“रात्रीस खेळ चाले” यापद्धतीने, मध्यरात्री घाईघाईत मोदी-शहा सरकारकडून, ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी झालेली नियुक्ती हे घटनाविरोधी कृत्य असून, यामुळे भारतीय लोकशाहीचा ‘आगीतून फुफाट्यात’ असा दुर्दैवी प्रवास सुरु झालाय. आधी राजीव कुमार आणि आता, ज्ञानेश कुमार हे नि:पक्षपाती निवडणूक आयुक्त म्हणून, केवळ दर्जाने ‘सुमार’ नसून, त्यांच्याकडून झालेली व होऊ घातलेली फसवणूक ‘बेसुमार’ असल्याचा जोरदार घणाघात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी ठाण्यात केला. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून, ज्ञानेश कुमार यांच्या झालेल्या नेमणुकीचा निषेध करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, २१ फेब्रुवारी-२०२५ रोजी, ठाणे स्टेशन परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मोदी-शहा यांच्या केंद्र सरकारकृत नवीन कायद्यानुसार, निवडणूक आयुक्त नेमताना आता त्रिसदस्यीय समितीत, मुख्य न्यायाधीशांना डावलून पंतप्रधानांच्या मर्जीतल्या केंद्रिय मंत्र्याची वर्णी लावलीय. मोदी सरकारने या घटनाबाह्य कायद्यानुसार (ज्याबाबत, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे) आपल्या अधिकारात घाईघाईत सोमवार, दि. १७ फेब्रुवारी-२०२५ रोजी, मध्यरात्री मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची अधिसूचना काढली, हे संविधानाच्या विरोधात असून, देशाचा मुख्य निवडणूक आयुक्त हा निःपक्ष असावा, असे मत राजन राजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, आपल्या जोरदार भाषणात उपस्थितांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, अशातऱ्हेने निवडणूक आयोग हा, निवडणुकीतील फसवणुकीचा नवनवा ‘प्रयोग’ बनत चालल्याने व संपूर्ण न्यायदान-प्रक्रिया सत्ताधाऱ्यांच्या अनुचित दबावाखाली आल्याने, भारतीय जनतेच्या अस्वस्थतेला आणि संतापाला, रस्त्यावर उतरुन वाट मोकळी करुन देण्यावाचून दुसरा मार्गच शिल्लक राहिलेला नाही. मुळात, आपल्या देशात जिथे निवडणुकीतील मतदान, हीच प्राधान्याने एकमेव ‘लोकशाही-प्रक्रिया’ असते व जिथे महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर ‘सार्वमत’ घेतलं जाण्याची परंपरा बिलकुल नसते; अथवा, ‘राईट टू रिजेक्ट’ आणि ‘राईट टू रिकॉल’सारखे लोकेच्छेला पुरेपूर वाव देणारे कायदे नसतात; तसेच, जिथे कालबाह्य ‘फर्स्ट पास्ट द पोस्ट” ही निवडणूक-प्रक्रिया राबविली जाते, तिथला निवडणूक-आयोग तर, अगदी टी.एन. शेषन यांच्यासारखा पराकोटीचा ‘रामशास्त्री बाण्या’चा हवाच. मात्र, इथे राजीव कुमार गेले आणि ज्ञानेश कुमार आले. म्हणजेच, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’ असे झाले असून, भारतीय लोकशाहीला विषारी डंख मारणाऱ्या, ‘भाजप-संघीय’ प्रवृत्तीचा जोरदार निषेध राजन राजे यांनी यावेळी केला.
