ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला ३५ दिवस उलटूनही या प्रकरणातील संशयित मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्याबाबत अटकेची कारवाई झालेली नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे, संबंधित व्यक्ती पोलीस आयुक्तांची भेट घेतात, पत्रकार परिषदा घेतात; मात्र तपासातील प्रगतीबाबत अद्याप समाधानकारक चित्र समोर आलेले नाही.या पार्श्वभूमीवर प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा आणि तपास निष्पक्षपणे व्हावा, या मागणीसाठी ठाण्यात आयोजित कँडल मार्चमध्ये धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
प्रभावशाली असो वा सामान्य नागरिक, कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत. तपासात कोणालाही झुकते माप न देता, पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष आणि पारदर्शक कारवाई करणे हीच ठाणे पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे.
प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळालाच पाहिजे!