Day: October 2, 2026

राज्यघटनाविरोधी (असंविधानिक) व देशहित आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणाऱ्या निवडणूक-आयोगाच्या कारभाराविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चा एल्गार…मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची व त्यांना तुरुंगात धाडण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी!

राज्यघटनाविरोधी (असंविधानिक) व देशहित आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणाऱ्या निवडणूक-आयोगाच्या कारभाराविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चा एल्गार…मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची व त्यांना तुरुंगात धाडण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी!
ज्ञानेश कुमार व राजीवकुमार या आजीमाजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (CEC) कारभाराबाबत राज्यघटनाविरोधी व असंविधानिक स्वरुपाचे गंभीर आक्षेप असून, त्यामुळे देशहित तसेच लोकशाही मुल्यांना बाधा पोहोचत असल्याचा आरोप करत…त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी “धर्मराज्य पक्षा’तर्फे २ ऑक्टोबर-२०२६ (शुक्रवार) महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी ठाण्यातील जांभळी नाका, चिंतामणी-दुकानाजवळ शांततामय व सनदशीर निदर्शने करण्यात आली.
धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे बोलताना धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष यांनी “महाभारतात जशी ‘दुर्योधन, दुःशासन, कर्ण व शकुनी’ ही एक षडयंत्रकारी चांडाळ चौकडी होती; तशीच आज ‘नरेंद्र, अमित, ज्ञानेश आणि सीमा’ ही नवी लोकशाहीविरोधी षडयंत्र रचणारी ‘चौकडी’ अस्तित्वात आलीय! महाभारतात, कर्णाची (हल्लीचा ज्ञानेश कुमार) कवचकुंडलं काढून घेणारा इंद्र मौजूद होता…पण, आताचा नवा इंद्र म्हणजेच, ‘नरेंद्र’; त्या अधर्मी कर्णाला वर्ष-२०२३मध्ये पाशवी बहुमतावर कायदा करुन कवचकुंडलं बहाल करतोय; यालाच घोर कलियुग म्हणतात…या कलियुगात आपल्या मदतीला इंद्र येणं सोडाच…जिथे इंद्रच ‘खलनायक’ आहे; तिथे, आता आपल्यालाच ‘कृष्ण आणि अर्जुन’ बनून, या इंद्राला साथ देणाऱ्या, ‘चौकडी’तील षडयंत्री कर्णाचा पाडाव करावा लागेल!” असे प्रतिपादन केले.
“ज्या वर्षी म्हणजे, वर्ष-२०२३ मध्ये अनूप बरनवाल जनहित-याचिकेचा निर्णय आला, त्याचवर्षी कर्णाला (ज्ञानेश कुमार) कायदा करुन ‘राष्ट्रपतीं’पेक्षाही व्यापक अशी ‘तहहयात’ संरक्षण कवचकुंडलं बहाल केली गेलीयत… हे विसरु नका. या भाजप-संघीय सरकारने, भ्रष्टाचार निपटून काढण्याची क्षमता असणारा सामर्थ्यवान ‘लोकपाल’ निर्माण केला नाही आणि जो काही आज कमकुवत ‘लोकपाल’ मौजूद आहे…त्यालाही धड काम करायला त्यांनी वाव शिल्लक ठेवलेला नाही की, त्याला ‘मजबूत’ केला नाही… मजबूत कोणाला बनवलं तर, त्यांना EVM / SIR ची हेराफेरी करुन निवडणूक जिंकू देणाऱ्या निवडणूक आयुक्तांना (CEC & EC). खरंतरं, मतदार होण्यासाठी फक्त, तुम्ही देशाचा नागरिक असणं व वय वर्ष १८ पेक्षा जास्त असणं, एवढ्याच दोनच गोष्टी हव्या असताना ‘सीमा खन्ना’ या EC-IT महासंचालकाकरवी मनमानी अटी लादून व फाॅर्म नं. ६ आणि फाॅर्म नं. ७ मध्ये बेकायदेशीर बदल केले गेले आणि देशातल्या १३ कोटी मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान रचलं गेलं; ज्यात, उपलब्ध माहितीनुसार मुस्लिम व समाजाच्या तळागाळातील SC/ST वगैरे प्रजातीच्या आणि Gen-Z चा मोठ्याप्रमाणावर समावेश आहे… ज्याप्रमाणे, सध्या देशाच्या राजकीय-पटलावर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ किंवा बहुराष्ट्रीय-काॅर्पोरेट क्षेत्रात AI सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने ‘वन कंपनी’ घोषणा राबवून ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ धर्तीवर *मुठभरांच्या हातात सत्ता केंद्रीत करुन (Totalitarianism OR Hyper-centralisation) उर्वरित बहुसंख्यांकांना, आपल्या तालावर गरजेनुसार हवं तसं नाचवण्याचा व ‘गुलाम’ बनवण्याचा गोरख धंदा सुरु आहे… तसाच, तो सीमा खन्ना या महामायेने निवडणूक-आयुक्तालयात बेलगाम सुरु केलाय (EC)…साध्या धोब्याने चारित्र्याविषयी शंका घेताच, रामाने प्राणप्रिय सीतेचा त्याग केला होता… आणि इथे तर, लाखो-करोडो लोकं, EVM आणि SIR बद्दल ‘साशंक’ असतानाही अयोध्येत राममंदिर उभारणारे ‘जय श्रीरामवाले’ तथाकथित रामभक्त…ना ‘EVM’ सोडायला तयार आहेत, ना ‘SIR’ थांबवायला तयार… यातच सगळं काही आलं.. तेव्हा, आपली ‘लोकशाही’ ही पारदर्शक ‘व्होटिंगशाही’ नसून; EVM / SIR द्वारा मतांचा ‘झोल’ करणारी ‘झोटिगशाही’च झालेली आहे; म्हणूनच EVM हटवा / SIR थांबवा…स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक वाचवा”, असे राजन राजे यांनी अंति कळकळीचं आवाहन केलं.
या आंदोलनात काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. विवेक कोरडे, ठाणे शहराध्यक्ष श्री. राहुल पिंगळे, सरचिटणीस श्री. महेंद्र म्हात्रे, काँग्रेस नेत्या सौ. कल्पनाजी हजारे, ॲड. प्रभाकर थोरात, जावेदभाई, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे संजय मं. गो., आंबेडकरवादी विचारवंत आनंदा होवाळ, समाजमान्य नेते ॲड नाना अहिरे, म्युनिसिपल कामगार नेते जगदीशजी खैरालिया, ठाणे मतदाता जागरण अभियानचे उन्मेषजी बागवे वगैरे प्रभृतींनी, “लोकशाहीची विश्वासार्हता, केवळ निवडणुका घेण्यावर नसून, निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, पारदर्शक आणि जनतेच्या विश्वासास पात्र असण्यावर अवलंबून आहे. घटनात्मक संस्थांच्या कारभाराबाबत जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत असतील, तर त्यांची पारदर्शक तातडीने पद्धतीने चौकशी होणे आवश्यक आहे आणि संबंधित निवडणूक-आयोगातील आजीमाजी धेंडांवर कडक कारवाई व्हायला हवी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या नरेंद्र मोदी व अमित शहांनी राजीनामा द्यायला हवा…राज्यघटना आणि लोकशाही मूल्यांचे जतन व संरक्षण करण्यासाठी आता, जनतेलाच रस्त्यावर उतरण्याखेरीज गत्यंतर नाही,” अशी भूमिका आपापल्या शब्दात मांडली.
error: Content is protected !!