२०२३चा सर्वोच्च न्यायालयाचा पारदर्शी-निकाल, पाशवी बहुमतावर बदलून, केंद्रीय निवडणूक आयोग हा, केंद्र सरकारचा ‘बटीक’ बनवण्याच्या व त्याद्वारे फसवणुकीच्या मार्गाने निवडणुका जिंकण्याच्या ‘भाजप-संघीय’ कारस्थानावर एकाच शरसंधान साधत, निवडणूक-आयोगच सरकारच्या पंखाखाली आल्यास, लोकशाहीची घोर विटंबना होते, निवडणूक एक फार्स बनते आणि देशात हुकुमशाहीचा नंगानाच सुरु होतो, भारतात तर तो केव्हाचाच सुरु झाल्याचे टीकास्त्र, राजन राजे यांनी मोदी-शहा सरकारवर सोडले.
या निषेध आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित, पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, सचिन शेट्टी, ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे, पक्षाचे प्रवक्ते समीर चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे शहरप्रमुख प्रदीप शिंदे, काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, सचिव राहुल पिंगळे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाबासाहेव येडेकर, ‘धर्मराज्य पक्षा’चे युवा कार्यकर्ते निलेश सावंत, अमित लिबे, सुमित कदम यांच्यासह, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
“शिक्षण आणि आरोग्य, या सार्वजनिकक्षेत्रातल्या बाबी आहेत… मात्र, आपल्या या देशात अशी कुठली परिस्थिती उद्भवलीय की, सार्वजनिक शाळांमध्ये लोक जायला तयार नाहीत. सरकार आणि भांडवली-व्यवस्था, सार्वजनिक शिक्षणसंस्था उभारायला तयार नाहीत, एवढी शिक्षणक्षेत्रातली नितीमत्ता खालावलीय. एक नवा ‘चातुर्वर्ण्य’ उभा राहिलाय की, ज्यात माझ्या मराठी श्रमिकांची मुलं, संसाधनसंपन्न अशा श्रीमंत शाळांमध्ये जाऊ शकत नाहीत; कारण, लाखो रुपयांच्या फी आहेत या शाळांच्या. दुर्दैवाने, संपूर्ण शिक्षणक्षेत्राला एकप्रकारची वाळवी लागलेली आहे. त्यातलीच एक कीड म्हणजे, कंत्राटीपद्धत. शिक्षणक्षेत्रात कंत्राटीपद्धत आल्यानंतर आणि शिक्षक कंत्राटावर नेमले जाऊ लागल्यानंतर, ‘सरां’चं चुलीत घालणारं ‘सरपण’ कधी झालं, ते आम्हाला कळलंदेखील नाही. सध्याची शिक्षणाची जी काही शोचनीय अवस्था झालीय ती यामुळेच…दळवी सर व दळवीबाई या दांपत्याने आणि तुम्ही सार्या शिक्षकवृंदाने निम्न आर्थिकस्तरातील पालकांचा स्नेहभावाने हात हातात धरुन…ज्या प्रकारची जातिवंत ‘मराठी-संस्कृती’ इथे रुजवलीय-वाढवलीय, ती पाहून मी मनापासून धन्य झालो. संपूर्ण शिक्षण-क्षेत्राला वेड्यावाकड्या पद्धतीने नफा कमावण्याची ‘भांडवली-वाळवी’ लागली असताना… ‘दळवी-दांपत्य’ सेवेभावे करत असलेलं काम मोठं आहे!” असा जोरदार घणाघात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केला. कल्याणमधील प्रतिष्ठित शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, एस.डी.एल.के. एज्युकेशन ट्रस्ट संचालित, द्वारका विद्यामंदिर आणि बालविकास मंदिर या विद्यालयांच्या १५व्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पुढे बोलताना राजन राजे म्हणाले की, भांडवलदार आणि धनदांडग्यांच्या गेल्या दोन-तीन पिढ्यांनी, या महाराष्ट्राचं आतोनात नुकसान केलेलं आहे. त्यांच्यामुळेच ८० ते ९० टक्के असलेल्या मराठी श्रमिकवर्गाला अत्यंत तुटपुंजे वेतन दिलं जातंय… आणि म्हणूनच, आम्ही कामगारक्षेत्रात काम करत असताना आणि पुढे राजकारणात कंत्राटीपद्धतीविरुद्ध आवाज उठवताना, या रक्तपिपासू शोषक-व्यवस्थेला