व्यवस्थेशी 'संधान' साधून बसलेल्या 'शेठजी' आणि 'दलाल' मराठी राजकारण्यांच्या मालकीच्या वृत्तपत्रीय सृष्टीनं... करोडो मराठीमनांच्या जगण्याची, प्रत्यक्षात झालेली 'कोंडी' व त्यांच्यावरील अन्याय-भ्रष्टाचार सातत्यानं चव्हाट्यावर मांडण्याचा व त्याचा अखेरपर्यंत पाठपुरावा करण्याचा.... 'मराठी-विचारविश्वा' ला ढवळून काढून 'नव्या मनूचा संदेश' देण्याचा, आपला 'वृत्तधर्म' पाळण्याऐवजी... ती वृत्तपत्रीयसृष्टी, अस्वस्थ 'मराठी-अश्वत्थाम्या' च्या भळभळत्या जखमांवर केवळ वरकरणी 'फुंकर' घालण्यासारखं 'चटावरचं श्राद्ध' आजवर उरकत आलेली आहे... सध्याच्या भ्रष्ट व सरंजामी व्यवस्थेकडून अन्याय-अत्याचाराचा हरघडी सामना करणाऱ्या सर्वसामान्य 'मराठी-आत्म्यां'च्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी आणि 'कालिया सर्प' रुपी जुलूमी-व्यवस्थेच्या जबड्यात हात घालून तिचे 'विषदंत' उपटण्यासाठी... 'धर्मराज्य पक्षा' तर्फे सादर करीत आहोत..... एक धगधगते व जाज्ज्वल्य प्रकाशन... "कृष्णार्पणमस्तु" !!