Tag: मोर्चा

लक्ष्मीनारायण यांच्या बदलीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चा निषेध मोर्चा आणि निदर्शने

, , ,

ठाण्याचे मावळते सह-पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या बदलीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’ने शुक्रवारी एका निशेध मोर्चाचे आयोजन केले होते. प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर अशी ओळख असलेले लक्ष्मीनारायण यांनी आपल्या कार्यकाळात ठाण्यातील समाजकंटकांवर व भ्रष्ट राजकारण्यांवर चांगलाच वचक ठेवला होता. सूरज परमार आत्महत्या प्रकरणाचा तपासदेखील त्यांच्याच देखरेखीखाली सुरू असल्याने, परमारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी नगरसेवकांचा पाय अधिकाधिक खोलात गेला होता. यामुळे लक्ष्मीनारायण हे सत्ताधारी आणि विरोधकांचा मुख्य अडसर ठरू पाहात होते. म्हणूनच राजकीय दबावापोटी बढतीच्या नावाखाली मुंबईतील पोलिस मुख्यालयात (अडगळीच्या ठिकाणी) अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) पदी बदली करून, महाराष्ट्र शासनाने एका कर्तबगार ‘अॅक्शनबाज’ अधिका-याला ‘अॅक्शनबाद’;”kick up & kick out” केल्याच्या निशेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’ने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक निशेध मोर्चा काढला होता.

दरम्यान, चंदनवाडीतील रायगड गल्ली येथून सुरू झालेला हा निशेध मोर्चा ठाणे महापालिकेवरून गोखले रोड मार्गे नौपाडा परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे षेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित होते. बांधकाम व्यवसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांना मानसिक त्रास देणा-या ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवकांची नावे नोंद केली होती. त्यानंतर ठामपातील चार नगरसेवकांना अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास लक्ष्मीनारायण यांच्याकडे असल्याने, ठाण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली होती. शेवटी राजकीय दबावाचा वापर झाल्याने महाराश्ट्र शासनाने बढतीच्या बहाण्याने ठाणेकर नागरिकांचे आधारस्तंभ ठरलेल्या व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची उचलबांगडी करीत मुंबईतील पोलिस मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक (प्रषासन) म्हणून बदली केली आणि परमार आत्महत्येप्रकरणाचा गतिमान झालेला तपास संथ करण्याचे महापाप केले.

व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे ठाणेकरांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत असतानाच ‘धर्मराज्य पक्षा’ने १२,१३,१४ जानेवारी या तीन दिवसात ठाण्याच्या विविध भागात स्वाक्षरी मोहिम राबवून लक्ष्मीनारायण यांच्या बदलीला विरोध दर्षविला. हजारो ठाणेकरांनीदेखील या बदलीचा निषेध करून स्वाक्षरी मोहीमेला उदंड प्रतिसाद दिला. या दरम्यान, ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांना पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन, लक्ष्मीनारायण यांच्या राजकीय हस्तक्षेपातून झालेल्या बदलीचा निशेध केला. ‘धर्मराज्य पक्षा’च्या मोर्चाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर ठाणे रेल्वे

स्थानक परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची बदली म्हणजे निव्वळ राजकीय हेतूने झालेली असून, ठाण्यातील सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूच्या राजकारण्यांची मिलीभगत असल्याचा थेट आरोप पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी प्रसिध्दीमाध्यमांषी बोलतांना केला. एका ‘अॅक्शनबाज’ अधिका-याल ‘अॅक्शनबाद’ करून भारतीय जनता पक्ष राश्ट्रवादी काॅंगे्रसला आपल्या दबावाखाली आणत असल्याचे विधान त्यांनी यावेळी बोलतांना केले. सज्जनतेचा आव आणून ‘‘लक्ष्मीनारायण’’ यांची बदली रद्द करण्यासाठी, स्वपक्षीय मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचे ‘नाटक’ करणा-या, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी या बदलीप्रकरणी, आमदारकीचा ‘राजीनामा’ देवून आपल्या प्रामाणिकतेचा प्रत्यय द्यावा… अन्यथा, ठाणेकरांना उल्लू बनवू पाहणारी आपली राजकीय-नौटंकी बंद करावी, असे आव्हान दिले.

टीव्ही 9 वर झालेल्या एका परिसंवादाचा उल्लेख करत, ‘‘राम कदम नावाचा एक राजकीय दलाल, यावेळी लक्ष्मीनारायण यांच्या बदलीचे समर्थन करीत होता’’. या अशाच प्रवृत्तीमुळे देशात, महाराश्ट्रात राजकारण बदनाम झालयं. आम्हाला फक्त पाच किंवा दहा चांगले राजकारणी दाखवा, आम्ही ‘धर्मराज्य पक्षा’चे राजकारण बंद करून टाकतो’’, असे रोखठोक विधान करून, आमचे आजचे आंदोलन हे व्यक्तिसापेक्ष नसून, नीतिभ्रष्ट प्रवृत्तीविरूध्द असल्याचे पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी आपल्या भाषणात स्पश्ट केले.

याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव राम कोंढाळकर, उपाध्यक्ष राजू सावंत, अण्णा साळुंखे, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सदस्य मधुकर पवार, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, सचिव विनोद मोरे, उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, सचिन शेट्टी, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, सचिव चंदू येरूणकर, सहसचिव विजय भोसले, दिनेश चिकणे, माहिती अधिकार ठाणे शहर कक्षप्रमुख अनिल महाडिक, धर्मराज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा जयश्री पंडित, सचिव साक्षी शिंदे, सहसचिव दर्शना पाटील, सदस्या वैशाली भवालकर, पौर्णिमा सातपुते, उज्वला जाधव, सोनम तारकर, मिनल मल्या, नवीमुंबई शहर अध्यक्षा शितल कोळी, उपाध्यक्षा रेखा साळुंखे, शिक्षक संघटनेचे सहसचिव प्रा. भरत जाधव, प्रभाग अध्यक्ष महेश क्षिरसागर, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, कामोठ्याचे सुमित गोवारी, सागर म्हात्रे, ऐरोली विधानसभा अध्यक्ष पांडूरंग गोरे, सचिव सिध्देश सावंत, युवा अध्यक्ष संतोष काजारे, भिवंडी लोकसभा अध्यक्ष भरत हलपतराव, मुरबाड विधानसभा अध्यक्ष नरेश रसाळ आदी मान्यवर तसेच, इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!