ठामपणे नव-अस्पृश्यता व नवी गुलामगिरी संबोधतो, ज्याच्याविरोधात एकही राजकीय पक्ष बोलू शकत नाही; कारण, दुर्दैवाने कुठेतरी भांडवली व्यवस्थेशी त्यांचे हात बांधलेले असतात. माझ्या मराठी भगिनीला, तिचा नवरा कंत्राटी कामगार असल्याने, त्याचा दहा-बारा हजारांचा पगार पुरत नाही. त्याच्यावर ही वेळ येऊ नये म्हणून, आम्ही कामगारक्षेत्रात एक घोषणा दिलीय, “किमान वेतन ४० हजार रुपये प्रतिमास… न देणाऱ्यास तुरुंगवास” …आणि मित्रांनो, तुम्हाला अभिमानाने सांगतोय, यातून एक चळवळ उभी राहिलीय. भविष्यात आम्ही कुठल्या पद्धतीचा देश, या मुलांच्या हाती सोपवणार आहोत? हीच आमच्या समोरची मोठी चिंता आहे. महाराष्ट्रातील माझी मराठी मुलं, उच्चशिक्षित होवोत न होवोत… प्रत्येक मुलगा डॉक्टर-इंजिनियर झालाच पाहिजे, याची आवश्यकता नाही; पण झालाच तर आनंदच आहे. मात्र, झालात न झालात आणि साधे कामगार जरी झालात, तरी तुम्हाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. या देशातली आर्थिक-विषमता रोखली गेली पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा-संदेश व्यवहारात उतरला पाहिजे, यासाठीच आम्ही काम करीत आहोत. मराठी माणसाच्या हातातून महाराष्ट्राची माती निसटू नये यासाठी, आम्हाला डोळ्यात तेल घालून काम करणं गरजेचं आहे आणि ते आम्ही नेटानं करतो आहोत, असा दुर्दम्य आशावाद राजन राजे यांनी यावेळी बोलून दाखवला.
दरम्यान, एस.डी.एल.के. एज्युकेशन ट्रस्ट संचालित, द्वारका विद्यामंदिर आणि बालविकास मंदिर या विद्यालयांचे संस्थापक/अध्यक्ष डी.बी. दळवी आणि मुख्याद्यापिका मीरा दळवी या दाम्पत्याचे ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, तोंडभरुन कौतुक केले. तुम्ही उभयता, समर्पित भावनेनं काम करीत आहात, ज्यामुळे आमचा उर निश्चितपणे अभिमानाने भरुन आल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभाच्या याप्रसंगी, ‘धर्मराज्य पक्षा’चे खजिनदार अजित सावंत, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, माजी जीएसटी आयुक्त जे.एल. पांडे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, समाजसेवक विनोद मिश्रा, नांदिवलीचे माजी सरपंच पंढरीशेठ ढोणे, बिर्ला महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक सुनील फडके, राष्ट्रीय कुस्ती पंच संघटनेचे अध्यक्ष सुभाष ढोणे, द्वारका विद्यामंदिराचे शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष संतोष खामकर, कल्याण युवा सेना अध्यक्ष प्रतिक पाटील, शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष प्रशांत भामरे, कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, समाजसेवक रामदास ढोणे, कल्याण जिल्हा शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण जगे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, द्वारका विद्यामंदिराच्या सीमा दळवी, गौरी देवधर आणि बालविकास मंदिराचे मुख्याद्यापक प्रकाश धानके यांनी विशेष परिश्रम घेतले.
दि. १९ जानेवारी-२०२५ (रविवार) रोजी धर्मराज्य पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी आपले सुपूत्र ऋग्वेद राजे, ठाण्याचे माजी खासदार सर्वश्री राजनजी विचारे यांच्यासमवेत आपल्या सहकाऱ्यांसह (महेश ठाकूर, समीर चव्हाण, राजेश गडकर) शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री बंगल्यावर भेट घेतली.
