सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी, पक्षाच्या ठाणे येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या वर्धापनदिनाचे औचित्य साधून, नवीन वर्षाच्या ‘धर्मराज्य दिनदर्शिका-२०२७’ चे प्रकाशन पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते आदरणीय राजन राजे (भाई) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव महेशसिंग ठाकूर, धर्मराज्य पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष सचिन शेट्टी, ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे, महिला संघटक स्वप्नाली पवार, मनिषा सांडभोर, भावना ओरपे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते, कामगार संघटनेचे सदस्य तसेच विविध कामगार युनिटचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाच्या आजवरच्या संघर्षमय वाटचालीचा आणि पर्यावरण संरक्षणासह कामगार-कष्टकरी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याचा अभिमान जागवणारा हा वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पडला.
error: Content is protected !!