या भेटीदरम्यान प्रचलित ‘ईव्हीएम’वरील (EVM) अत्यंत संशयास्पद व शंकास्पद मतप्रक्रियेसंदर्भाने सखोल चर्चा झाली आणि ठाणे-जिल्हा प्रीपेड स्मार्ट मीटर (घरगुती इलेक्ट्रिक मीटर) विरोधी समितीला लवकरच भेटीसाठी बोलावण्याचं आश्वासन दिलं.
बैठकीत मा. उद्धवजींनी EVM मुद्द्यापलिकडे जाऊन मतदानासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांना स्पर्श केला व उपस्थित सर्वांना एकूणच मतप्रक्रियेबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं. राजन राजे यांनी सत्ताधारी भाजप-NDA आघाडी, ‘प्रजासत्ताका’चा अमृतमहोत्सव (वर्ष १९५० ते वर्ष-२०२५) साजरा करण्याबाबत पूर्णतया उदासीन असण्यामागे, त्यांचा ‘प्रजासत्ताक-संकल्पने’लाच (प्रजा म्हणजेच जनता, देशाची मालक असण्याच्या लोकशाही-तत्त्वाला) मुळातून विरोध असल्याचा मुद्दा ठासून मांडला…मुठभरांच्या हातात सत्ता केंद्रित करण्याची, वर्णवर्चस्ववादी-शोषक मानसिकता असणाऱ्यांचा भाजप हा पक्ष असल्यानेच, ते घडत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, EVM हॅक अथवा मॅनेज (प्रोग्रॅम्ड) होवोत वा न होवोत…आता, जनतेला पूर्वीचीच कागदी-मतपत्रिकेवरील पारदर्शक-मतदानप्रक्रिया हवी असल्याचं, राजन राजे यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केलं व त्यासंदर्भात ‘धर्मराज्य पक्ष’ मोहिम राबवत असल्याचं व प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवदिनी म्हणजेच, २६ जानेवारी-२०२५ रोजी रात्रौ ठीक ९.०० वा. फक्त ५ मिनिटे ‘ईव्हीएम’चा निषेध म्हणून सर्व घरातील लाईट्स बंद ठेवण्याचं आवाहन केलं जात असल्याचंही…मा. उद्धवजींच्या कानावर घातलं.
याचसंदर्भात, दि. २८ जानेवारी रोजी (मंगळवार) सायंकाळी ६.०० वा. ठाणे (प.), जांभळी नाका येथील ‘शिवाजी मैदाना’त राहुल चिमणभाई मेहता यांनी बनवलेल्या ईव्हीएम-मशीनद्वारे अमित उपाध्याय, मेघराज जोशी यांचा चमू (Team), ‘ईव्हीएम’ (EVM) कसं ‘मॅनेज’ केलं जाऊ शकतं (भले हॅक होऊ शकत नसलं तरी)…याचं प्रात्यक्षिक आयोजित केल्याची माहितीही शिवसेना पक्षप्रमुखांना दिली. त्यावर, मा. उद्धवजींनी त्यादिवशी मुंबईत असल्यास, सदर कार्यक्रमाला आवर्जून येण्याचं आश्वासन दिलं.
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्यातर्फे, समस्त नागरिकांना विनम्र आवाहन…रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ या ‘अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी’, रात्रौ ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील तसेच, इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेऊन, ‘EVM’विरोधी आपला तीव्र निषेध व्यक्त करा…!!!”
——————————– भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून…
आज, शनिवार, दिनांक १८/०१/२०२५ रोजी, फातिमा चर्च समोर, माजिवडा गाव, ठाणे (प.) येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
================== …यापूर्वीही, “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)
१) १० डिसेंबर-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत ठाणे रेल्वेस्थानक येथे….
२) दि. ११/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे….
३) दि.१२/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे….
४) दि. १६/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत ठाण्यातील मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉप येथे….
५) दि.१८/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, आनंद टाॅकीजजवळ, कोपरी, ठाणे (पू.) येथे…
६) दि.२०/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ६ वा. पर्यंत, जांभळी नाका (शिवाजी मैदानासमोर), ठाणे (प.) येथे…
७) दि.२४/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, कळवा नाका, शाखेच्या बाजूला, कळवा, ठाणे येथे…
८) दि.०२/०१/२०२५ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, होंडा शोरुमजवळ, राजश्री सोसायटीसमोर, श्रीनगर, ठाणे (प.) येथे
९) दि.०४/०१/२०२५ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, स्वामी समर्थ चौक, हाजुरी (राजतारा सोसायटीसमोर), वागळे, ठाणे (प.) येथे …
१०) गुरुवार, दि. १६ जानेवारी-२०२५ रोजी, सायंकाळी ४:०० वा. पासून ते रात्रौ ८:०० वा. पर्यंत, पंचगंगा सोसायटी, राबोडी क्र. २, ठाणे (प.) येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
————‐-‐—-‐———–
तसेच, येणाऱ्या दिवसांत ठाण्यातील अन्य ठिकाणीसुद्धा “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आयोजित करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्या…धन्यवाद!
——————————– “अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी ‘EVM’चा निषेध होणार बुलंद…२६ जानेवारी-२०२५ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद…!!!”
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्यातर्फे, समस्त नागरिकांना विनम्र आवाहन…रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ या ‘अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी’, रात्रौ ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील तसेच, इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेऊन, ‘EVM’विरोधी आपला तीव्र निषेध व्यक्त करा…!!!”
—————————————————————————————————————————–
{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1,”curves”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून… गुरुवार, दि. १६ जानेवारी-२०२५ रोजी, सायंकाळी ४:०० वा. पासून ते रात्रौ ८:०० वा. पर्यंत, पंचगंगा सोसायटी, राबोडी क्र. २, ठाणे (प.) येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
—————————————————————————————————————————–
{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1,”curves”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}…यापूर्वीही, “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)
१)१० डिसेंबर-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत ठाणे रेल्वेस्थानक येथे….
२)दि. ११/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे….
३) दि.१२/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे….
४) दि. १६/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत ठाण्यातील मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉप येथे….
५) दि.१८/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, आनंद टाॅकीजजवळ, कोपरी, ठाणे (पू.) येथे…
६) दि.२०/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ६ वा. पर्यंत, जांभळी नाका (शिवाजी मैदानासमोर), ठाणे (प.) येथे…
७) दि.२४/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, कळवा नाका, शाखेच्या बाजूला, कळवा, ठाणे येथे…
८) दि.०२/०१/२०२५ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, होंडा शोरुमजवळ, राजश्री सोसायटीसमोर, श्रीनगर, ठाणे (प.) येथे
९) दि.०४/०१/२०२५ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, स्वामी समर्थ चौक, हाजुरी (राजतारा सोसायटीसमोर), वागळे, ठाणे (प.) येथे ‘जनमत-चाचणी‘ घेण्यात आली.
—————————————————————————————————————————–
तसेच, शनिवार, दिनांक १८/०१/२०२५ रोजी, फातिमा चर्च समोर, माजिवडा गाव, ठाणे (प.) येथे “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आयोजित करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्या…धन्यवाद!
—————————————————————————————————————————– “अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी ‘EVM’चा निषेध होणार बुलंद…२६ जानेवारी-२०२५ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद…!!!”
“प्रीपेड-स्मार्ट मीटर, हे जनतेला अधिकचा आर्थिक भुर्दंड देणारं व पाणीपुरवठ्यासारखी वीजपुरवठा ही जीवनावश्यक सेवा, बेफाम नफा कमावण्यासाठी खाजगीकरणाद्वारे अदानीसारख्या सत्ताधाऱ्यांचा बगलबच्चा असलेल्या बदनाम भांडवलदाराला मोकाट सोडण्याचं; तसेच, मोठ्याप्रमाणावर कामगार-कपात करत बेरोजगारी वाढवण्याचं समाजघातकी भांडवली-धोरणं होय!”
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचा राज्य शासनावर जोरदार घणाघात…
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गत सरकारच्या काळात उर्जामंत्री असताना, त्यांनी तत्कालीन पावसाळी अधिवेशनात, (दि. ३ जुलै-२०२४ रोजी) महाराष्ट्रीय जनतेला आश्वासन देताना, “सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावण्यात येणार नाही” अशी घोषणा केली होती. मात्र, विधानसभेत दिलेल्या आपल्याच आश्वासनाला हरताळ फासत, ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची अदानी-कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला नादुरुस्त मीटर व नवीन वीज जोडणीकरीता, प्रीपेड-स्मार्ट मीटर बसविण्यास अदानी कंपनीने बेलाशक सुरुवात केलेली आहे. सर्वसामान्य जनतेची ही घोर फसवणूक अदानीचं उखळ पांढरं करण्यासाठी सरकारने सुरु केलेली असून, या विरोधात ठाणे शहरातील विरोधी राजकीय पक्ष, समविचारी संस्था व डाव्या कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ठाणे जिल्हा स्मार्ट प्रीपेड वीज मीटरविरोधी समिती’ची स्थापन करण्यात आलेली आहे.
याच अनुषंगाने, लाखो वीज ग्राहकांवर लादण्यात येणाऱ्या, स्मार्ट प्रीपेड मीटरच्या अरिष्टाबाबत, जनजागृती करण्याच्या उद्देशाने, दि. ७ जानेवारी-२०२५ रोजी, महावितरण कंपनीच्या वागळे इस्टेट, ठाणे येथील प्रशासकीय कार्यालयात एका द्वारसभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महावितरणच्या कामगारांना संबोधित करताना राजन राजे म्हणाले की, “प्रीपेड-स्मार्ट मीटरच्या माध्यमातून रक्तपिपासू-निर्दय-शोषक व्यवस्थेकरवी (Vampire State System) पहिली कुऱ्हाड ही, तरुण कंत्राटी-कामगारांवर पडणार आहे आणि त्यानंतर ती कुऱ्हाड, मनमानी चढ्या बिलांच्या रुपाने व रिचार्ज संपताच ‘बत्ती गूल’ होण्याच्या ‘दहशती’ने वीज-ग्राहकांवर पडणार आहे. गेली ३० ते ४० वर्षे महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात याच कंत्राटी-कामगार पद्धतीविरोधात मी धर्मयुद्ध पुकारलंय…एकीकडे सरकारी आर्थिक-धोरणं, काॅर्पोरेटीय व्यवस्थापकीय व उत्पादन-पद्धती, संदेशांची देवाणघेवाण-माहिती तंत्रज्ञान आणि संगणकीकरणासह, इतरही सगळीच क्षेत्र स्मार्ट बनलीयत… पण, आमचे पगार स्मार्ट कधी होणार? स्मार्ट मीटर लावण्याआधी आमच्या पगाराला देखील एक ‘स्मार्ट मीटर’ बसवा…देशाची आर्थिक प्रगतीसोबत महागाई, सेवाज्येष्ठता वाढताच ‘समृद्धी सर्वांची (Common-Prosperity)’ या तत्त्वानुसार ते आपसूकच भरघोस वाढले पाहिजेत…नाहीतर, आवक (पगार) वाढत नाहीत आणि वीज-बिलासारखी जावक वाढतच राहिली; तर संपूर्ण जनतेलाच ‘लाडक्या बहिणीं’सारखं दिड-दोन हजारी ‘गुलाम’ व्हावं लागेल!”, असा जोरदार घणाघात आपल्या तडाखेबंद भाषणात केला.
“मोदी-शहा आणि अदानी-अंबानी नव्हे; तर, आम्ही या देशाचे मालक आहोत…यांनी *स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला; पण, ते प्रजासत्ताकाचा अमृतमहोत्सव साजरा करायला उत्सुक नाहीत; कारण, प्रजा हीच या देशाची मालक, ही घटनादत्त संकल्पनाच यांना मान्य नाही…त्यांना मुठभरांची हुकूमशाही EVMची हेराफेरी करत निवडणुका जिंकून लादायचीय…तेव्हा, सावध होऊन काळाच्या हाका ऐका आणि सर्वसामान्य
जनता व कामगार यांनी एकत्र येऊन या ‘रक्तपिपासू-निर्दय-शोषक (Vampire-State System)’ भांडवली-व्यवस्थेविरुद्ध लढलं पाहिजे, ही काळाची गरज आहे”, अशा आवाहनासोबतच, “तरुणपण संघर्षात गुंतवलं नाही; तर, म्हातारपणी तुम्हाला लाचारीचा सामना करावा लागेल” असा गंभीर इशारा दिला. सरतेशेवटी, राजन राजे यांनी, “EVM सुरु राहिले तर, तुम्ही-आम्ही संपलो, या देशातली लोकशाही संपली, असं खुशाल समजा…कारण, सत्ताधाऱ्यांना तुमच्या जनमताची गरज EVM मुळे फारशी उरलेली नाहीये”. म्हणूनच, २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, रात्रौ ठीक ९.०० वाजता, फक्त ५ मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातील, कार्यालयांतील लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’चा निषेध नोंदविण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यातर्फे, समस्त भारतीय-नागरिकांच्यावतीने…रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ या ‘अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी’, रात्रौ ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेऊन, ‘EVM’विरोधी आपला तीव्र निषेध व्यक्त करा…!!!”
——————————————————————————————
भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून…
आज, शनिवार, दि.०४/०१/२०२५ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, स्वामी समर्थ चौक, हाजुरी (राजतारा सोसायटीसमोर), वागळे, ठाणे (प.) येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
—————————————————————————————–
…यापूर्वीही, “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)….
१) १० डिसेंबर (मंगळवार)-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत ठाणे रेल्वेस्थानक येथे….
२) बुधवार, दि. ११/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे….
३) गुरुवार, दि.१२/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे….
४) सोमवार, दि. १६/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत ठाण्यातील मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉप येथे….
५) बुधवार, दि.१८/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, आनंद टाॅकीजजवळ, कोपरी, ठाणे (पू.) येथे…
६) शुक्रवार, दि.२०/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ६ वा. पर्यंत, जांभळी नाका (शिवाजी मैदानासमोर), ठाणे (प.) येथे…
७) मंगळवार, दि.२४/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, कळवा नाका, शाखेच्या बाजूला, कळवा, ठाणे येथे…
८) गुरुवार, दि.०२/०१/२०२५ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, होंडा शोरुमजवळ, राजश्री सोसायटीसमोर, श्रीनगर, ठाणे (प.) येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
————‐-‐—-‐———————————————————————
तसेच, येणाऱ्या दिवसांत ठाण्यातील विविध ठिकाणी “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आयोजित करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्या…धन्यवाद!
—————————————————————————————–
“अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी ‘EVM’चा निषेध होणार बुलंद…२६ जानेवारी-२०२५ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद…!!!”
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यातर्फे, समस्त भारतीय-नागरिकांच्यावतीने…रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ या ‘अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी’, रात्रौ ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेऊन, ‘EVM’विरोधी आपला तीव्र निषेध व्यक्त करा…!!!”
—————————————
भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून…
आज, गुरुवार, दि.०२/०१/२०२५ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, होंडा शोरुमजवळ, राजश्री सोसायटीसमोर, श्रीनगर, ठाणे (प.) येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
——————————
…यापूर्वीही, “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)….
१) १० डिसेंबर (मंगळवार)-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं* औचित्य साधत *ठाणे रेल्वेस्थानक* येथे….
२) बुधवार, दि. ११/१२/२०२४ रोजी* , संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, *वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प)* येथे….
३) गुरुवार, दि.१२/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे….
४) सोमवार, दि. १६/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत ठाण्यातील मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉप येथे….
५) बुधवार, दि.१८/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, आनंद टाॅकीजजवळ, कोपरी, ठाणे (पू.) येथे…
६) शुक्रवार, दि.२०/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ६ वा. पर्यंत, जांभळी नाका (शिवाजी मैदानासमोर), ठाणे (प.) येथे…
७) मंगळवार, दि.२४/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, कळवा नाका, शाखेच्या बाजूला, कळवा, ठाणे येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
————‐-‐—-‐-
तसेच, येत्या शनिवार, दि. ०४/०१/२०२५ रोजी सं. ४ वाजल्यापासून ते ६ वाजेपर्यंत, वागळे, ठाणे (प.) येथे “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्या…धन्यवाद!
—————————–
“अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी ‘EVM’चा निषेध होणार बुलंद…२६ जानेवारी-२०२५ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद…!!!”
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यातर्फे, समस्त भारतीय-नागरिकांच्यावतीने…रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ या ‘अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी’, रात्रौ ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ‘EVM’विरोधी आपला तीव्र निषेध व्यक्त करा…!!!”
————————————— भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून…
आज, मंगळवार, दि.२४/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, कळवा नाका, शाखेच्या बाजूला, कळवा, ठाणे येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
—————————— …यापूर्वीही, “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)….
१) १० डिसेंबर (मंगळवार)-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत ठाणे रेल्वेस्थानक येथे….
२) बुधवार, दि. ११/१२/२०२४ रोजी,वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे….
३) गुरुवार, दि.१२/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे….
४) सोमवार, दि. १६/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत ठाण्यातील मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉप येथे….
५) बुधवार, दि.१८/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, आनंद टाॅकीजजवळ, कोपरी, ठाणे (पू.) येथे…
६) शुक्रवार, दि.२०/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ६ वा. पर्यंत, जांभळी नाका (शिवाजी मैदानासमोर), ठाणे (प.) येथे, ‘ईव्हीएम’विरोधी जनजागृती आंदोलन करण्यात आले.
तसेच, ठाण्यातील विविध ठिकाणी “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्या…धन्यवाद!
—————————– “अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी ‘EVM’चा निषेध होणार बुलंद…२६ जानेवारी-२०२५ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद…!!!”
—————————–
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यातर्फे, समस्त भारतीय-नागरिकांच्यावतीने…रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ या ‘अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी’, रात्रौ ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ‘EVM’विरोधी आपला तीव्र निषेध व्यक्त करा…!!!”
————————————————————————————–
भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी *ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून…
आज, शुक्रवार, दि.२०/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ६ वा.पर्यंत, जांभळी नाका (शिवाजी मैदानासमोर), ठाणे (प.) येथे ‘जनमत-चाचणी’ घेण्यात आली.
————————————————————————————–
…यापूर्वीही, “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ (Referundum)….
१) १० डिसेंबर (मंगळवार)-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत ठाणे रेल्वेस्थानक येथे….
२) बुधवार, दि. ११/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे….
३) गुरुवार, दि.१२/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे….
४) सोमवार, दि. १६/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत ठाण्यातील मनोरमा नगर, टीएमटी बस स्टॉप येथे….
५) बुधवार, दि.१८/१२/२०२४ रोजी, संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, आनंद टाॅकीजजवळ, कोपरी, ठाणे (पू.) येथे, ‘ईव्हीएम’विरोधी जनजागृती आंदोलन करण्यात आले.
तसेच, ठाण्यातील विविध ठिकाणी “EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी ‘जनमत-चाचणी अथवा सार्वमत’ ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्या…धन्यवाद!
————————————————————————————–
“अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी ‘EVM’चा निषेध होणार बुलंद…२६ जानेवारी-२०२५ रात्रौ ९.०० वा. ५ मिनिटे सगळे लाईट्स बंद…!!!”